महाडच्या चवदार तळ्यातील त्या चौदा विहिरीचे झाले बऱ्याच वर्षांनी दर्शन..... - राजेश भोस्तेकर
ब्लॉग

महाडच्या चवदार तळ्यातील त्या चौदा विहिरीचे झाले बऱ्याच वर्षांनी दर्शन.....

22 जुलै रोजी आलेल्या भीषण पुरामुळे चवदार तळ्यातील पाणी दूषित झाल्याने यातील पाण्याचा पूर्ण उपसा नगरपरिषदेने केल्याने तळ्याच्या खाली असलेल्या विहिरी आता स्पष्ट दिसू लागल्या आहेत

साम टिव्ही

महाड : महाडच्या Mahad चवदार तळ्यात चौदा विहिरी असल्याने या तळ्याला Lake चवदार तळे म्हणून संबोधले जाते, असे येथील जाणकारांचे मत आहे. चवदार तळ्यात चौदा विहीरी आहेत हे आताच्या पिढीला माहीतही नसेल. 22 जुलै रोजी आलेल्या भीषण पुरामुळे Floods चवदार तळ्यातील पाणी दूषित झाल्याने यातील पाण्याचा पूर्ण उपसा नगरपरिषदेने Nagar Parishad केल्याने तळ्याच्या खाली असलेल्या विहिरी Wells आता स्पष्ट दिसू लागल्या आहेत. त्यामुळे सध्या या विहिरी पाहण्यासाठी महाडकरांची गर्दी चवदार तळे येथे दिसू लागली आहे. Fourteen wells in mahad lakes visible

22 जुलै रोजी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने Heavy Rains महाड शहरात पूरस्थिती निर्माण झाली. दरवर्षी येणाऱ्या पुराच्या शक्यते पेक्षा यावेळी आलेला पूर महाडकरांसाठी आठवणीत राहणारा ठरला आहे. महाड शहरात दरवर्षी सावित्री नदीला Savitri River पूर आल्यानंतर पुराचे पाणी शिरते. मात्र चवदार तळे आणि परिसरात आतापर्यत पुराचे पाणी शिरले नव्हते.

मात्र यावेळी चवदार तळ्यालाही या पुराचा मोठा फटका बसला. यावर्षीच्या पुराचे वैशिष्ट्य म्हणजे पूर ओसरल्यानंतर सगळीकडे मातीचा चिखल पसरलेला दिसत होता. चवदार तळ्यातील पाणीही दूषित होऊन कचरा साचला होता. Fourteen wells in mahad lakes visible

चवदार तळे हे राष्ट्रीय स्मारक असल्याने तळ्यातील दूषित पाणी बाहेर काढून तळे स्वच्छ करण्याचा निर्णय महाड नगरपरिषद प्रशासनाकडून घेण्यात आला. त्यानंतर चवदार तळ्यातील पूर्ण पाणी उपसण्यासाठी यंत्रणा कार्यन्वित करण्यात आली. तळ्यातील पूर्ण पाणी उपसले असल्याने खालच्या भागात असलेल्या चौदा विहिरींही आता स्पष्ट दिसू लागल्या आहेत. या चौदा विहिरीमुळेच या तळ्याला चवदार तळे हे नाव पडले असल्याचे बोलले जात आहे. या विहिरींही चिखल मातीने भरल्या असून त्यातील पाणी आणि गाळ काढून स्वच्छ केले जाणार आहे. Fourteen wells in mahad lakes visible

चवदार तळे स्वच्छ करण्याच्या हेतूने पाण्याचा उपसा केल्याने आतील चौदा विहिरींही दिसू लागल्या आहेत. चौदापैकी 12 विहिरी ह्या गोलाकार असून दोन विहिरी चौकोनी आहेत. अनेक वर्षानंतर चवदार तळ्यातील पाण्याचा उपसा केल्यामुळे या विहिरीचे दर्शन झाले आहे. त्यामुळे सध्या या विहिरी बघण्यासाठी चवदार तळ्यावर गर्दी दिसू लागली आहे.

Edited By - Amit Golwalkar

हे देखिल पहा -

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: सांगलीत जिल्ह्यात कोण जिंकलं? वाचा एका क्लिकवर

Maharashtra Election Result: उल्हासनगरात राष्ट्रवादीला जबर धक्का! भाजपच्या कुमार आयलानींचा मोठा विजय

Sunil Tatkare: खरी राष्ट्रवादी कोणती? अखेर जनतेनं उत्तर दिलचं, सुनिल तटकरेची प्रतिक्रिया

Vidhan Sabha Election Result : अकोल्यात बंडखोरीचा भाजपला फटका; काँग्रेसचे साजिद खान पठाण विजयी

Nanded News : नांदेडमध्ये मतमोजणीदरम्यान दोन गटात तूफान राडा

SCROLL FOR NEXT