किरण गोसावीची अटक नेमकी कोणत्या प्रकरणी? सागर आव्हाड
ब्लॉग

किरण गोसावीची अटक नेमकी कोणत्या प्रकरणी?

पुणे पोलीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोसावीला अटक ही 2018 मध्ये एक फसवणुकीची केस होती त्या प्रकरणी करण्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आर्यन खान क्रूझ पार्टी प्रकरणापासून फरार असलेला NCB चा पंच किरण गोसावीला Kiran Gosavi Arrested आज अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी याबद्दल माहिती दिली आहे. माहितीनुसार, आज सकाळी गोसावींची अरेस्ट प्रक्रिया पूर्ण केली आहे. याबद्दल पुणे पोलीस आयुक्त अभिनव गुप्ता यांनी पत्रकार परिषद घेत याबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी यावेळी सांगितलं, गोसावीला अटक ही 2018 मध्ये एक फसवणुकीची केस होती त्या प्रकरणी करण्यात आली आहे.

व्हिडीओ-

'आज (ता. २८) सकाळी 3 वाजता कात्रज मधून अटक गोसावीला अटक करण्यात अली आहे. 2018 मध्ये एक केस होती या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. तेव्हा गोसावी फरार होता. ती केस पेंडिंग आहे, त्यावर कारवाई होणार आहे. गोसावींच्या अटकेसाठी पुणे पोलिसांनी टीम बनवली होती. लखनऊ येथे गोसावी असल्याची माहिती भेटली तेथे पुणे पोलिसांची टीम पोहोचली होती परंतु आज पुण्यातून एक लॉज मधून गोसावीला अटक करण्यात आली आहे.'

पुणे पोलीस आयुक्तांनी माहिती दिली की, 'गोसावी हा लॉज मध्ये राहत असताना, सचिन पाटिल हे नाव वापरत होता. Stop crime organisation नावाने एनजीओ चालवत आहे असं सांगायचा. इम्पोर्ट एक्सपोर्ट चा धंदा असल्याचा दावा करायचा. चिन्मय देशमुखचे जे दावे आहेत त्याची संपुर्ण तपासणी होणार असल्याची आयुक्तांनी स्पष्ट केल. तसेच तसेच फसवलेल्या लोकने पुढे या पोलिसांनी केलं आव्हान केलं आहे.

दरम्यान, 2018 ला किरण गोसावी वर फसवणुकीच्या गुन्ह्यात फरार होता. 2019 मध्ये त्याला फरार घोषित केले होत. पुण्यातील कसबा पीठ परिसरातील चिन्मय देशमुख यांनी 29 मे 2018 रोजी किरण गोसावी विरुद्ध फरासखाना पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला होता.

'त्या' एफआयआरनुसार, गोसावी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हॉटेल मॅनेजमेंटच्या नोकरीची जाहिरात पोस्ट केली होती आणि याच कामासाठी देशमुख हे गोसावीच्या संपर्कात आला होता.

गोसावीने चिन्मय देशमुख यांना मलेशियामध्ये नोकरी देण्याचे आश्वासन दिले आणि त्याबदल्यात त्यांच्या खात्यात 3.09 लाख रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितले, असा आरोप आहे. मात्र किरण गोसावीने पैसे घेऊनसुद्धा चिन्मय देशमुख यांना काम मिळाले नाही. देशमुख यांनी पैसे मागितले असता त्यांनी पैसेही परत केले नाहीत. या प्रकरणी पोलिसांनी गोसावीवर गुन्हा दाखल केला होता. 13 ऑक्टोबर रोजी पुणे शहर पोलिसांनी किरण गोसावी यांच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी केली होती जेणेकरून ते देश सोडून जाऊ नयेत. या महिन्यात 18 ऑक्टोबर रोजी पोलिसांनी शाहबानो कुरेशीला मुंबईतील गोवंडी येथील राहत्या घरातून अटक केली होती. बानो तेव्हा किरणची असिस्टंट होती. देशमुख यांचे पैसे बानोच्याच खात्यात गेल्याचे तपासात उघड झाले होते.

फसवणुकीच्या आणखी तीन गुन्ह्यांमध्ये किरण गोसावीचे नाव आहे. यापैकी 2007 मध्ये अंधेरी पोलिस ठाण्यात आणि 2015-2017 मध्ये ठाण्यातील कापूरबावडी पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल झाले आहेत.

आता पुणे पोलिसांनी किरण गोसावीला अटक केली खरी परंतु, किरण गोसावी हे नाव आर्यन खान क्रूझ पार्टी प्रकरणानंतर चर्चेत आले आहे. चिन्मय देशमुख यांनी दाखल केलेल्या फसवणुकीच्या तक्रारीपासून ते क्रूझ पार्टी प्रकणापर्यंत 'किरण गोसावी' हे नाव आता पुणे पोलिसांपर्यंत आले आहे. त्यामुळे पुणे पोलीस आता गोसावीवर कोणते कलम लावून नेमक्या कोणत्या प्रकरणाची चौकशी करते आणि चौकशी दरम्यान आणखी कोणते नवीन गुन्हे उघडकीस येतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi: मविआला देशापेक्षा आघाडी महत्वाची; अखेरच्या प्रचारसभेत पंतप्रधान मोदींनी विरोधकांचा घेतला समाचार

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

SCROLL FOR NEXT