Nagpanchami 
ब्लॉग

कोब्रा असो की बिनविषारी साप; त्‍यांची निडर पकड.. त्‍यांनी दिले अडीच हजारांहून अधिक सापांना जीवदान

नुसता साप दिसला तरी प्रत्‍येकाच्‍या पायाखालची जमीन सरकते. सापाला पाहून पळतात, तर काही जण साप म्‍हणजे आपला शत्रूच म्‍हणून काठी घेत सापाला मारतात.

Rajesh Sonwane

जळगाव : नुसता साप दिसला तरी प्रत्‍येकाच्‍या पायाखालची जमीन सरकते. सापाला पाहून पळतात, तर काही जण साप म्‍हणजे आपला शत्रूच म्‍हणून काठी घेत सापाला मारतात. मात्र असे होऊ नये म्हणून सर्पमित्र आधीच सापाला पकडून त्‍याला जीवदान देत सुरक्षित ठिकाणी सोडतात. अगदी बिनविषारी असो की कोब्रा जातीचा विषारी साप असो; त्‍याला निडरपणे पकडण्याची कला सर्पमित्रांची आहे. (jalgaon-news-nagpanchami-story-Save-more-than-two-and-a-half-thousand-snakes-in-a-year-and-half)

वन्यजीव संरक्षण संस्था १३ वर्षांपासून सर्पसंवर्धनासाठी कार्यशील आहे. गेल्या चार वर्षांपासून जळगाव, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यातील गाव पातळीवर जाऊन सर्प मानव आणि पर्यावरण तसेच सर्पदंश बचाव, काळजी आणि प्रथमोपचार यावर गावागावांत चलचित्र सादरीकरण, पथनाट्य, सर्प माहिती पुस्तक मोफत वितरण आणि बॅनरच्या सहाय्याने जनजागृती केली जात आहे. इतकेच नाही तर साप दिसल्‍याचा नुसता फोन आला तरी तत्‍परतेने तेथे जाऊन साप पकडण्याचे कार्यही करत आहेत.

अडीच हजारांहून अधिक सापांना जीवनदान

जळगाव जिल्ह्यात संस्थेचे ४० सर्पमित्र मानवी रहिवासात मारले जाणारे साप वाचविणे आणि सर्प जनजागृती करण्यासाठी कार्यरत आहेत. वन्यजीव संरक्षण संस्थेतर्फे मागील दीड वर्षात आतापर्यंत दोन हजार ६४८ सापांना जीवदान दिले आहे. यात २५६ नाग, १४० घोणस, १५४ मण्यार, ८ फुरसे आणि उर्वरित निमविषारी आणि बिनविषारी सापांचा समावेश आहे.

रात्री-अपरात्रीही तत्‍पर

सर्पमित्र दिवसाच नव्‍हे तर रात्रीदेखील तत्‍पर राहतात. जळगावातील आशाबाबानगरात मध्‍यरात्रीनंतर घराच्‍या छतावर कोब्रा असल्‍याचा फोन सर्पमित्रास आला होता. त्‍याच क्षणी येऊन कोब्रा जातीचा साप पकडून सोडला होता. यामुळे भयभीत झालेल्‍या कुटुंबाचादेखील जीव वाचला होता.

यंदा राबवतायत आगळेवेगळे अभियान

पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता शेतकरी आणि शेतमजुरांना सर्पदंश होण्याचे प्रमाण अधिक असते. ते कमीत कमी झाले पाहिजे; तसेच सर्पदंश आणि मृत्यू प्रमाणदेखील शून्य झाले पाहिजे. या उद्देशाने शून्य सर्पदंश मृत्यू अभियान संस्‍थेतर्फे राबविले जात आहे. संस्थेची एक टीम शेताच्या बांधावर आणि खेडेगावात झाडे लावून जनजागृती करत आहे. या पथकात जळगाव जिल्ह्यात बाळकृष्ण देवरे, जगदीश बैरागी, राजेश सोनवणे, गौरव शिंदे, सतीश कांबळे, नंदुरबारमधून सागर निकुंभे, नाशिक-नांदगावमध्ये प्रभाकर निकुंभ, जयेश पाटील, धीरज शेकोकारे यांचा समावेश आहे.

हे आहेत सर्पमित्र

वन्यजीव संरक्षण संस्थेतर्फे अध्यक्ष रवींद्र फालक, सचिव योगेश गालफाडे, वासुदेव वाढे, राहुल सोनवणे, सतीश कांबळे, नीलेश ढाके, बापू कोळी, किरण कोळी, शुभम पवार, गणेश सोनवणे, प्रदीप शेळके, विनोद सोनवणे, स्कायलेब डिसूजा, अरुण सपकाळे, सुरेंद्र नारखेडे, अमन गुजर, ऋषी राजपूत, भय्या राजभीर, भरत शिरसाठे, मुकेश सोनार, पंकज कोळी, दिनेश कोळी, रितेश सपकाळे, कुशल अग्रवाल, अमोल देशमुख, अभिषेक ठाकूर, प्रसाद सोनवणे, दुर्गेश आंवेकर, तुषार रंध्ये, गणेश सपकाळे, विनोद बुवा, कल्पेश तायडे हे सर्पमित्र सेवा देत आहेत.

नागरिकांना कोणताही सर्पदंश असला तरी घाबरून न जाता तत्काळ प्रथमोपचार सुरू करत लवकरात लवकर वैद्यकीय उपचार मिळविण्यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे. याबद्दलच सर्वसामान्य जनतेस जागृत करणे हा आमचा शून्य सर्पदंश अभियानाचा महत्त्वाचा उद्देश आहे. अभियानादरम्‍यान नागरिकांना भेटून सर्पदंशाबाबत येणाऱ्या अडचणी समजून घेत त्यावर उपाययोजना करण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठविणार आहोत.

- बाळकृष्ण देवरे, वन्यजीव संरक्षण संस्था, जळगाव

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT