राहुल गांधींनी राजे- महाराजांचा अपमान केल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली
कतारमध्ये अटक करण्यात आलेल्या ८ भारतीय नौसैनिकांची फाशीची शिक्षा स्थगित करण्यात आलीय. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या हस्तक्षेपानंतर कतारच्या अपील न्यायालयाने हा निर्णय दिलाय. ज्यामध्ये शिक्षा कमी करण्यात आली आहे. कतारमधील भारतीय राजदूत आणि इतर अधिकारी उपस्थित होते, त्यांनी अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांसह न्यायालयात दाद मागितली होती.
पीएपी प्रकल्पाविरोधात भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांचे मुलुंड पूर्व रेल्वे स्थानका बाहेर लाक्षणिक उपोषण सुरू आहे. किरीट सोमय्या यांच्यासह मोठ्या संख्येने मुलुंडकर नागरिक देखील या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
माणगाव बाजार पेठेतील बॅंक ऑफ इंडियाच्या इमारतीच्या टेरेसवरील टॉवरला लागली आग
आग लागल्याने मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक ठप्प, स्थानिकांमध्ये गोंधळ
माणगाव नगरपंचायतीच्या अग्निशमन दलाने मिळवले आगीवर नियंत्रण
अँकर : कोरोनाचा नवा व्हेरिअंट जेएन.1 हा सबव्हेरिअंट असून, याला घाबरण्याचे कारण नाही. देशात हा पसरत चालला असला तरी त्याचे योग्य निदान केले जात आहे. टास्क फोर्सने यापूर्वीच तयार केलेल्या प्रोटोकॉलनुसार रुग्ण हाताळले जात आहेत. केंद्राकडून वेळोवेळी सूचना दिल्या जात आहेत. हा व्हेरीअंट धोकादायक नसल्याने लोकांनी घाबरण्याचे कारण नाही, मात्र प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली.
राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानावरुन निघाले, राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात 40 मिनिटे चर्चा. कांदा प्रश्न, वरळी बीडीडी चाळ आणि पोलिसांचा घरासंदर्भात राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा.
नाशिक जिल्ह्यात डिसेंबर महिन्यातच दुष्काळाच्या झळा. एकट्या सिन्नर तालुक्यात ४२ गावं आणि ३४६ वाड्यांसाठी पुढील ६ महिने करावा लागणार टँकरने पाणीपुरवठा. किमान दीड लाख नागरिकांना बसणार दुष्काळाची झळ. सिन्नर तालुक्यात यंदा सरासरीच्या केवळ ७० टक्केच पाऊस. आगामी काळात साठवण तलाव, विहिरींमधून होणारी पाणीचोरी न थांबवल्यास परिस्थिती आणखी गंभीर बनण्याची शक्यता.
जालना ते परभणी महामार्गावरील वाटूर येथे बंजारा समाजाच्या वतीनं भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय. विमुक्त जाती अ या प्रवर्गात मागच्या अनेक वर्षांपासून बिगर मागास असलेल्या लोकांनी मोठ्या प्रमाणात अवैध घुसखोरी केली आहे.
त्यामुळं बंजारा समाजातील लाभार्थ्यांवर अन्याय होत असून शैक्षणिक आणि नोकरीच्या क्षेत्रातमोठं नुकसान होत आहे.. त्यामुळं गोर सेनेच्या वतीनं वाटूर येथे भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय.
दरम्यान विमुक्त जाती अ मध्ये घुसखोरी करून खोटे प्रमाणपत्र वाटप करणार्या अधिकार्यांवर कारवाई करून त्यासाठी विशेष तपासणी पथकाची स्थापना करावी आणि बोगस प्रमाणपत्र रद्द करावे या मागण्यांसाठी हा रास्ता रोको करण्यात आला.
मागण्या मान्य न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी बंजारा समाजाच्या वतीनं देण्यात आलाय
मागासवर्ग आयोगाच्या विरोधात ओबीसी-व्हीजेएनटी जनमोर्चा आक्रमक
आधी आमच्याशी चर्चा करा, मगच नवे निकष ठरवा
मराठा समाजाचे सामाजिक मागासलेपण ठरवताना आम्हाला विश्वासात घेतलं नाही
मागासवर्ग आयोगाच्या कामाविषयी शंका येत असल्याचा ओबीसी व्ही जे एनटी जनमोर्चाचा आरोप
मागासवर्ग आयोगाच्या कामकाजावर आता सामाजिक संघटनेचा आक्षेप
मागासवर्ग आयोग अध्यक्षना दिलं निवेदन
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार
दुपारी 12.30 वाजता वर्षा बंगल्यावर घेणार भेट
टोल प्रश्न, आणि सध्याच्या राजकीय विषयावर भेटीत चर्चा होण्याची शक्यता
अयोध्येतील सोहळ्याचं भाजप निमंत्रण देणारा कोण? असा सवाल उपस्थित करत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. संपूर्ण देशात नेत्यांना प्रश्न विचारला जातोय तुम्हाला निमंत्रण आलं का, हा भाजपचा कार्यक्रम आहे, राम मंदिर उत्सव नाही, अशी टीका देखील राऊतांनी केली
उत्तर प्रदेश आणि दिल्लीत भाजप सरकार आहे, मला वाटतं प्रभू श्रीरामाच अपहरण केल आहे, भाजपचा कार्यक्रम झाला की आम्ही प्रभू रामचंद्राच्या दर्शनाला जाऊ, आम्हाला आमंत्रणाची गरज नाही आम्ही स्वतःचा जाऊ दर्शनाला, हा भाजपचा कार्यक्रम आहे त्यांना तो करू द्या, असंही राऊतांनी म्हटलं आहे.
सोलापूर ब्रेकिंग
सोलापुरात काँग्रेसला धक्का ; आमदार प्रणिती शिंदे समर्थक माजी नगरसेवक मेघनाथ येमुल यांचा भाजपात प्रवेश सोलापूर पद्मशाली समाजातील मातब्बर नेते म्हणून आहे मेघनाथ येमुल यांची ओळख आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत असंख्य कार्यकर्त्यांसह वेमुल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. येमुल यांनी सलग दोन महापालिका निवडणुकीत भाजप उमेदवाराला पराभवाची धुळ चारली होती.
मागच्या महापालिका निवडणुकीत भाजप उमेदवाराकडून येमुल यांचा निसटता पराभव झाला होता. मेघनाथ येमुल यांच्या भाजप प्रवेशाचा काँग्रेसला सोलापूर पूर्व विभागात मोठा फटका बसण्याची शक्यता. महापालिका निवडणुकीत समीकरण बदलणार.
भरतशेठ पत्र आणतात आणि मी सह्या करतो, माझ्या दृष्टीने या जिल्ह्याचे पालकमंत्री भरतशेठच आहेत, असं म्हणत रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आमदार भरत गोगावले यांना स्वभाव बदलण्याचा सल्ला दिला.
भरतशेठ लोकांवर इतका विश्वास ठेवतात की, त्यांच्यातले किती टक्के लोक त्यांना फसवतात ते मला माहित नाही असंही सामंत म्हणाले. राज्यात जेव्हा शिंदे-भाजप सरकार स्थापन करायचे होते. त्यावेळी कुणाला मंत्रीपद द्यायचं याचा पेच एकनाथ शिंदे यांच्यासमोर होता.
तेव्हा भरत गोगावले यांनी सरकार बनवण्यासाठी स्वत: मंत्रीपद नाकारलं होतं, असा खुलासा देखील उदय सामंत यांनी केला. त्यामुळे पुन्हा भरत गोगावले यांच्या मंत्रीपदाची चर्चा सुरू झाली आहे.
नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात भाज्यांचे दर वधारले असून आठ दिवसापूर्वी 5 ते 10 रुपये जुडीने विकली जाणारी मेथी, कोथिंबीर आता 20 ते 30 रुपयापर्यंत विकली जातेय. दुसरीकडे फ्लॉवर, कोबी, मटारच्या दरात देखील 5 ते 10 रुपयांची वाढ झाली आहे. अवकाळी पाऊस आणि आता पाण्याची असलेली कमतरता यामुळे भाज्यांची आवक घटली असून अशीच परिस्थिती राहिल्यास भाज्यांचे दर गगनाला भिडण्याची शक्यता आहे.
पीएचडी करणारे संशोधक विद्यार्थ्यांसाठी रविवारी राज्यातील 4 शहरातील परीक्षा केंद्रावर ही घेण्यात आली होती. परंतु संभाजीनगर मधील देवगिरी महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांनी आधीच फोडलेल्या बंद लिपाफ्यातील प्रश्नपत्रिका देण्यात आल्या होत्या असा आरोप विद्यार्थ्यांनी केला.
त्यामुळे मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला आणि जो पेपर दिला होता. 2019 वर्षाच्याच सेट परीक्षेचा पेपर देण्यात आला होता, असा धक्कादायक आरोपही विद्यार्थ्यांनी केला होता. दरम्यान ही परीक्षा रद्द करण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली होती.
त्याची प्रशासनाने गांभिर्याने दखल घेतली असून पीएचडी फेलोशिप परीक्षा अखेर रद्द करण्यात आली आहे. आता पुन्हा 10 जानेवारीला ही परीक्षा घेतली जाणार असल्याचं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जाहीर केलं आहे.
काँग्रेस पक्षाचा आज स्थापन दिवस असल्याने नागपूरमध्ये ४० एकरवर आज काँग्रेसची भव्य सभा होणार आहे. या सभेला सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहे. नागपुरातील वाहतुकीत मोठा बदला करण्यात आला आहे.
मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे. अंतरवाली सराटीत जाऊन ते आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार आहे.
राम मंदिराचं काम अंतिम टप्प्यात आलं असून येत्या २२ जानेवारीला मंदिराचं उद्घाटन होणार आहे. त्यासाठी सरकारच्या वतीने जोरदार तयारी सुरू आहे.
उत्तर भारतात कडाक्याच्या थंडी जाणवत आहे. अनेक शहरांवर धुक्यांची चादर पसरली असून शाळांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यासह देशविदेश आणि महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट वाचा एका क्लिकवर...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.