Live Breaking Marathi News of Maharashtra (15 December 2023): Maratha Aarakshan, Hiwali adhiveshan, Sharad Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis yanchya batmya live Saam TV
ब्लॉग

Maharashtra Marathi News Live : पुण्यात महापालिकेच्या अधिकाऱ्याला शिवसैनिकांनी फासलं काळं

Satish Daud

पुण्यात महापालिकेच्या अधिकाऱ्याला शिवसैनिकांनी फासलं काळं

महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्याला शिवसेनेने फासल काळ

पुणे महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या आधीक्षकांना कार्यालयात जात शिवसैनिकांनी काळ फासल

दत्तात्रये फुले असं महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याचं नाव

संबधित आधिकारि निलंबित होऊन देखील पाहत होते शिक्षण विभागाचा कारभार

26 नोव्हेंबर रोजी एका प्रकरणात करणयात आलं होतं फुले यांचं निलंबन

नीलम म्हणून देखील कार्यालयात जात पाहत होते विभागाचा कारभार याच प्रकरणी शिवसेना आक्रमक

सोलापुरात कांद्याचा भाव घसरला, शेतकऱ्यांचे डोळे पाणावले

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला १८०० ते २२०० रुपये दर

कांद्याच्या किंमतीत जवळपास ५०० रुपयांची घसरण

बाजार समितीमध्ये कांद्याची आवक वाढल्याने शेतकरी मेटाकुटीला

सुधाकर बडगुजर यांची चौकशी होणार?

नाशिक पोलिसांनी सुधाकर बडगुजर यांना चौकशीसाठी बोलावले चौकशीसाठी येण्याचा निरोप नाशिक पोलिसांनी बडगुजर यांना दिला नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट १ ने बडगुजर यांना चौकशीसाठी बोलावले बडगुजर मात्र मुंबईच्या दिशेने रवाना नाशिक पोलिसांच्या भूमिकेकडे आता लक्ष

SRA मधील घरे विकण्याची मुदत मर्यादा कमी होणार

झोपडपट्टी प्राधिकरणाच्या माध्यमातून लाभार्थ्याला मिळालेले घर दहा वर्षांपर्यंत हस्तांतरीत करता येत नाही. हा कालावधी कमी करून तो ७ वर्षे करण्याच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. ही मर्यादा पाच वर्षांपर्यंत कमी करण्याच्या लोकप्रतिनिधींच्या मागणीसंदर्भात कायदेशीर सल्ला घेऊन मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव मांडला जाईल, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत दिली.

Ambernath Building Slab Collapse : अंबरनाथमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला, २ जखमी

अंबरनाथमध्ये इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील स्लॅब कोसळला. या दुर्घटनेत दोन जण जखमी झाले आहेत. जखमींना उल्हासनगरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राहुल इस्टेट येथील श्री सरस्वती देवी बिल्डिंग क्रमांक पाचमधील घटना ही इमारत १९९६ मध्ये बांधण्यात आली आहे.

Pune Fire : हडपसर मांजरीमध्ये भंगार आणि फर्निचरच्या दुकानाला भीषण आग

पुण्यातील हडपसर मांजरी येथे भीषण आग

भंगार आणि फर्निचर दुकानाला आग

अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी

आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न

माझ्यावर राजकीय हेतूने गुन्हे, माहिती घेऊन आरोप केले नाहीत - बडगुजर

Sudhakar Badgujar : सुधाकर बडगुजर पत्रकार परिषद -

माझ्यावर राजकीय हेतूने गुन्हे दाखल झाले आहेत.

माहिती घेऊन आरोप केले नाहीत

माझे कुणाशीही काहीही संबंध नाहीत

मी ठरवून कधीच सलीम कुत्ताला भेटलो नाही

- सुधाकर बडगुजर

Amit Shah-Sharad Pawar meeting:  अमित शहा-शरद पवार यांची आजची बैठक रद्द

अमित शहा आणि शरद पवार यांची आज होणारी बैठक रद्द करण्यात आली आहे. शहा हे राजस्थानला असल्याने ही बैठक होऊ शकत नाही, असे वृत्त आहे. आता ही बैठक सोमवारी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Beed News : सहकार क्षेत्रात खळबळ, मराठवाडा अर्बन पतसंस्थेच्या ८ संचालकांचे राजीनामे

बीडच्या सहकार क्षेत्रात पुन्हा खळबळ उडालीये. माजलगाव येथील मराठवाडा अर्बन पतसंस्थेच्या आठ संचालकांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. सहायक निबंधकांकडून प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे. पतसंस्थेच्या ठेवीदारांची धाकधूक वाढली असून, आपल्या ठेवी कशा मिळवाव्यात? असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.

