सिंदखेडराजा तालुक्यातील शेंदुर्जन गावात एका प्रेमी युगुलाने आत्महत्या केल्याची घटना घडलीय.
कुस्तीपटू बजरंग पूनिया यांनी पत्र काढत आपला पद्मश्री पुरस्कार पुन्हा देणार असल्याचं म्हटलं आहे. मी माझा पद्मश्री पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदींना परत करत आहे, असं ट्वीट बजरंग पूनिया यांनी केलंय. आपल्या ट्वीटरवर देखील त्यांनी याबाबातचं पत्र पोस्ट केलंय.
नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी काँग्रस नेते आणि राज्याचे माजी मंत्री सुनिल केदार यांना कोर्टाने सर्वात मोठा धक्का दिला आहे. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १५० कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात न्यायालयाने सुनील केदार यांना दोषी ठरवण्यात आले आहे.
दारू घोटाळ्यात तुरुंगात असलेले आपचे खासदार संजय सिंह यांना मोठा धक्का बसलाय. शुक्रवारी दिल्ली न्यायालयाने आप खासदाराचा जामीन अर्ज फेटाळलाय.
जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात लष्करावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याविषयी मोठी अपडेट समोर आलीय. राजौरी येथे लष्काराच्या वाहनावर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याप्रकरणी चार स्थानिक नागरिकांनी ताब्यात घेण्यात आले आहे.
खारघर सेक्टर १६ येथील वास्तुविहार या इमारतीमध्ये राहणाऱ्या ३३ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली. ही व्यक्ती हा गृहविलगीकरणात असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
नवी दिल्ली -
काँग्रेस नेते राहुल गांधी आणि शरद पवार यांच्यात बैठक
शरद पवारांच्या 6 जनपथ या निवासस्थानी झाली बैठक
20 मिनिटे बैठकीत चर्चा
महाविकास आघाडीचे जागावाटप आणि इतर विषयांवर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती
सकाळी INDIA आघाडीची सभा झाल्यानंतर बैठक झाली
पत्रकार परिषदेत बोलताना आदित्य ठाकरेंनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. भाजपच्या आमदाराने दावा केला होता की, कंत्राट रद्द झाली आहेत. मुख्यमंत्री भाजपची स्कि्रप्ट वापरत आहेत. त्यांची तेवढीच पोच आहे तेवढच करतायेत अशी टीका अदित्य ठाकरेंनी केलीय.
संसदेतील खासदारांच्या निलंबनाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. देशातील माध्यमे खासदारांना बाहेर काढल्याबद्दल प्रश्न विचारत नाहीत, पण राहुल गांधींनी मोबाइलवर काढलेला व्हिडिओ दाखवला, असं राहुल म्हणाले.
देशातील ६० टक्के मतदारांचे तोंड बंद केले आहे. तुम्ही देशाला, देशातील युवकांना समजू शकले नाहीत, असंही राहुल गांधी म्हणाले. आम्ही सगळे विरोधी पक्ष, विरोधी पक्षाचे नेते सोबत उभे आहोत. ही लढाई द्वेष आणि प्रेमाची आहे. तुम्ही कितीही द्वेष पसरावा, आम्ही प्रेमाने देशातील लोकांना जिंकत राहू, असा निर्धारही राहुल यांनी व्यक्त केला.
देशातील मतदारांनी निवडून दिलेल्या खासदारांना निलंबित केलं. संसदेतील खासदारांना निलंबित करण्यात आलं. याची किंमत मोजावी लागेल. हा मुद्दा गावागावात पोहोचला पाहिजे. हल्ला करणाऱ्यांना पास देणारे संसदेत बसले आहेत, अशा शब्दांत शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली.
Nashik News : फसवणूक आणि भ्रष्टाचाराच्या दाखल गुन्ह्यात एसीबीचे वरिष्ठ अधिकारी करणार सुधाकर बडगुजर यांची चौकशी ३ दिवसांची मुदत संपल्यावर बडगुजर एसीबी कार्यालयात चौकशीला पोहचले २०१६ साली तत्कालीन आयुक्त प्रवीण गेडाम यांनी बडगुजर यांच्याविरोधात दिली होती तक्रार नगरसेवक असताना पदाचा दुरुपयोग करून स्वत:च्याच कंपनीला कंत्राट देवून ३३ लाखांची फसवणूक केल्याची करण्यात आल्याची तक्रार
छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातील वाकयुद्ध सुरूच आहे. सर्वांना आरक्षण दिलं पाहिजे, जरांगेंचे ऐकायला पाहिजे, असा खोचक टोला भुजबळ यांनी लगावला.
