मुंबईतील पायी मोर्चात 3 कोटी मराठा समाज सहभागी होईल, असा दावा मनोज जरांगे यांनी केला आहे. यावरून ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी जरांगे यांच्यावर टीका केली आहे. मुंबईत घेऊन जाण्यासाठी राज्यात मराठा समाजाची संख्या 3 कोटी तरी आहे का? असा सवाल करत तायवाडे यांनी जरांगेंवर निशाणा साधला आहे.
पुण्यातील कात्रज बोगद्यात मोठा अपघात झाला आहे. या बोगद्यात पाच गाड्या एकमेकांना धडकल्या आहेत. बोगद्यातील गाड्या बाजूला काढण्याचे काम सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
साताऱ्यावरून मुंबईच्या दिशेने सर्व गाड्या जात होत्या. बोगद्यात अचानक एका वाहनाने ब्रेक दाबल्याने पाठीमागून येणाऱ्या गाड्या एकमेकांना धडकल्या. अपघातात एक महिला जखमी झाली आहे.
महाराष्ट्रातील कांग्रेस नेत्यांची आज दिल्लीत बैठक. मुकुल वासनिक यांच्या निवासस्थानी सायंकाळी ४ वाजता होणार बैठक. नाना पटोले, विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण बैठकीला उपस्थित असतील. राज्यातील लोकसभा जागा वाटपसंदर्भात होणार बैठकीत चर्चा.
नवी दिल्ली - वंचित बहुजन आघाडीच्या प्रस्तावावर ३१ तारखेला बैठक होणार
शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते एकत्र बसून निर्णय घेणार
वंचितला महाविकास आघाडीमध्ये घेण्याच्या निर्णयावर चर्चा
मुंबईत तिन्ही पक्षांचे नेते एकत्र बसून निर्णय घेणार, सूत्रांची माहिती
कोरोनाच्या नव्या व्हेरीएंटच्या पार्श्वभूमीवर साई संस्थान सतर्क झालं आहे. मंदिर परिसरात 'नो मास्क नो दर्शन'चे फलक झळकले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री विखे यांनी कोरोना संदर्भात सूचना दिल्या होत्या. यामुळे अनेक भाविक मास्कसह साई समाधीचे दर्शन घेत आहेत. आगामी नवीन वर्षाचे होणारी गर्दी लक्षात घेता साईबाबा संस्थानच्या भाविकांना सूचना दिल्या आहेत. मास्क घालूनच दर्शन घ्या, असे आवाहन साईबाबा संस्थेने भाविकांना केले आहे.
अहमदनगरमधून एक मोठी बातमी समोर आलीये. 31 डिसेंबर ते 2 जानेवारीपर्यंत पुण्याला जाणाऱ्या सर्व वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. भीमा कोरेगाव शौर्य स्तंभाला अभिवादनाला होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर 31 डिसेंबर ते 2 जानेवारीपर्यंत पुण्याला जाणाऱ्या सर्व वाहतुकीत बदल करण्यात आलेत. अहमदनगरवरून पुण्याकडे जाणारी सर्व वाहतूक दौंड सोलापूर महामार्गाने वळवण्यात आलीये. अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी याबाबत आदेश काढलाय.
कोल्हापुरात पार्किंगच्या नावाखाली कोल्हापुरातील काही महाभागांकडून पर्यटकांची लूट
अंबाबाई दर्शनाला आलेल्या पर्यटकांकडून पार्किंगसाठी जागा देतो सांगत शंभर ते दोनशे रुपये उकळण्याचा प्रकार
मागील आठवड्यात अनेक पर्यटकांकडून हजारो रुपये उकळले
खाजगी वाहनांसाठी ठरवून दिलेल्या पार्कींगची जागा फुल्ल झाल्यानंतर पर्यटकांची लूट
अजूनही काही जणांकडून पार्कींगच्या नावाखाली पर्यटकांची लुट
नववर्ष स्वागत आणि दोन दिवसांच्या सुट्टीच्या पार्श्वभूमीवर या लुटारुवर नजर ठेवण्याची गरज
अलीकडच्या काळात बुलढाणा जिल्ह्यात घरफोडी, दुचाकी चोरी, शेती साहित्य चोरी यासारख्या घटनेत मोठी वाढ होतांना दिसत आहे, तर आता चोरट्यांनी आपला मोर्चा शहरात फिरणाऱ्या जनावरांकडे देखील वळवल्याचे समोर आले आहे.
नांदुरा शहरातील एकूण १७ गाढव चोरीला गेल्याची घटना समोर आली असून, अब्दुल रहीम अब्दुल सत्तार यांनी नांदुरा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मराठा आरक्षणासंदर्भात शिंदे समितीच्या कामाचा आढावा मुख्यमंत्र्यांनी सह्याद्री अतिथीगृहावर बैठक बोलवल्याची सूत्रांची माहिती
एकीकडे जरांगे पाटील यांच्याकडून आंदोलनाची तयारी केली जात असताना दुसरीकडे सरकारकडून हालचालींना वेग
शिंदे समितीसोबत मुख्यमंत्री सह्याद्री अतिथीगृहावर ११:३०वा महत्वाची बैठक करणार असल्याची सूत्रांची माहिती
या बैठकीत आतापर्यंत मराठा आरक्षणाबाबत शिंदे समितीने केलेल्या कामाचा आढावा घेतला जाणार
शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी आमदार अपात्रबाबत सुनावणी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सुरु होण्याची शक्यता
आज राष्ट्रवादी आमदार अपात्र सुनावणीची तारीख निश्चित होणार
विधानसभा अध्यक्ष एकीकडे शिवसेना आमदार पात्र आणि अपात्रतेबाबत निकाल तयार करणार
दुसरीकडे राष्ट्रवादी आमदार अपात्राबाबत सुनावणी सुरु करणार आहेत
विधानसभा अध्यक्षांना दोन्ही काम सोबत करावी लागणार आहेत
शिवसेना आमदार अपात्र बाबतचा निर्णय अध्यक्षांना 10 जानेवारीपर्यंत द्यायचा आहे
13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांनी अत्याचार केल्याची संतापजनक घटना बीड शहरात घडली आहे. किराणा दुकानावर बिस्किट आणण्यासाठी गेलेल्या पीडित मुलीला, दोघा तरुणांनी जबरदस्तीने दुचाकीवर बसवलं.
त्यानंतर एका खोलीवर नेऊन तिच्यावर अत्याचार केला. तर हा घडलेला प्रकार पीडीतेने घरी आल्यावर वडिलांना सांगितला. त्यांनी तातडीने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली.
दरम्यान पीडीतेच्या वडिलांच्या तक्रारीवरून, त्यांच्याच कॉलनीत राहणाऱ्या दोघा नराधमाविरुद्ध बीडच्या शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुरुवारी (२८ डिसेंबर) काँग्रेस पक्षाचा स्थापना दिन होता. या दिनीच काँग्रेला मोठं खिंडार पडलं. बुलढाण्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मुंबईत हा प्रवेशसोहळा पार पडला. भाजप आमदार श्वेता महाले यांच्या नेतृत्वात या कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला आहे.
चिखली येथील पंचायत समितीचे सभापती लक्ष्मण अंभोरे व सदस्य राजू पाटील यांच्यासह 35 पदाधिकाऱ्यांनी भाजपचं कमळ हाती घेतलं आहे.
नांदेड जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाला मोठं खिंडार पडलं आहे. उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब कराळे यांनी खासदार श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला आहे.
कराळे यांच्या प्रवेशामुळे नांदेडमध्ये शिंदे गटाची ताकद वाढल्याचे बोलले जातंय. या पक्षप्रवेशावेळी शिवसेना खासदार हेमंत पाटील, आमदार संतोष बांगरही उपस्थित होते.
आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. जागावाटपावरून महाविकासआघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता आहे. शिवसेना ठाकरे गटाने लोकसभेच्या २३ जागांची मागणी केली आहे. याला काँग्रेसच्या काही नेत्यांनी विरोध केला आहे.
आज लोकसभेच्या जागावाटपाबाबत दिल्लीत महाविकासआघाडीच्या नेत्यांची बैठक आहे. या बैठकीला विजय वडेट्टीवार, नाना पटोले आणि ठाकरे गटाचे काही नेते जाणार असल्याची माहिती आहे.
राम मंदिराच्या उद्घाटनाची तारीख जवळ येत आहे. त्यामुळे अयोध्येतील निमंत्रणावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. दुसऱ्या बाजूला मराठा आरक्षण आंदोलनसाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक झालेत.
त्यांनी काल पत्रकार परिषद घेऊन मुंबईत जाण्याचा मार्ग काय असेल? काय वस्तू सोबत घ्याव्यात? याविषयी माहिती दिली. यासह देश विदेश आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या घडामोडींचे अपडेट जाणून घेऊया एका क्लिकवर
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.