BLOG Saam Tv
ब्लॉग

BLOG: मी टिकली लावणार की नाही?

आजच्या या आधुनिक काळात एक टिकली स्त्रीचं अस्तित्व सिद्ध करणार का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रुपाली बडवे, साम टिव्ही, मुंबई

मंत्रालयात माझ्यासोबत घडलेल्या प्रसंगानंतर राज्यभरात आणि राज्याबाहेरही टिकली-कुंकू वरून मोठी चर्चा सुरू झाली आहे. प्रत्यक्षात आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी यावर मी घेतलेल्या भूमिकेचं स्वागत-कौतुक केलं, तर अनेकजण असेही होते ज्यांनी ट्रोल केलं. यात माझे सगळे सहकारी, मार्गदर्शक, विचारवंत आणि बहुसंख्य लोकांचा सहभाग आहे. एका टिकलीवरून घडलेला हा सगळा प्रकार आता विविध अंगाने महत्वाचा ठरलाय. शहर असो किंवा गावखेडं प्रत्येक स्त्रीला स्वच्छेने जगण्याचा अधिकार आहे आणि तिला तसं जगताही आलं पाहिजे.

मुद्दा हा आहे की, आजच्या या आधुनिक काळात एक टिकली स्त्रीचं अस्तित्व सिद्ध करणार का? प्रत्येक बाई तिच्या आयुष्यात तिला हवं तेव्हा टिकली लावेल ना, पण ती ही तिची इच्छा असेल तरच. यासाठी कोणी कुणावरही सक्ती कशी काय करू शकतं? तिने शिक्षण घ्यायचं, नोकरीत स्वतः ला सिद्ध करायचं, घर सांभाळायचं आणि एवढं करूनही आपला समाज तिच्या क्षमतेवर शंकाच घेणार का?

स्त्रीने कपाळावर टिकली लावायची आणि भांगेत कुंकू लावून मी विवाहित असल्याचं दाखवायचं? वेसण घालावं तशी नथ घालावी आणि डोक्यावर पदर घेऊन चुलीसमोर जुंपून राहायचं ? हातात बांगड्या आणि पायात पैंजणाच्या बेड्या घालून उंबरठ्याच्या आत राहायचं का ? सौंदर्य आणि संस्कृतीच्या नावाखाली महिलांना आणखी किती दिवस तुम्ही जखडून ठेवणार आहात?बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळून आम्हाला कधीच मुक्त केलंय याचा समाजातील पुरुषसत्ताक मनोवृत्तीला कसा काय विसर पडू शकतो? अशी कोणतीही बंधनं पुरुषांना आहेत का ? तर नाही. आपल्या राज्यघटनेने पुरुषांप्रमाणेच स्त्रियांना देखील समप्रमाणात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिलाय.

हो, सावित्रीबाई फुलेंनी आम्हाला शिकवलं आणि घडवलं. म्हणून प्रस्थापित समाजातील लोकांनी माऊलीवर शेण, चिखल आणि दगड फेकले. पण, तरी न डगमगता ती शिकली आणि फक्त साक्षरच नाही झाली तर जोतीबांच्या सोबतीने ज्ञानदानाचं कार्य सुरू ठेवलं. या घटनेच्या निमित्ताने माझ्या आडनावावरून माझी जात विचारली जातेय. होय, मी संघर्षाने पेटलेल्या वस्तीत जन्माला आली आहे. संघर्ष माझ्यासाठी नवीन नाही.

माझे प्रेरणास्त्रोत शिव-फुले-शाहू-आंबेडकर आहेत. मी ज्या क्षेत्रात काम करतेय ते बघा, माझं कर्तृत्व बघा. हे प्रत्येक स्त्रीसाठी ही महत्वाची गोष्ट असावी असं मला वाटतं.आता या सगळ्यानंतर अनेकांनी मला असा प्रश्न विचारलाय की, मी टिकली लावणार की नाही लावणार?

कारण, आपला समाज मला एका वेगळ्या नजरेने बघतोय. तर यावर माझं उत्तर हेच आहे की, ज्यावेळी मला टिकली लावायची असेल तेव्हा मी ती जरूर लावेल आणि मला इच्छा नसेल तेव्हा मी नाही लावणार. काल आणि आज देखील माझा मुद्दा हाच आहे की, टिकली लावणं हा स्वच्छेचा भाग आहे ती सक्ती असू शकत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur : सोलापूरमध्ये सीना नदीचा पूर ओसरला, पण पावसाला पुन्हा सुरुवात |VIDEO

Anya Singh: 'बॅड्स ऑफ बॉलीवूड'मधली आन्या सिंह कोण आहे? शाहरुख खानसोबत आहे खास नातं

Maharashtra Live News Update: करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात भाविकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी

Beed : शेतकऱ्यांच्या कपाशी पिक भुईसपाट; बहिणीचे लग्न करायचं कसं, शेतकऱ्यांनी फोडला टाहो

Solapur Flood : “पावसामुळे पिके बुडाली, माझ्या कुटुंबाची काळजी घ्या”, सोलापुरात अतिवृष्टीमुळे २ शेतकऱ्यांची आत्महत्या

SCROLL FOR NEXT