Panvel-Uran :
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षांच्या १४१ खासदारांचे निलंबन केल्याच्या विरोधात महाविकास आघाडी पनवेल-उरणतर्फे निषेध आंदोलन करण्यात आले. लोकशाही वाचवा अशा घोषणा देत केंद्रातील मोदी सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला.
कोरोनानं देशात पुन्हा डोकं वर काढलंय. गेल्या २४ तासांत कोविड १९ चे ६४० नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर सक्रिय रुग्णांची संख्या २९९७ वर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं शुक्रवारी ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
देशातील कोरोना रुग्णांची संख्या आतापर्यंत साडेचार कोटींपर्यंत पोहोचली आहे. तर गेल्या २४ तासांत एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत कोरोना मृत्यूची एकूण संख्या ५,३३,३२८ वर पोहोचली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.८१ टक्के आहे. तर मृत्यूदर १.१९ टक्के आहे.
पालघर : मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्गावर जीआर इन्फ्रा या कंपनीच्या ट्रकने एका बाईकस्वाराला चिरडलं. बाईकस्वाराचा जागीच मृत्यू. रवी दळवी असं या 38 वर्षीय बाईकस्वार तरुणाचं नाव असून तो वाडा तालुक्यातील हमरापुर येथील रहिवासी होता.
उत्तर प्रदेशमध्ये घराला आग लागून दोन सख्ख्या बहिणींचा होरपळून मृत्यू. एक मुलगी 6 वर्षांची आणि दुसरी 6 महिन्यांची असल्याची माहिती. बहादुगड पोलीस स्टेशन हद्दीतील बिहुनी गावातील घटना. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती.
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना राममंदिर उद्घाटन सोहळ्यासाठी अद्यापही निमंत्रण देण्यात आलेलं नाही, असा खुलासा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. अयोध्येतील राम मंदिरासाठी बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचं खूप मोठं योगदान आहे. पण आम्ही राम मंदिराच्या नावाखाली मतं मागणार नाही, असा टोलाही त्यांनी भाजपला हाणला आहे. राम मंदिर कुणाचं एकट्याचं नाही, भाजपचा राजकीय स्टंट झाल्यानंतर आम्ही अयोध्येत जाऊन प्रभुरामचंद्राचं दर्शन घेणार असंही राऊतांनी स्पष्ट केलं आहे.
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील मस्तान येथील पुलाखाली भीषण अपघात झाला. मुरूम वाहतूक टिप्परने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. रवी दळवी (वय ३८) असं मृत व्यक्तीचं नाव असून तो वाडा तालुक्यातील हमरापुर येथील रहिवासी होता.
या अपघातानंतर मनोर पोलिसांनी टिप्पर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक देखील केली आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
लोकसाहित्याचे अभ्यासक पद्मश्री डॉ. प्रभाकर मांडे यांचं निधन झालं आहे. वयाच्या ९० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. डॉ. मांडे यांच्यावर अहमदनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, गुरुवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली आहे. त्यांच्यावर आज अहमदनगर येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.
राज्यात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा शिरकाव झाल्याने मुंबई महापालिका अलर्ट मोडवर आली आहे. मुंबईत डिसेंबरमध्ये आतापर्यंत आढळलेल्या सर्व 34 कोरोना बाधितांची 'जिनोम सिक्वेन्सिंग' करण्यात येणार आहे.
यापूर्वी मुंबईत दररोज 1 हजार जणांची कोरोना चाचणी करण्यात येत होती. आता कोरोनाच्या चाचण्या वाढवण्यात येणार आहे. खबरदारी म्हणून 16 पालिका रुग्णालये, सेव्हन हिल्स रुग्णालयासह सुमारे साडेपाच हजार बेड तैनात ठेवण्यात येणार आहेत.
कोरोनाचा प्रभाव कमी झाला, असं म्हणता-म्हणता देशात पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचा जे-१ या नव्या व्हेरिएंटचा रुग्ण आढळून आल्याने वैद्यकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. मुंबईकरांना गर्दीच्या ठिकाणी मास्क घालण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सध्या कुठेही मास्कसक्ती करण्यात आलेली नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.