ब्लॉग

BLOG: बाळाचा बाप कोण? 'पॅटर्निटी टेस्ट'चं प्रमाण का वाढतंय?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

>> ईशान गोखले

आजच्या नव्या युगात नाती जपणं किंवा टिकवणं फार अवघड काम झालं आहे. हल्ली दोन दोन दिवसात नाती निर्माण होतात आणि क्षणार्धात ती विसरलीही जातात. अश्या या युगात नात्यात अविश्वास निर्माण होणं साहजिकच आहे. आणि ही अविश्वासता अगदी नवरा बायकोच्या नात्यातही पहायला मिळते. यामुळे सध्या नवरा बायकोत एकमेकांवर विश्वास नसल्याने 'पॅटर्निटी टेस्ट' करण्याचं प्रमाण लक्षणीय वाढलंय.

नवरा बायकोच्या नात्यात दुरावा आल्याने किंवा नात्यात अविश्वास निर्माण झाल्यामुळे पत्नीच्या पोटी जन्मलेल्या बाळ हे आपलंच आहे का ? हे तपासण्यासाठी पॅटर्निटी टेस्ट करण्याचं प्रमाण वाढलंय. आणि ही टेस्ट करण्याची संख्या एकट्या महाराष्ट्र राज्यात गेल्या दहा वर्षात दहा पटीनं वाढलीये. पॅटर्निटी टेस्ट करणारे सर्वाधिक लोक हे साधारण 22 ते 40 वयोगटातील असतात. बलात्कार, कुमारी मातेच्या बाळाच्या पित्याची ओळख, घटस्फोटानंतर पोटगीचा दावा, घटस्फोटासाठी सज्जड पुरावा मिळवणं, अपघातातील मृतदेहाची ओळख पटवणे, आनुवंशिक रोगाच्या माहितीसाठी देखील अश्या टेस्ट होतात.

'पॅटर्निटी टेस्ट' म्हणजे काय?

- बाळाचे वडील कोण हे तपासण्यासाठी ही टेस्ट करतात

- DNA टेस्ट सारखीच ही टेस्ट असते.

- काही जण या टेस्टलाच DNA टेस्टही म्हणतात

- बहुतांश प्रकरणांत नात्यातील शंकेचे निरसन करण्यासाठी ही टेस्ट करतात.

- अनेकदा घटस्फोट प्रकरण असेल तर बाळाचा मेंटेनन्स कोण करणार हे ठरवण्यासाठी ही टेस्ट केली जाते.

- त्याचप्रमाणे वारसा हक्क ठरवण्यासाठी देखील ही टेस्ट करतात.

- अनेकदा कोर्टाच्या आदेशावरून ही टेस्ट करण्यात आल्याची माहिती आहे.

- मात्र त्यासाठी महिलेची संमती असेल तरच कोर्ट परवानगी देते.

- महिला आणि पुरुष दोघांचीही संमती असल्यास खासगी प्रयोगशाळेतदेखील ही टेस्ट होते.

अनेकदा घटस्फोट प्रकरणात पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतला जातो. महिलेने जन्म दिलेल्या बाळाचे वडील अन्य कुणी आहे हे पटवून देण्यासाठी तक्रारदार 'पॅटर्निटी टेस्ट' करण्याची मागणी करतात. यासाठी त्या महिलेची परवानगी असेल तरच कोर्ट ही टेस्ट करून देते. खासगी प्रयोगशाळांत देखील ही टेस्ट होते. अनेकवेळा केवळ संशय आहे म्हणून खासगी प्रयोगशाळेत ही टेस्ट केली जाते. आणि संशयावरुन टेस्ट करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. अनेकदा कोर्टात दावा भक्कम करण्यासाठीही खासगी प्रयोगशाळेचे अहवाल सादर केले जातात.

कुठे केली जाते ही टेस्ट ? काय प्रक्रिया आहे ?

बाळाची थुंकी, केस, रक्त, किंवा नखे यापैकी एकाचा वापर करून ही टेस्ट होते. ज्याप्रमाणे DNA टेस्ट असते तशीच ही असते. ही टेस्ट करण्यासाठी साधारण 11500 ते 20,000 रुपये खर्च येतो. यातील कोर्ट प्रक्रियेसाठी कलिना येथील सरकारी प्रयोगशाळेतील टेस्ट करणं आवश्यक ठरते. त्यासाठी महिलेने संमती दिल्यावर कोर्ट परवानगी देऊन ही टेस्ट केली जाते. मात्र, पती-पत्नी दोघांची मंजुरी असेल तर खासगी लॅबचे निष्कर्षही ग्राह्य धरले जातात. सरकारी लॅबमध्ये या टेस्टचा निष्कर्ष येण्यासाठी 4 ते 5 महिन्यांचा कालावधी लागतो. . तर खासगी प्रयोगशाळेत 4-5 दिवसांतही निष्कर्ष मिळतात.

बाळाचा रक्तगट आई किंवा वडिलांशी जुळतो. आई आणि वडील या दोघांशीही हा रक्तगट जुळला नाही तर त्या बाळाचे जैविक वडील कुणीतरी दुसरेच असल्याचा निष्कर्ष निघतो. पण या चाचण्यांना कोर्टात स्थान नसल्याने DNA फिंगरप्रिंट्स म्हणजेच पॅटर्निटी टेस्ट केली जाते. यात बाळाची गुणसूत्रे वडिलांच्या गुणसूत्रांशी जुळवले जातात. ती गुणसूत्रे जुळली नाहीत तर त्या बाळाचे जैविक वडील कुणीतरी दुसरेच असल्याचे सिद्ध होते. या प्रकारचे निष्कर्ष कोर्टात ग्राह्य धरले जातात आणि त्यामुळेच या 'पॅटर्निटी टेस्ट'ला जास्त महत्त्व आले असल्याचे औरंगाबाद मधील न्यायसहायक विज्ञान संस्थेचे निवृत्त संचालक डॉ. एस.जी.गुप्ता सांगतात.

पॅटर्निटी टेस्ट कशा वाढल्या?

दहा वर्षांपूर्वी एका वर्षात 100 ते 125 च पॅटर्निटी टेस्ट होत असायच्या. पण जसजशी वर्षे उलटत गेली. त्यानुसार आय व्ही एफ, घटस्फोट, बलात्कार, वारसा हक्क आणि अन्य गोष्टींमुळे या पॅटर्निटी टेस्टला महत्व आलं आणि यात वाढ झाली. कधीकाळी एका वर्षाच्या अंती 100 ते 125 होणाऱ्या चाचण्या आता 1200 ते 1500 पर्यंत पोहोचल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Unseasonal rain : चंद्रपूर जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा; चंद्रपूर-आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गावरील पूल गेला वाहून

EVM बिघाड, राडा, तुंबळ हाणामारी, व्हिडिओ आणि आरोपांच्या फैरी; तिसऱ्या टप्प्यात कुठं काय घडलं?

IPL 2024 DC vs RR : एकाच षटकात २ विकेट घेत कुलदीपने पालटली बाजू; घरच्या मैदानावर दिल्लीने राजस्थानचा २० धावांनी केला पराभव

Bhayandar News : सोसायटीचं फायर टेंडर दिलं नाही म्हणून अग्निशमनच्या अधिकाऱ्यांने केली बेदम मारहाण, खजिनदार गंभीर जखमी

Maharashtra Politics: निवडणूक रोखे योजनेत मोठा भ्रष्टाचार, भाजपकडून त्याच पैशाचा पश्‍चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वापर: पृथ्वीराज चव्हाण

SCROLL FOR NEXT