Nagpur Assembly Winter Session 2023 Live Updates Breaking News in Marathi by Saam Tv Maharashtra Hiwali Adhiveshan 2023 Live Newsin Marathi- Saam TV
ब्लॉग

Breaking News Live Updates: आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांची मोर्चेबांधणी, नाशिकमध्ये कांदा आंदोलनानंतर राजकीय भेटीगाठी

Maharashtra Breaking News Live Updates: आज ११ डिसेंबर २०२३, देश विदेशासह महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Satish Daud

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांची मोर्चेबांधणी, नाशिकमध्ये कांदा आंदोलनानंतर राजकीय भेटीगाठी

आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर शरद पवार यांची नाशिकमध्ये मोर्चेबांधणी सुरु केली आहे. कांदा आंदोलनानंतर शरद पवारांनी नाशिकमध्ये राजकीय भेटीगाठी केल्या आहेत.

अजित पवार गटात गेलेले माजी खासदार देविदास पिंगळे यांचे बंधू आणि सध्या शरद पवार गटात असलेले गोकुळ पिंगळे यांच्या निवासस्थानी शरद पवार यांनी भेट घेतली.

पिंगळे यांच्या भेटीनंतर शरद पवार मनसेचे माजी आमदार नितीन भोसले यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी नाशिकमध्ये चाचपणी सुरू केली आहे.

महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत शरद पवार यांचं मोठं विधान

लोकसभेच्या नाशिक मतदारसंघाबाबत शरद पवार यांनी मोठं विधान

नाशिक लोकसभा मदारसंघाबाबत ठाकरे गटाचा दावा खोडला

नाशिक लोकसभेची जागा ठाकरे गटाला सोडल्याचा ठाकरे गटाचा दावा पवारांनी खोडला

महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत शरद पवार यांचे महत्वाचे विधान

१९ तारखेला दिल्लीतील इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरणार

मनोज जरांगे पाटलांना डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला

मनोज जरांगे यांची तब्येत बिघडली असून डॉक्टरांनी त्यांना विश्रांती करण्याचा सल्ला दिला आहे. मनोज जरांगे पाटील हे धाराशिव दौऱ्यावर असून लोहरा तालुक्यातील माकणी येथे भाषण करता करता अचानक स्टेजवर बसले. यावेळी त्यांनी स्टेजवर बसून भाषण केलं आहे. त्यानंतर डॉक्टरांनी स्टेजवर त्यांची वैद्यकीय तपासणी केली आहे. त्यामुळे जरांगे आता दौरा सोडून आराम करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Breaking News Live Updates: सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर उद्धव ठाकरेंचं ट्वीट; म्हणाले, 'याची गॅरंटी कोण देईल?'

२०१९ ला ३७० कलम हटवण्याच्या निर्णयाला आम्ही पाठींबा दिला होता, तो निर्णय सर्वोच्च न्यायालयानं कायम ठेवला, त्याचं मी स्वागत करतो, असं म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

न्यायालयानं सप्टेंबरपर्यंत निवडणूका घ्यायला सांगितल्यात. त्या निवडणूका घेण्यापूर्वी जर का पाकव्याप्त काश्मिर घेऊ शकलो, तर संपूर्ण काश्मिरमध्ये एकत्र निवडणूका झाल्यास देशवासियांना आनंद होईल, असं ठाकरे यांनी म्हटलं आहे.

परिस्थितीमुळे घर सोडून गेलेले काश्मिरी पंडीत निवडणूकांपूर्वी पुन्हा सगळेच्या सगळे काश्मिरमध्ये परत येतील ह्याची गॅरंटी कोण देईल? पंतप्रधान ह्याची गॅरंटी देतील? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.

काश्मिरी पंडीतांना एकमेव हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ह्यांनी महाराष्ट्रात आसरा दिला होता. ते निवडणुकीपूर्वी घरी परततील आणि खुल्या वातावरणात ते मतदान करू शकतील का? असा सवाल देखील उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.

