Pune News: महादजी शिंदेंची आठवण करून देत ज्योतीरादित्य शिंदे यांनी सांगितलं त्यांचं 'पुणे कनेक्शन', म्हणाले...

Jyotiraditya Scindia: पुण्याशी कौटुंबिक आणि हृदयाचा संबंध आहे. पुण्याला नागरी विमान वाहतुक सुविधा देण्याचा पूर्ण प्रयत्न आहे, असे ज्योतीरादित्य शिंदे म्हणाले.
Jyotiraditya Scindia In Pune
Jyotiraditya Scindia In Pune Saam Tv
Published On

Jyotiraditya Scindia In Pune:

पुण्याशी कौटुंबिक आणि हृदयाचा संबंध आहे. महाराष्ट्रातील मुख्य शहर म्हणून पुण्याला नागरी विमान वाहतुक सुविधा देण्याचा पूर्ण प्रयत्न आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा विकास व प्रगती हे आमचे उद्दिष्ट आहे, असे केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतीरादित्य शिंदे आज पुण्यात म्हणाले आहेत.

पुण्यात नव्याने बांधण्यात आलेल्या विमानतळाचा उद्घाटनपूर्व आढावा घेण्यासाठी ते पुणे विमानतळावर आले होते. यानिमित्ताने त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी शिंदे बोलत होते.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Jyotiraditya Scindia In Pune
Amazon वर उद्यापासून सुरु होणार सिक्रेट सेल, प्रत्येक वस्तू फक्त 1 रुपयात मिळेल; नेमकी काय आहे ऑफर?

''माझ्या कुटुंबाचे प्रमुख महादजी शिंदे''

आपले मनोगत व्यक्त करताना ते पुढे म्हणाले की, पुणे हे आमचे मुख्य शहर आहे, ऐतिहासिक, संस्कृतीचा वारसा, छत्रपती शिवाजी महाराज व पेशवे सम्राज्याची राजधानी, माझ्या कुटुंबाचे प्रमुख महादजी शिंदे यांचे देखील हे पुणे आहे. या शहराचा विकास आणि नागरी विमान वाहतुकीमधील याची प्रगती पंतप्रधानांचा संकल्प आणि आदेश याने विकास तसेच प्रगतीच्या संस्कृतीची सुरुवात झाली आहे.  (Latest Marathi News)

पुण्याची क्षमता मोठी आहे. माहिती आणि तंत्रज्ञान, शिक्षण, निर्मिती या सर्वाचे देशपातळीवरील केंद्र पुणे आहे. पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार या सर्वांची एकच विचारधारा आहे की पुण्याला नागरी विमान वाहतुकीमध्ये अग्रस्थानी आणायचे आहे. त्याच विचारांचा परिपाक म्हणजे हे नवीन टर्मिनल आहे. याची तयारी आता पूर्ण झाली आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Jyotiraditya Scindia In Pune
Yuva Sahitya Akademi Award: ‘स्वत:ला स्वत:विरुद्ध उभं करताना’ कविता संग्रहास ‘युवा’ साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान

52 हजार स्क्वेअर मीटर जागेत हे विमानतळ उभे राहिले आहे. भविष्यातील गरजेच्या दुप्पट क्षमतेचे हे टर्मिनल आहे. 2014 मध्ये देशातील 17 शहरांसोबत पुणे विमानतळ जोडले गेले होते व गेल्या 9 वर्षात ते 37 शहरांशी जोडले गेले आहे. सोबत सिंगापूर व दुबई या आंतरराष्ट्रीय थेट विमानसेवा देखील सुरू आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

माझी अशी धारणा आहे की विमानतळ हे काच आणि सिमेंटची रचना नाही तर शहरात येणाऱ्या प्रवश्यासाठी शहराचा अनुभव करण्यासाठी प्रथम द्वार आहे. विमानतळाच्या यातील आणि बाहेरील बाजूस त्या शहराचा, क्षेत्राचा आणि राज्याचा इतिहास-संस्कृती प्रतिबिंबीत होणे अनिवार्य आहे. देशामध्ये वेगवेगळी आणि अलौकिक संस्कृती आहे; यासर्वाचे प्रदर्शन विमानतळांवर व्हावे, असे वाटते, असे मत ज्योतीरादित्य शिंदे यांनी व्यक्त केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com