Bhajanlal Sharma takes oath as the Chief Minister of Rajasthan : भजनलाल शर्मा यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ

पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून गेलेले भजनलाल शर्मा यांनी राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

जयपूरमध्ये हा शपथ सोहळा झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि इतर वरिष्ठ नेते या सोहळ्याला उपस्थित होते. भाजपच्या ज्येष्ठ नेत्या दिया कुमारी आणि प्रेमचंद बैरवा यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

महुआ मोईत्रा यांच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात ३ जानेवारीला सुनावणी

टीएमसी नेत्या महुआ मोईत्रा यांच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात होणारी सुनावणी आता ३ जानेवारीला होणार

याचिका वाचून त्यावर सुनावणी घेऊ : न्यायमूर्ती संजीव खन्ना

महुआ यांनी लोकसभा सदस्यत्व रद्द केल्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलीय

संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याच्या प्रकरणात त्यांची खासदारकी रद्द करण्यात आलीय

शिवसैनिकांनी रोखला नगर-मनमाड महामार्ग

अहमदनगर :

शिवसेनेचा (उद्धव ठाकरे गट) रास्तारोको

कांदा निर्यात बंदी, इथेनॉल उत्पादनावर बंदी, दूधाचे दर या मुद्द्यांवर आक्रमक

अहमदनगर जिल्ह्यातील कोल्हार येथे रस्त्यावरील वाहतूक रोखली

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदारसंघात सरकारविरोधात शिवसेनेचे आंदोलन

जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरेच्या नेतृत्वात शिवसैनिक उतरले रस्त्यावर

Mumbai Mhada : मुंबईतील लाखो रहिवाशांना दिलासा, सरकारचा मोठा निर्णय

म्हाडाच्या ५६ वसाहतींना सेवा शुल्क माफी, सरकारचा निर्णय

३८४ कोटींचा भुर्दंड माफ होणार

मुंबईतील लाखो रहिवाशांना दिलासा

गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांची घोषणा

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावरील रखडलेल्या कामाला अखेर सुरुवात

मुंबई गोवा महामार्गावरील रखडलेल्या मार्गिकेच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे. तळेकाटे ते वाकेड अशा मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम साल २०२२ पासून रखडले होते. ठेकेदार बदलल्यानंतर 49 किलोमीटरच्या या टप्प्याचे काम अखेर सव्वा वर्षानंतर पुन्हा हाती घेण्यात आले आहे. या टप्प्यातील केवळ ३३ टक्के काम शिल्लक असून यासाठी ८०० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.

Maratha Reservation Live Updates:  मराठा आरक्षण विषयी छत्रपती संभाजीराजे यांनी दिल्ली येथे बोलाविली सर्व खासदारांची बैठक

मराठा आरक्षण विषयी छत्रपती संभाजीराजे यांनी दिल्ली येथे सर्व खासदारांची बैठक बोलावली आहे. नितीन गडकरी, शरद पवार, नारायण राणे यांनाही या बैठकीचे निमंत्रण देण्यात आले आहे. महाराष्ट्रात ऐरणीवर असलेल्या मराठा आरक्षण या विषयी महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी एकमताने संसदेत आवाज उठवावा, याकरिता छत्रपती संभाजीराजे यांनी दिल्ली येथे राज्यातील सर्व लोकसभा व राज्यसभा खासदारांची संयुक्त बैठक आयोजित केलेली आहे.

१८ डिसेंबर रोजी महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली येथे होणाऱ्या या बैठकीस संभाजीराजे यांच्याकडून राज्यातील सर्व लोकसभा व राज्यसभा खासदारांना निमंत्रित करण्यात आले आहे. बैठकीला कोणकोणते खासदार उपस्थित राहतात याकडे साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

Sangli News:  एटीएममध्ये पाचशेच्या बनावट नोटा; पोलिसांकडून तिघांना अटक

सांगली शहरातील राजवाडा चौक येथे असलेल्या आयसीआयसीआय बँकेच्या शाखेतील पैसे भरण्याच्या मशीनमध्ये ३ संशयितांनी एका बंद खात्यावर ५०० रुपयांच्या १९ बनावट नोटा भरल्याचे उघडकीस आले आहे. ही घटना १४ नोव्हेंबर रोजी दुपारी घडली आहे. या प्रकरणी बँकेचे नोडल ऑफिसर बाळासाहेब खराडे यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी बनावट नोटा भरणाऱ्या सतीश सुखदेव पाटील आणि दोन अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल केला आहे.

