दिलीप कुमार - Saam TV
ब्लॉग

दिलीप कुमार - अभिनयाचे जादूगार!

हिंदी चित्रपट सृष्टीचे अभिनयाचे एकमेव सुलतान युसूफ खान तथा दिलीप कुमार यांचे आज सकाळी निधन झाले. आज सकाळी वयाच्या ९८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भारतीय चित्रपटसृष्टीतला ब्लॅक अँड व्हाईट ते ईस्टमनकलर असा सगळा प्रवास दिलीप कुमार यांनी अनुभवला.

श्रेयस सावंत

हिंदी चित्रपट सृष्टीचे Bollywood अभिनयाचे एकमेव सुलतान युसूफ खान तथा दिलीप कुमार Dilip Kumar यांचे आज सकाळी निधन झाले. आज सकाळी वयाच्या ९८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भारतीय चित्रपटसृष्टीतला ब्लॅक अँड व्हाईट ते ईस्टमनकलर असा सगळा प्रवास दिलीप कुमार यांनी अनुभवला.

दिलीप कुमार यांचा जन्म पाकिस्तान Pakistan मधील पेशावर Peshawar मध्ये झाला होता आणि मग ते भारतात India आले आणि मग सुरू झाला अभिनयाचा Acting एक सुवर्ण प्रवास ज्वार भाटा आणि Bombay talkies या सिनेमापासून त्यांचा अभिन्याला सुरूवात झाली. अंदाज, आझाद, राम ओर शाम, देवदास, आणि मग आला मुगले आझम. या सिनेमातून दिलीप साहब यांनी अवघी सिनेसृष्टी बदलून टाकली.देवानंद, राजकपूर आणि दिलीप कुमार ह्या त्रिदेवांनी सिनेसृष्टीला सुवर्ण काळ दाखवला

दिलीप कुमार यांना मराठी शास्त्रीय संगीत Marathi Classical Music आणि नाटकांबाबत एक विशेष प्रेम होते. ते अनेक मराठी नाटके पाहण्यासाठी आवर्जून येत असत. कोणत्याही गुणी अभिनेत्याचं कौतुक ते नेहमी मनापासून करायचे. खरे तर दिलीप कुमार यांच्या नंतर अनेक अभिनेत्यांनी दिलीप कुमार यांच्याच अभिनेयाचं अनुकरण केलं. अभिनयाची ही कार्यशाळा आज संपली.

दिलीप कुमार अनेक पुरस्कार, पद्मभूषण, दादा साहेब फाळके पुरस्कार यांनी सन्मानित एक विलक्षण अभिनेता. त्यांचा जाण्याने हिंदी सिनेमासृष्टीतल्या एका पर्वाचा अंत झाला. आज सिनेसृष्टीतला अभिनयाचा सुलतान हरपला हेच म्हणावे लागेल.

हे देखिल पहा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Brain Fog: ब्रेन फॉग म्हणजे काय? कारणे कोणती?

Maharashtra Live News Update: यवतमाळच्या स्वस्तिक प्लाझामध्ये आग

Nagpur News : शाळेची सुट्टी बेतली जीवावर; खोल खड्ड्यात बुडून 2 शाळकरी मुलांचा मृत्यू , नागपुरात हळहळ

Vastu Tips For Watch: वास्तुनुसार, घरात घड्याळ कोणत्या दिशेला लावावे?

Monday Horoscope Update : 'या' राशीच्या व्यक्तीने जोडीदाराचा सल्ला घ्यायला विसरु नका, वाचा उद्याचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT