पोलिसांनीच आरोपीला हत्येसाठी पाठवलं? गुणरत्न सदावर्तेंचा गंभीर आरोप, सक्षम ताटे प्रकरणाला नवं वळण|VIDEO

Gunaratna Sadavarte Demands Fresh FIR: नांदेडमधील सक्षम ताटे हत्याकांडावर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. पोलीस कर्मचाऱ्यानेच आरोपीला हत्येस प्रवृत्त केल्याचा दावा करत नवीन FIR, आरोपींवर कारवाई आणि आंचल व कुटुंबीयांना सुरक्षा देण्याची मागणी सदावर्तेंनी केली आहे.

संजय सूर्यवंशी, साम टीव्ही

नांदेडमध्ये आंतरजातीय प्रेमप्रकरणातून सक्षम ताटे या 19 वर्षाच्या तरुणाचा खून झाला. त्याची प्रेयसी आंचल मामीडवार हिने अंत्यसंस्कारापूर्वी सक्षम ताटे याच्या पार्थिव देहासोबत विवाह केला. ही घटना सध्या राज्यभर गाजत आहे. आज अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी नांदेडला येऊन सक्षम ताटेच्या कुटुंबियांची भेट घेतली. घटनेची संपूर्ण माहिती त्यांनी जाणून घेतली. आचल मामीडवारला त्यांनी धीर दिला. सक्षम ताटेच्या हत्येची दखल जगभरात घेण्यात आली. जातीयवादातून अतिशय क्रूरपणे सक्षम ताटे या तरुणाची हत्या करण्यात आली. पोलिसांनी जो एफआयआर केला. त्यात अनेक उनिवा आहेत. त्यामुळे फिर्यादी आणि साक्षीदार यांची जबाब घेऊन दुसरा गुन्हा दाखल करण्यात यावा.

घटनेच्या दिवशी इतवारा ठाण्यातील पोलीस कर्मचारी धीरज कोलमवाडाने आरोपी हिमेश मामीडवारला हत्येसाठी परावृत्त केले. तुझी बहीण लफडे करती, आणि त्याला मार नंतर पोलीस स्टेशनला ये असं पोलीस कर्मचारी धीरज कोमलवाड म्हणाला, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्याला खून प्रकरणात आरोपी केलं पाहिजे अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केली. हत्येच्या दिवशी अल्पवयीन आरोपी हिमेश मामीडवारने आंचलला देखील धमकी दिली. त्याच्यावर देखील दुसरा गुन्हा दाखल झाला पाहिजे.

सक्षमचे आई-वडील आणि आंचल त्यांच्या जीवाला धोका आहे. त्यांना पोलीस सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी गुणरत्न सदावर्तेंनी केली. उद्या दुपार किंवा संध्याकाळ पर्यंत या मागण्या मान्य झाल्या नाही तर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे जाणार असल्याचे सदावर्ते म्हणाले. आंचलचं धाडस आणि प्रेम पवित्र आहे. या हत्येचा संपूर्ण घटनाक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगणार आहे. सक्षमचे आई-वडील आणि आंचलने मागणी केली तर अॅड गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटील सरकारी वकील म्हणून खटला लढण्यास तयार आहेत असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com