Breaking News Live Updates: आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक, नागपुरात भव्य मोर्चा

धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण मिळावं या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक झाला आहे. नागपुरातील यशवंत स्टेडियमवरून धनगर बांधवांनी मोर्चा काढला असून या मोर्चात मोठ्या संख्येने धनगर बांधव सहभागी झाले आहेत. येळकोट येळकोट जय मल्हारच्या घोषणा देत हा मोर्चा विधानभवनाकडे निघाला आहे.

या मोर्चात प्रकाश अण्णा शेंडगे, माजी खासदार विकास महात्मे, विदर्भाचे धनगर समाज नेते दिलीप येडतकर सहभागी, थोड्याच वेळात आमदार गोपीचंद पडळकर हे सुद्धा सहभागी होणार आहेत.

Breaking News Live Updates: नाशिक जिल्ह्यात कांदा प्रश्न पेटला; स्वतः शरद पवार उतरले रस्त्यावर

कांदाप्रश्नी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार स्वतः रस्त्यावर उतरले आहेत. केंद्रानं कांद्यावर लादलेल्या निर्यातबंदी विरोधात शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन सुरू झालं असून कांदा प्रश्नी पहिल्यांदाच शरद पवार थेट रस्त्यावर उतरलेत.

मुंबई आग्रा महामार्गावर चांदवड चौफुलीवर रास्ता रोको आंदोलनास सुरूवात झालीये. निर्यातबंदीसह कांद्याबाबतच्या केंद्र सरकारच्या धरसोड धोरणांचा निषेध करण्यासाठी मुंबई आग्रा महामार्गावर आंदोलन केलं जातंय. आंदोलनादरम्यान शरद पवार शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

Breaking News Live Updates: ठाकरे आणि शिंदे आज आमने-सामने येणार? हिवाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आज नागपूर हिवाळी अधिवेशनासाठी उपस्थित रहाणार आहेत. सकाळी ११:१५ वाजता त्यांचे आगमन नागपूर विमानतळावर होणार आहे. त्यानंतर दुपारी १२:३० वाजता उद्धव ठाकरे विधान भवनात दाखल होतील. संध्याकाळी ५ वाजता हॅाटेल रेडिसनमध्ये ठाकरे गटाची बैठक होणार आहे. या बैठकीला विदर्भातील महिला आघाडीच्या प्रतिनिधी उपस्थित रहाणार आहेत. त्यानंतर रात्री ८ वाजता उद्धव ठाकरे यांच्या सोबत आमदारांचे स्नेहभोजन होणार आहे.

Breaking News Live Updates: कांदा निर्यात बंदीविरोधात शेतकरी आक्रमक; शरद पवारही उतरणार मैदानात

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा आजपासून सुरू होत असून शेतकरी प्रश्न आणि मराठा आरक्षणावरून विरोधक सरकारला धारेवर धरण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसानंतर शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही? असा आरोप विरोधक करीतत आहे.

दुसरीकडे कांद्या प्रश्नावर शेतकरी आक्रमक झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार देखील शेतकऱ्यांच्या मदतीला मैदानात उतरले आहेत. आज शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करण्यात येणार आहे. यासह महाराष्ट्रातील इतर घटनांचा वेगवान आढावा आपण या लाईव्ह ब्लॉगमधून घेणार आहोत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Upvasachi Kachori: आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची कचोरी, घरीच फक्त १० बनवा

Sushil Kedia : ठाकरेंची माफी मागितल्यावर केडियाची आणखी एक पोस्ट, थेट अमित शहा यांचेच नाव घेतलं

Varai Khichdi Upvas : उपवासाला साबुदाणे कशाला? झटपट करा वरईची खिचडी, नोट करा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अजित पवारांची निवड

Thackeray Brothers Reunion: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने विरोधकांची पायाखालची वाळू सरकली – शिवसैनिकांची प्रतिक्रिया|VIDEO

SCROLL FOR NEXT