उज्जैनमधील कालभैरवाच्या डोक्यावर मराठा मावळा पगडी आली कुठून? वाचा इतिहास Saam tv
ब्लॉग

Ujjain kal bhairav : उज्जैनमधील कालभैरवाच्या डोक्यावर मावळा पगडी आली कुठून? पराक्रमाची गाथा वाचा!

Kaal Bhairav Temple Ujjain : उज्जैनमधील कालभैरवाच्या डोक्यावरील मराठा मावळा पगडी मराठा साम्राज्याच्या पराक्रमाची साक्ष असून, शूरवीर पराक्रमी महादजी शिंदे यांनी ती भगवान कालभैरवाच्या डोक्यावर घातली होती. हा इतिहास जाणून घ्या.

Saam Tv

नीलेश खरे | मुख्य संपादक, सकाळ

उज्जैनमधील कालभैरवाच्या डोक्यावरील मराठा मावळा पगडी मराठा साम्राज्याच्या पराक्रमाची साक्ष आहे. १७७१ साली महादजी शिंदे यांच्या नेतृत्वात मराठा मावळ्यांनी रोहिल्लाला धूळ चारत दिल्ली काबीज केली. त्यानंतर मुघल सम्राट शाह आलम दुसरा याला पुन्हा दिल्लीत आणलं गेलं.

अफगाणींनी जबिता खान रोहिल्ला याला गादीवर बसवलं. मराठ्यांनी त्याच रोहिल्लाला चारीमुंड्या चीत केलं. पानीपतमध्ये पराभूत झाल्यानंतर वीरयोद्धा महादजी शिंदे यांनी शपथ घेतली. जोपर्यंत मराठ्यांचा भगवा दिल्लीवर फडकणार नाही; तोपर्यंत डोक्यावर पगडी घालणार नाही. त्यानंतर दिल्लीत मराठ्यांचा झेंडा डौलात फडकवण्याचं स्वप्न पूर्ण झालं आणि महादजी शिंदे यांनी शपथ पूर्ण केली. कालभैरवाच्या डोक्यावर मराठा मावळा पगडी घातली. त्यानंतर स्वतःच्या डोक्यावर घातली. या पराक्रमाची गाथा उज्जैन कालभैरव मंदिरातील पुजाऱ्यांनी 'साम टीव्ही'ला सांगितली.

काय आहे उज्जैनमधील कालभैरवाची गाथा?

स्थानिक परंपरेनुसार, पानीपतमधील तिसऱ्या युद्धात मराठ्यांचा पराभव झाल्यानंतर मराठा सेनापती महादजी शिंदेंनी उत्तर भारतात मराठ्यांचं साम्राज्य स्थापित करण्यासाठी स्वत:ची पगडी मंदिरातील देवाला अर्पण केली.

कालभैरव यांना उज्जैननगरीचे सेनापती देखील म्हटलं जातं. तसेच अनेक इतिहास जाणकारांकडून सांगितलं जातं की, महादजी शिंदे यांनी विजयासाठी स्वत:ची पगडी अर्पण केली. तसेच त्यांनी मंदिरात जाऊन देवाकडे विजयासाठी साकडं घातलं होतं. युद्धात विजयी झाल्यानंतर मंदिराचं जीर्णोद्धार करण्याचंही वचन घेतलं. महादजी शिंदे यांनी युद्धात विजयी पताका फडकवल्यानंतर हे वचन पाळलं आणि मंदिराचा जीर्णोद्धार केला, तसेच मराठा मावळा पगडी भगवान कालभैरवाच्या डोक्यावर घातली.

महादजी शिंदेंबद्दल जाणून घेऊयात...

महादजी शिंदे यांचा जन्म हा ३ डिसेंबर १७३० साली झाला अशी नोंद आहे. महादजी शिंदे हे राणोजीराव शिंदे यांचे पाचवे पुत्र. त्यांनी माळवा मुघलांच्या हातातून ताब्यात घेतला. त्यांनी लहानपणीच लष्करी शिक्षण घेतलं होतं, अशीही नोंद आहे.

पुण्याशी खास कनेक्शन

पुण्यातील शिंदे छत्री स्मारक हे मराठा सेनापती महादजी शिंदे यांना समर्पित आहे. त्यांनी १७६० ते १७८० या काळात पेशवांच्या अधीन राहून त्यांनी मराठ्यांचा सेनापती म्हणून काम केलं. त्यांच्या कार्याचा पुण्यातही नावलौकिक आहे. १७९४ साली स्मारक परिसरात फक्त भगवान शिवाचं मंदिर होतं. ते स्वतः महादजी शिंदे यांनी बनवलं होतं. त्याचवर्षी १२ फेब्रुवारी १७९४ साली महादजी शिंदे यांचं निधन झालं. याच स्मारक परिसरात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पुढे त्यांचं स्मारक हे त्यांच्या वंशजांनी उभारलं.

पुण्यातील वानवडी परिसरातील महादजी शिंदे छत्री. (wikipedia)

उज्जैन महाकाल मंदिराकडे कसं जायचं?

उज्जैन शहर हे मुंबईपासून ६०० किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर आहे. उज्जैनला अगदी कमी तासांत पोहचायचं असेल तर विमान प्रवास हा चांगला पर्याय आहे. तर तिथं ट्रेननेही जाता येते. मात्र, उज्जैनला ट्रेनने जायला साधारण ११ तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ लागू शकतो.

कालभैरवाचं मंदिर हे भारतात मध्य प्रदेशच्या उज्जैन शहरात आहे. उज्जैन शहर हे भगवान कालभैरवाला समर्पित करण्यात आलं आहे. शिप्रा नदीजवळील या मंदिरात दररोज शेकडो भक्त हजेरी लावत असतात. या मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण असतं. कालभैरवाचं मंदिर हे ६००० वर्षे जुने असल्याचं सांगितलं जातं. हिंदूंची कालभैरवावर मोठी श्रद्धा आहे. उज्जैन शहरातील जेलरोडजवळ हे मंदिर आहे. उज्जैन बस स्टँडपासून साधारण ४.१ किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pregnancy Mental Health: गर्भधारणेदरम्यान मानसिक तणाव टाळण्यासाठी 'या' गोष्टी ठेवा लक्षात

Salman Khan : सलमान खाननं 'बिग बॉस 19'साठी किती घेतलं मानधन? आकडा वाचून पायाखालची जमीन सरकेल

Manikrao Kokate: कृषीमंत्री कोकाटेंवर कारवाईची टांगती तलवार? राजीनाम्याचं काऊंटडाऊन सुरू? CM दिल्ली दौऱ्यावर, नेमकं काय घडलं?

Diabetes without blood test: शरीरात हे ६ बदल दिसले तर समजा मधुमेह झालाय; ब्लड टेस्ट न करताही डायबेटीजचा धोका येईल लक्षात

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

SCROLL FOR NEXT