Pune News Live Updates:  वाहतूक कोंडीविरोधात पुण्यामध्ये शिवसेना शिंदे गटाचं आंदोलन

वाहतुक कोंडी विरोधात शिवसेना शिंदे गटाकडून आंदोलन करण्यात येणार आहे. पुण्यात मूढवा येथील महात्मा फुले चौकात आंदोलनाला सुरूवात होणारे. महात्मा फुले चौकात मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थितीत आहेत. गेले अनेक दिवस मुंढवा वाहतूक कोंडी प्रश्न प्रलंबित आहे. आंदोलनामुळे रस्त्यावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. काहीवेळात रास्ता रोको आंदोलनाला सुरूवात होणार आहे.

Pune News Live Updates: पुण्यात रस्त्याच्या कडेला आढळले मृत अर्भक, धायरी परिसरात खळबळ

पुण्यातील धायरी फाटा येथील सणस शाळेजवळील मुख्य रस्त्यावर कचऱ्यात सकाळी ८ वाजेच्या सुमारास नवजात मृत अर्भक सापडले. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच सिंहगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतील.

पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने अर्भक ताब्यात घेऊन पुढील उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले आहे. याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पुढील तपास पोलीस करत आहे.

Sasoon Hospital News: ससून रुग्णालयाला संपाचा फटका; दिवसभरात केवळ ८ शस्त्रक्रिया

पुण्यात सरकारी रुग्णालयातील परिचारिकांनी गुरुवारी संप पुकारत कामबंद आंदोलन केलं. या संपाचा मोठा फटका ससून सर्वोपचार रुग्णालयाला बसला. ससूनमध्ये दररोज सरासरी ४० शस्त्रक्रिया होतात. मात्र, ६०० परिचारिका संपावर गेल्याने केवळ ८ शस्त्रक्रिया होऊ शकल्या.

केवळ तातडीने करावयाच्या शस्त्रक्रिया दिवसभरात करण्यात आल्या आणि नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या. संप मिटल्यानं ससून मधील सर्व नर्सेस आज कामावर हजर झाल्या आहेत.

Lalit Patil Case: ललित पाटील प्रकरणात येरवडा कारागृहातील डॉक्टरला जामीन

ललित पाटील प्रकरणात येरवडा कारागृहातील डॉक्टर संजय मरसाळे याला जामीन मंजूर करण्यात आला आहे. ललिल पाटीलला ससून रुग्णालयातून पळून जाण्यास मदत केल्याच्या आरोपावरून मरसाळे याच्यावर होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली होती. मात्र, त्याविरोधात कोणताही पुरावा नसल्याने पुणे न्यायालयाने जामीनावर सुटका केली.

Hiwali Adhiveshan 2023 Updates: हिवाळी अधिवेशनाचा आज सातवा दिवस; सभागृहात काय चर्चा होणार?

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज सातवा दिवस आहे. मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू असताना बीडमध्ये जाळपोळ करण्यात आली होती. यावर आज अधिवेशनात चर्चा होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी एक दिवसांच्या संप पुकारला होता.

आता कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला असून ते कामगावर रुजू झाले आहेत. संसदेत बुधवारी झालेल्या घुसखोरी प्रकरणात पोलिसांनी सहावा आरोपी ललित झा याला अटक केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आज सकाळी राजस्थानसाठी रवाना होत आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांचा आज शपथविधी आहे.

भजनलाल यांच्या शपथविधीनंतर पवार-शिंदे-फडणवीस दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहे. सह देशविदेश तसेच राज्यातील महत्वपूर्ण घडामोडीचा आढावा आपण या लाईव्ह ब्लॉगमधून घेणार आहेत. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND W vs PAK W: भारताच्या रणरागिणी पाकिस्तानवर पडल्या भारी! हरमनप्रीत शेवटपर्यंत लढली

Mumbai Accident: पश्चिम द्रुतगती महामार्गावर टेम्पोचा भीषण अपघात, गोरेगाव ते मालाड दरम्यान वाहतूक कोंडी

Marathi News Live Updates : जयंत पाटलांनी पैसे वाटल्याचे आरोप सिद्ध करावेत, दीपक केसरकरांचं खुलं आव्हान

VIDEO : स्मारकाच्या शोधत राजे; महाराजांच्या नावाने खेळ करू नका, संभाजीराजेंनी दिला इशारा

Jayant Patil : पटेलांच्या पुतळ्यापेक्षा कोणताही पुतळा उंच असू नये, हे ठरवलंय ; जयंत पाटलांचा भाजपवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT