Maharashtra Live News Update: प्रचाराच्या व्यस्ततेतही एकनाथ शिंदेंनी घेतली शेततळ्यात बुडून मृत्यू झालेल्या दोन भावंडांच्या कुटुंबीयांची भेट

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates: आज सोमवार, दिनांक १ डिसेंबर २०२५, राज्यात कडाक्याची थंडी, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका अपडेट्स, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv
Published On

प्रचाराच्या व्यस्ततेतही एकनाथ शिंदेंनी घेतली शेततळ्यात बुडून मृत्यू झालेल्या दोन भावंडांच्या कुटुंबीयांची भेट

जुन्नर शहराच्या इदगाह मैदानाजवळ असलेल्या शेततळ्यात बुडून आफान अफसर इनामदार(वय १० वर्षे) आणि रिफत अफसर इनामदार(वय ७ वर्षे) या दोन सख्या भावंडांचा २२ नोव्हेंबर रोजी दुर्देवी मृत्यू झाला होता. या दोघांच्या पालकांची एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या घरी जाऊन सांत्वनपर भेट घेऊन त्यांना आधार देण्याचा प्रयत्न केलाय.

निवडणुकीसाठी बुलढाणा जिल्हा प्रशासन सज्ज,१० नगरपरिषदांमधील १२२ प्रभागांमध्ये उद्या मतदान

१० नगरपरिषदांमधील १२२ प्रभागांमध्ये उद्या मतदान होणार

मतदान व मतमोजणीची तयारी पूर्ण ; पोलीस बंदोबस्त व सुरक्षा व्यवस्था तैनात

मतदारांनी निर्भयपणे आपल्या मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन किरण पाटील , जिल्हाधिकाऱ्यांनी केलंय

बदलापूर नगरपालिका निवडणुकीचा प्रचार संपला

बदलापूर नगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार अखेर थांबलाय. आता उद्या 43 जागा आणि थेट नगराध्यक्षपदासाठी निवडणूक होणारंय. या निवडणुकीत शिवेसेनेकडून नगराध्यक्षपदासाठी वीणा वामन म्हात्रे, भाजपकडून रूचिता घोरपडे, ठाकरे गटाकडून प्रिया गवळी, अपक्ष उमेदवार संगीता चेंदवणकर, आपकडून आस्था मांजरेकर अशा पाच महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे.

Dhule : धुळ्यात दोन दिवस थंडीच्या लाटेचा इशारा

धुळे जिल्ह्यामध्ये दोन दिवस हवामान विभागातर्फे देण्यात आला थंडीच्या लाटेचा इशारा

आज धुळ्यामध्ये सात अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची करण्यात आली नोंद

राज्यातील सर्वात नीचांकी तापमानाची नोंद आज धुळ्यात

तीन तारखेनंतर थंडीची लाट हळूहळू कमी होण्याचा हवामान विभागाचा अंदाज

नागरिकांनी थंडीच्या लाटे दरम्यान काळजी घेण्याच हवामान विभागाच आवाहन

उपमुख्यमंत्र्यांसारख्या मोठ्या व्यक्तींना प्रचारासाठी यावं लागतं हा आमचा मोठा विजय - माजी आमदार रमेश कदम

उपमुख्यमंत्र्यांसारख्या मोठ्या व्यक्तींना इथे प्रचारासाठी यावं लागतं, हाच आमचा मोठा विजय आहे, अशी प्रतिक्रिया चिपळूण नगर परिषद निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार माजी आमदार रमेश कदम यांनी दिली आहे.

Mumbai : गेट वे ऑफ इंडिया येथील बाग चेकिंग मशीन बंद

गेट वे ऑफ इंडिया येथील बाग चेकिंग मशीन बंद करण्यात आलीये.

गेले दोन दिवस मशीन बंद असल्याने पोलिस कर्मचारी हातानेच तपासत आहेत बॅग

मशिनवर प्रचंड धुळीच साम्राज्य

गर्दीचे ठिकाण असलेल्या गेट वे वर बॅग चेकिंग करणे होत आहे कठीण

वरच्या वर बॅग चेक करून सोडले जात आहे

सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे ठिकाण असलेल्या गेट वे ऑफ इंडिया येथे सुरक्षेची ऐसी तैसी

Wardha: पुलगावात काँग्रेसचे शक्ती प्रदर्शन

- - पुलगावात काँग्रेसचे शक्ती प्रदर्शन

- रॅली काढत मोठे शक्तिप्रदर्शन

- माजी मंत्री रणजित कांबळे यांच्या उपस्थितीत काँग्रेसची रॅली

- पुलगावात काँग्रेसकडून कविता सुनिल ब्राम्हणकर या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार

- काँग्रेसच्या रॅलीमध्ये महिलांची लक्षणीय उपस्थिती

- पुलगाव येथे काँग्रेस व भाजपामध्ये चुरशीची लढत

- काँग्रेसचे माजी राज्यमंत्री रणजीत कांबळे व भाजपा आमदार राजेश बकाने यांची प्रतिष्ठा पणाला

- रॅली काढत मोठे शक्तिप्रदर्शन

- माजी मंत्री रणजित कांबळे यांच्या उपस्थितीत काँग्रेसची रॅली

- पुलगावात काँग्रेसकडून कविता सुनिल ब्राम्हणकर या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार

- काँग्रेसच्या रॅलीमध्ये महिलांची लक्षणीय उपस्थिती

- पुलगाव येथे काँग्रेस व भाजपामध्ये चुरशीची लढत

- काँग्रेसचे माजी राज्यमंत्री रणजीत कांबळे व भाजपा आमदार राजेश बकाने यांची प्रतिष्ठा पणाला

Dhule: लाडकी बहीण योजना बंद पडली तर आमदारकीचा राजीनामा देणार -  अमरीश पटेल

शिरपूर वरवाडे नगर परिषदेच्या निवडणुकीदरम्यान माजी मंत्री तथा आमदार अमरीश पटेल यांनी लाडकी बहीण योजना बंद झाली तर मी आमदारकीचा राजीनामा देईल असे मोठे विधान केले आहे, शिरपूर वरवाडे नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदे सेनामध्ये चुरस बघायला मिळत आहे, यादरम्यान शिंदे सेनेच्या वतीने प्रचारादरम्यान मतदारांना जर शिंदे सेनेचे उमेदवार निवडून आले नाही तर लाडकी बहीण योजना बंद पडेल असा खोटा प्रचार केला जात असल्याचा आरोप माजी मंत्री तथा आमदार अमरीश पटेल यांनी विरोधकांवर केला असून, हा चुकीचा प्रचार केला जात असल्याचे म्हणत अमरीश पटेल यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आणि लाडकी बहीण योजना ते बंद होऊ देणार नाही, जर लाडकी बहिणी योजना बंद झाली तर मी आमदारकीचा राजीनामा देईल असे अमरीश पटेल यांनी भर सभेमध्ये जाहीर केले आहे,

बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्यरेल्वेची विशेष तयारी

बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेची विशेष तयारी

५ आणि ६ तारखेला विशेष १२ लोकल चालवणार, यापैकी ६ मध्य रेल्वेवर तर ६ हार्बर रेल्वेवर चालवणार

सोबत १५ विशेष अनारक्षित एक्सप्रेस चालवणार,

तसेच दादर स्टेशनवर १०० पेक्षा अधिक कर्मचारी नियुक्त करणार, चैत्यभूमीवर खास तिकिट बुकिंग ऑफस सुरू ठेवणार

Kolhapur: हुपरी नगरपरिषद हद्दीत पोलिसांचे पथसंचलन

नगरपरिषद, नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातल्या हुपरी गावामध्ये कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीने पतसंचलन करण्यात आले. उद्या होणाऱ्या निवडणुकीदरम्यान मतदारांनी भयमुक्त मतदान कराव , तसेच गावात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये या दृष्टीने पोलीस दल सज्ज झाला आहे. आज पोलीस दलाच्या वतीने हुपरी शहरातील प्रत्येक परिसरात फिरून भयमुक्त निवडणूक संपन्न व्हावी यासाठी प्रयत्न सुरू केलेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भोरमध्ये सभा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भोर मध्ये सभा

भोरमध्ये माजी आमदार संग्राम थोपटे विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात चुरस

मुख्यमंत्र्यांच्या आज पुण्यातील भोर आणि आळंदी मध्ये सभा

Pune: पुणे शहरात पुन्हा एकदा दिसला बिबट्या, वन विभागाने दिली अधिकृत माहिती

पुणे -

पुणे शहरात पुन्हा एकदा दिसला बिबट्या

वन विभागाने दिली अधिकृत माहिती

पुण्यातील बावधन खुर्द मध्ये आढळून आला बिबट्या

संबंधित व्हिडिओचे ठिकाण बावधन खुर्द गावातील (पौड रेंज ) असल्याची माहिती

Pune: मी कुठल्याही प्रकाराचा राजीनामा दिलेला नाही, रुपाली ठोंबरे यांची माहिती

पुणे -

रुपाली ठोंबरे यांनी कुठल्या ही प्रकाराचा राजीनामा दिलेला नाही

रूपाली ठोंबरे यांची साम ला माहिती

२ दिवसांपूर्वी शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतल्यानंतर राजकीय क्षेत्रात ठोंबरेंच्या बाबत चर्चा

५ तारखेला होणाऱ्या जय पवार यांच्या विवाह सोहळ्यानंतर रूपाली ठोंबरे घेणार अजित पवारांची भेट

Pune: पुणे महापालिकेच्या प्रारूप मतदार यादींवर ११ दिवसात ७ हजार ६२४ हरकती

पुणे -

पुणे महापालिकेच्या प्रारूप मतदार यादींवर ११ दिवसात ७ हजार ६२४ हरकती

यातील सर्वाधिक हरकती ३ हजार ४१९ सिंहगड रोड क्षेत्रात

३ डिसेंबर पर्यंत नोंदवता येणार हरकती

पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे

पुणे शहरात महापालिका निवडणुकीसाठी ३५ लाख ५१ हजार ४६९ उमेदवार

प्रारूप मतदार यादीच्या विक्रीतून १५ लाख ६६ हजार ९०२ रुपये महसूल प्राप्त

Wardha: निवडणूक आयोगाच्या विरोधात वर्ध्यामध्ये अपक्ष उमेदवाराचे ठिय्या आंदोलन

वर्धा -

- निवडणूक आयोगाच्या विरोधात अपक्ष उमेदवाराचे ठिय्या आंदोलन

- निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा केला निषेध

- आतापर्यंत झालेल्या प्रचार खर्चाची भरपाई देण्याची केली मागणी

Pune: अजित पवार यांनी भोर एज्युकेशन सोसायटीच्या आर आर विद्यालयाची केली पाहणी

पुणे -

पुण्यातील भोर मध्ये नगरपालिकेच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आले असताना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भोर एज्युकेशन सोसायटीच्या आर आर विद्यालयाची केली पाहणी

इंग्रजकालीन इमारत असणाऱ्या या शाळेची पाहणी करून, सभासदांकडून शाळेची घेतली माहिती

यावेळी अजित पवार यांनी नेहमीप्रमाणे आपल्या खास शैलीत शाळेच्या दगडी इमारतीवरील बारीक चुका दाखवून दिल्या आणि काही दुरुस्त्या सुचवल्या.

तसेच निघताना गाडीत बसल्यावर ड्राइवरने ac चालू केल्यानं, लयच ac लागतो तुला.. तू कायं काश्मीरवरून आलाय का?.. असं म्हणतं मिश्किल टोला लगवला..

Pune: ड्रिंक अँड ड्राइव्हबाबत पुणे पोलिसांची कारवाई, ३ दिवसांत १७२ जणांवर गुन्हे

पुणे -

ड्रिंक अँड ड्राइव्ह बाबत पुणे पोलिसांची कारवाई

मागील तीन दिवसात 172 जणांवर करण्यात आले गुन्हे दाखल

दारू पिऊन वाहन चालवल्याने वाढत आहेत शहरांमध्ये अपघात

मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर पुणे पोलिसांचा कारवाईचा बडगा

28 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर पर्यंत विविध ठिकाणी नाकाबंदी करून करण्यात आली कारवाई

शहरातील एकूण 30 ठिकाणी पोलिसांनी बनवले होते नाकाबंदी पॉईंट

Ahilyanagar: जामखेड नगरपरिषदेच्या निवडणूक प्रचार सभास्थळी मुख्यमंत्री दाखल

अहिल्यानगर -

जामखेड नगरपरिषदेच्या निवडणूक प्रचार सभास्थळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखल

जामखेड नगर परिषदेत युतीचे सर्वच घटक पक्ष स्वबळावर लढविताहेत निवडणूक तर महाविकास आघाडीतील शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेनेत झाली आहे आघाडी....

महाविकास आघाडी मधून काँग्रेसने काढता पाय घेत वंचित बहुजन सोबत केली आहे तिसरी आघाडी...

तिसरी आघाडी आणि घटक पक्षाच्या स्वबळामुळे विधानपरिषद सभापती राम शिंदे आणि रोहित पवारांची प्रतिष्ठा लागली पणाला...

आमदार रोहित पवार राम शिंदे विरोधात असल्याने मुख्यमंत्री फडणवीस काय बोलणार याकडे लागले सर्वांचे लक्ष....

Malegaon: मालेगाव अत्याचार प्रकरण, उपोषणासाठी बसलेल्या कुटुंबियांची तब्येत खालावली

- डोंगराळे चिमुकली अत्याचार खूण प्रकरणात आमरण उपोषणासाठी 3 दिवसापासून बसलेल्या कुटुंबियांची तब्बेत खालावली..

- आंदोलनाचा आज तिसरा दिवस

- उपचार करून घ्या यासाठी पोलिसांची मध्यस्थी..

- वरिष्ठ पोलीस अधिकारी उपोषण स्थळी दाखल

- वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आंदोलकांना उपोषण सोडण्याची चर्चा..

- मात्र आंदोलक आंदोलनावर ठाम..

- आंदोलकामध्ये संताप व्यक्त..यज्ञा शक्ती कायदा करावा,लेखी मसुदा दाखवल्या शिवाय उपोषण सोडणार नाही.

Mumbai: मुंबईच्या अंधेरी पूर्वेत एका इमारतीमध्ये मोठी आग

इमारतीचा तिसरा मजल्यावर ही दुपारी साडेबाराच्या सुमारास मोठी आग लागली

आगीचा माहिती मिळतच अग्निशमन दलाचे चार ते पाच गाड्या घटनास्थळी दाखल होत आग विझविण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे

टीव्ही चॅनल चा सर्व्हर रूम मध्येही आग लागली आहे

या इमारती मधले सर्व कर्मचाऱ्यांना पोलिसांनी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढले आहेत

आग कशामुळे लागली या संदर्भात अधिक तपास एमआयडीसी पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान करत आहेत

Politics:  प्रशांत जगताप यांची शनिवारी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यासोबत बैठक....

पुणे महापालिकेच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढवाण्यासाठी प्रशांत जगताप आग्रही....

राष्ट्रवादी अजित पावर आणि शरद पवार दोन्ही गट एकत्र लढल्यास शरद पवार गटाचे नुकसान होणार असल्याचा प्रशांत जगताप यांचा सर्वे.....

प्रशांत जगताप यांनी केलेला सर्वे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यासमोर शनिवारी मांडणार...

शनिवारी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची भेट घेतल्यानंतर प्रशांत जगताप निर्णय जाहीर करणार...

अजित पावर गटाशी युती झाल्यास प्रशांत जगताप राजकारणातून घेणार विश्रांती....

Beed: मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार सुरेश धस मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमानिमित्त एकाच मंचावर

भाजपा निरीक्षक म्हणून बीडची जबाबदारी आमदार सुरेश धस यांच्याकडे दिली होती मात्र पंकजा मुंडे आणि सुरेश धस पहिल्यांदाच निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्त एकत्र आले आहेत.

स्टार प्रचारक म्हणून पंकजा मुंडे यांना जिम्मेदारी दिली होती मात्र विधानसभेच्या नंतर पंकजा मुंडे आणि सुरेश धस थेट खडा जंगी पाहायला मिळाली होती. मात्र आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचार सभेचे निमित्ताने पंकजा मुंडे आणि आमदार सुरेश धस मंचावर पाहायला मिळत आहेत.

Ajit Pawar: शरद पवारांमुळेच मला कामाची संधी मिळाली हे मी कधीही विसरू शकत नाही- अजित पवार

राजगुरुनगर नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या सांगता सभेत बोलताना अजित पवार म्हणाले शरद पवारांनी मला संधी दिली, पण नंतरच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामाची भुरळ पडली. मोदींनी देशाला पुढे नेऊन जागतिक पातळीवर वेगळं स्थान निर्माण केलं, विविध योजना राबवल्या. विकासासाठी सत्तेत राहून निर्णय घेता येतात, पण सत्तेबाहेर राहून पाच वर्ष वाया जातात, असंही ते म्हणाले.

Local Bodies Election: हिंगोलीत 167 होमगार्ड जवान मतदानापासून पासून वंचित राहणार

निवडणूक विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे 167 होमगार्ड जवान मतदानापासून वंचित राहणार

हिंगोलीत होमगार्ड जवान मतदानापासून पासून वंचित राहणार

पोस्टल मतदानात होमगार्ड जवानांना परवानगी दिली नसल्याने हिंगोली सह कळमनुरी मध्ये पालिका निवडणुकीच्या मतदानात मतदानाचा अधिकारी बजावताना अडचण

हिंगोलीत होमगार्ड जवानांना बंदोबस्ताचे वाटप झाले मात्र मतदान अधिकारी कोणत्या वेळात जाऊन बजावावा असा प्रश्न पडला

हिंगोलीचे निवडणूक निर्णय अधिकारी समाधान घुटुकडे यांनी निर्णय घेण्याची मागणी

Sambhaji Nagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये आज शिवसेना उद्धव ठाकरे आणि मनसे या दोन पक्षांमध्ये बैठक

छत्रपती संभाजीनगरमध्ये आज शिवसेना उद्धव ठाकरे आणि मनसे या दोन पक्षांमध्ये महानगरपालिका निवडणुकी संदर्भात बैठक होत आहे. शिवसेनेचे नेते अंबादास दानवे, पदाधिकारी आणि मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर, पदाधिकारी या बैठकीला आहेत. मुंबईमध्ये ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आल्यानंतर आता छत्रपती संभाजीनगर शहरातील मनसे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते यांचे मनोमिलन होत आहे. ही पहिलीच बैठक आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकत्र लढायची कसे यासंदर्भात प्राथमिक चर्चा होणार असल्याचं कळतंय.

Ajit Pawar: 31 जानेवारीपर्यत निवडणूक आयोगाला निवडणूका संपवाव्या लागणार- अजित पवार

राज्यातल्या निवडणूका ३१ जानेवारी पर्यत निवडणूक आयोगाला संपवव्या लागणार जिल्हा परिषद पंचायत समिती,महानगरपालिका निवडणूका ३१ जानेवारी पर्यत सुप्रिम कोर्टाने संपवण्याची आदेश निवडणूक आयोगाला दिलेत त्यामुळे या आदेशानुसार सर्व निवडणुका ३१ जानेवारीपर्यत संपवाव्या लागणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्पष्ट केलंय

Pune: पुण्याच्या भोर तालुक्यातील तांबाड गावात बिबट्याच्या हल्ल्यात मेंढी ठार..

मेंढया शेतात चरत असताना बिबट्याचा हल्ला..

शेतकरी नितीन बबन सोंडकर हे रानामध्ये मेंढ्या चाराण्यासाठी घेऊन गेलेले असताना संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली

मेंढीचा मृत्यू झाल्यान शेतकऱ्याचे नुकसान

पाळीव प्राण्यांवर वारंवार बिबट्याचे हल्ले होत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण

वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा.. स्थानिकांची मागणी

Local Bodies Election: जत नगरपरिषद निवडणुकीला हिंसक वळण

जत मध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या घरावर हल्ला

नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुरेश शिंदे यांच्या घरावर आणि गाडीवर करण्यात आली दगडफेक

दगडफेकीमध्ये सुरेश शिंदेंच्या घराचं आणि गाडीचं मोठं नुकसान

पहाटेच्या सुमारास अज्ञातंकडून करण्यात आली दगडफेक

दरम्यान भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांकडून दगडफेक करण्यात आल्याचा राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्यांचा आरोप

माजी आमदार विलासराव जगतापांनी केला आरोप

Nandurbar: नंदुरबार जिल्हात होणाऱ्या उद्या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रशासनाकडून मतपेट्यांचे वाटप...

नंदुरबार जिल्ह्यात उद्या होणाऱ्या मतदानासाठी प्रशासनाकडून मतपेट्यांच्या वाटप करण्यात येत आहेत नंदुरबार जिल्ह्यात होणाऱ्या चार नगरपालिकेंसाठी 2 लाख 25 हजार 36 मतदार आपला मतदानाच्या हक्क बजावणार असल्याने या मतदारांसाठी 256 मतदान केंद्र राहणार आहेत तर 1536 कर्मचारी कार्यरत राहणार असून, अनेक कर्मचारी रिझर्व ठेवण्यात आलेले आहेत. नंदुरबार जिल्ह्याच्या चार नगराध्यक्ष पदासाठी 20 उमेदवार रिंगणात आहेत तर नगरसेवक पदाच्या 114 जागांसाठी 470 उमेदवार रिंगणात असून, या उमेदवारांच्या भव्तव्य उद्या मतपेटीत बंद होणार असल्याने प्रशासनाकडून मतपेट्यांचे वाटप करण्यात आला असून, या कर्मचाऱ्यांकडून मतदान यंत्रणाच्या तपासणी करून मतदान केंद्र पर्यंत पाठवण्यात येत आहेत या सर्व प्रक्रियेत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस फोर्स फाटा तैनात करण्यात येणार आहे तर शहरातील संवेदनशील असलेल्या मतदान केंद्रांवर पोलीस दलाची विशेष लक्ष राहणार असल्याने उद्या होणाऱ्या मतदानाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेलं आहे त्यामुळे उमेदवारांच्या भव्तव्य उद्या मतपेटीत बंद होणार असल्याने मतदानाच्या साहित्य मतदान केंद्रावर रवाना होत आहेत.

Solapur: सोलापुरात पुन्हा एकदा भाजपाचे ऑपरेशन लोटस

- काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या प्रभागातच ऑपरेशन लोटस झाल्याने शहरातील राजकारणात रंगल्या चर्चा

- काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोलापूरच्या दौऱ्यावर असताना काँग्रेसच्या माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांचा भाजपात प्रवेश

- ऑपरेशन लोटस करण्यामध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे , शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांची प्रमुख भूमिका

- आमदार देवेंद्र कोठेंनी अबकी बार 75 पारचा नारा दिला असून शहर उत्तर, शहर मध्य, आणि सोलापूर दक्षिण मतदार संघात ज्या ठिकाणी भाजपचा नगरसेवक निवडून आलेला नाही अशा जागांना केले लक्ष्य

- तर यावेळी आ. सुभाष देशमुख, आ. विजयकुमार देशमुख यांची देखील उपस्थिती

- महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या ऑपरेशन लोटसमुळे शहरात एकच खळबळ

Kolhapur: कोल्हापुरातल्या विश्वपंढरी ते हॉकी स्टेडियम रोडजवळ मध्यरात्री तरुणाचा खून

रस्त्यालगतच असलेल्या विद्युत खांबासोबत बांधून तरुणाचा वायरने गळा आवळला

मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास घटना घडल्याची माहिती

पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत सुरू केला तपास

संबंधित तरुणाची ओळख पटवण्याचे काम सुरू

पत्नीचा खून करून पतीने संपवलं जीवन

डोंबिवलीतील कोळेगाव परिसरात एका ३९ वर्षीय पतीने आपल्या पत्नीचा खून केल्यानंतर, स्वतः ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केल्याचे घटन समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे पोपट दिलीप दहिज असे आरोपी मयत पतीचे नाव आहे.

nandurbar : रांझणी शिवारात अकरा एकर ऊस जळून खाक..

तळोदा तालुक्यातील रांझणी शिवारात रात्री सुमारास अकरा एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक झाला. या घटनेत तीन शेतकऱ्यांचे सुमारे अकरा लाख रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे.भटु गोविंद भंवर 4 एकर, गणेश सुरेश मढवी 4 एकर , आणि प्रतापपूर येथील तुंबा ईशी 3 एकर या शेतकऱ्यांचा कापणीला आलेला ऊस अज्ञात माथेफिरूने जाळल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. आग विझवण्याचे प्रयत्न निष्फळ ठरले. या अचानक आलेल्या संकटामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला असून, त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. मदत मिळावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

पिंपरी महापालिकेची पाणीपुरवठा करणारी एक मोठी पाईपलाईन फुटली

पिंपरी चिंचवड शहरातील मासळुकर कॉलनी परिसरामध्ये महापालिकेची पाणीपुरवठा करणारी एक मोठी पाईपलाईन फुटली आहे. मासूळकर कॉलनी येथील खंडणी विरोधी पोलीस पथका समोरील रस्त्यावर महापालिकेची पाईपलाईन फुटून हजारो लिटर पिण्याचे पाणी मागील काही तासांपासून वाया जात आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने तातडीने पाईपलाईन दुरुस्ती करून पाण्याचा अपवय थांबावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

DHULE राज्यात थंडीचा जोर वाढला परंतु शिंदखेडा मतदारसंघात मात्र नगरपंचायत निवडणुकीत राजकीय वातावरण तापले

: राज्यात थंडीचा जोर वाढला परंतु शिंदखेडा मतदारसंघात मात्र नगरपंचायत व नगरपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणात तापले आहे. कारण मंत्री जयकुमार रावल यांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागल्याचे दिसून येत आहे.

याचे कारण महायुतीतील सर्व घटक पक्ष एकमेकांसमोर एकमेकांविरोधामध्ये उभे ठाकले असून, महाविकास आघाडी तर्फे मात्र या ठिकाणी सावध भूमिका घेतली असल्याचे दिसत आहे, महायुतीतील तीनही पक्ष या ठिकाणी विखुरले असले तरी महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसतर्फे म्हणजेच महाविकास आघाडीतर्फे एकच उमेदवार देण्यात आला आहे.

बुलढाण्यात तेलगू नगरमध्ये काँग्रेस नगरसेवकाच्या बॅनरवर शाही फेकण्याची घटना

बुलढाणा शहरातील तेलगू नगर परिसरात आज सकाळी काँग्रेस नगरसेवकाच्या प्रचार बॅनरवर अज्ञात व्यक्तींनी शाही फेकल्याची घटना उघडकीस आली.. निवडणुकीच्या आदल्या दिवशी झालेल्या या प्रकारामुळे परिसरात अचानक तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.. घटनेची माहिती मिळताच बुलढाणा शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून शाई फेकण्यामागील हेतू, तसेच आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी आणि स्थानिकांकडून माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे.. या घटनेने स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली असून परिसरात तणावपूर्ण शांतता पाहायला मिळत आहे.. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे..

संजय राऊत यांची प्रकृती कशी आहे?

माझ्या प्रकृतीमध्ये सुधारणा आहे. डिसेंबरनंतर मी १०० टक्के बरा होईल, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

शिराळ्यातील नगरपंचायत प्रभाग 4 मधील नगरसेवक पदासाठी ची निवडणूक लांबणीवर

नामनिर्देशन पत्राबाबत दाखल अपीलावर 22 नोव्हेंबर नंतर झालेल्या निकालाबाबत राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकांनी यांनी दिलेल्या आदेशानुसार सांगलीच्या शिराळा नगरपंचायत प्रभाग चार मधील नगरसेवकासाठीची निवडणूक लांबणीवर पडली आहे.

प्रभाग चार मधील उमेदवार प्रदीप यादव आणि अभिजीत यादव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस कडून उमेदवारी दाखल केली होती. यांना पक्षाची उमेदवारी जाहीर झाले. मात्र निवडणूक आयोगाच्या नवीन निर्णयामुळे पक्षाचे चिन्ह मिळाले नाही. त्यांनी छाननी वेळी आक्षेप घेत निवडणूक निर्णय अधिकारी व जिल्हा सत्र न्यायालयात अपील केले. ईश्वरपूर येथील जिल्हा सत्र न्यायालयात 24 नोव्हेंबर रोजी अपील फेटाळण्यात आले. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रभाग चार मध्ये फक्त नगराध्यक्ष पदासाठी मतदान होईल. नगराध्यक्ष पदासाठी नव्याने मतदान यंत्राचे कमीशनीग करावी लागणार आहे.

डोंबिवलितील सावित्रीबाई फुले नाट्यगृह दुरुस्तीला वेग

डोंबिवलीतील सांस्कृतिक आणि कलाविश्वाचे प्रमुख केंद्र असलेल्या सावित्रीबाई फुले नाट्यगृहातील पीओपीचा स्लॅब कोसळल्याच्या घटनेनंतर गेल्या काही महिन्यांपासून नाट्यगृह बंद अवस्थेत आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे नाट्यगृह तत्काळ बंद करून दुरुस्तीची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.

रत्नागिरीतील प्रभाग १० च्या निवडणूकीला स्थगिती

नगर परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज अवैध ठरल्या प्रकरणात अपिलाचे निकाल उशिराने लागल्याने रत्नागिरी नगर परिषदेतील प्रभाग १० ची निवडणूक राज्य निवडणूक आयोगाने स्थगित केली आहे. ही निवडणूक आता २ ऐवजी २० डिसेंबर रोजी होणार आहे. याबाबत राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.रत्नागिरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग १० मध्ये अपक्ष उमेदवार सचिन शिंदे व संपदा रसाळ-राणा यांचा उमेदवारी अर्ज हा प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाच्या रचनेनुसार नसल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अवैध ठरवला होता. त्या विरोधात दोन्ही उमेदवारांनी जिल्हा न्यायालयात अपील दाखल केली होते. हे अपील जिल्हा न्यायालयात २४ नोव्हेंबर रोजी फेटाळण्यात आले होते.

पिस्तुलासह चार जिवंत काडतूस जप्त, आरोपी अटकेत

अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात पिस्तूल जवळ बाळगणाऱ्या 20 वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली. या युवकाकडे एक पिस्तुलासह चार जिवंत काडतुसे आढळली आहे.. दरम्यान, नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कारवाईची मोहिम राबवण्यात येत आहे. रोहन मुरलीधर अंभोरे असं देशी बनावट पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाचं नाव आहे.. पोलिस उपनिरीक्षक वैभव तायडे हे नगर परिषद निवडणुक अनुषंगाने अकोट शहरात पेट्रोलिंग करत होते. गस्तीच्या वेळी हा तरुण जवळ पिस्तूल बाळगुन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

नाशिक - जिल्ह्यातील तीन नगरपरिषदांच्या सात प्रभागांची निवडणूक पुढे ढकलली

- अपील व प्रक्रियात्मक कारणांमुळे निवडणूक आयोगाचा निकाल

- सिन्नर नगरपरिषदेच्या चार, ओझर नगरपरिषदेच्या दोन तसच चांदवड नगरपरिषदेचा एका प्रभागाची निवडणूक पुढे ढकलली

- या प्रभागांसाठी स्वतंत्र आणि सुधारित निवडणूक कार्यक्रम ४ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी जाहीर करणार

- काही प्रभागांतील तांत्रिक आणि कायदेशीर अडचणींमुळे निर्णय

nashik-manmad-महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचार सभा

मनमाड येथील नगरपालिका निवडणुकीला अवघा एक दिवसाचा प्रचार राहिला असून त्यानिमित्त आमदार सुहास अण्णा कांदे यांनी बुधलवाडी परिसरात चौक सभा चे आयोजन करण्यात आले होते, यावेळी आमदार सुहास अण्णा कांदे यांनी मनमाडला एमआयडीसी मंजूर असून येत्या काही दिवसातच मनमाडच्या तरुणी तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येईल त्याचप्रमाणे मनमाडला स्वच्छ मनमाड सुंदर मनमाड करण्यासाठी संकल्प असून शिवसेना भाजपचे उमेदवार निवडून द्यावे अशी मागणी यावेळेस केली, याप्रसंगी माजी केंद्रीय मंत्री भारती पवार यादेखील उपस्थित होत्या.

बदलापुरात तिसऱ्या आघाडीने केला मशालीचा घात

बदलापुरात तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांनी मशाल चिन्ह घेऊन भाजपला पाठिंबा दिलाय. त्यामुळे ठाकरे गटाची मोठी कोंडी झालीय. तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांविरोधात ठाकरे गटाने तीव्र संताप व्यक्त केलाय.

बदलापुरात तिसऱ्या आघाडीने महाविकास आघाडीत प्रवेश करत आपले उमेदवार जाहीर केले होते. या उमेदवारांना चिन्ह नसल्यामुळे त्यांनी ठाकरे गटाकडे मशाल चिन्हाची मागणी केली होती. मात्र तिसऱ्या आघाडीच्या पाच उमेदवारांनी अचानकपणे भाजपला पाठिंबा जाहीर केलाय. कविता सकट ,वैभव सदाफुले, मंगेश इंगळे, रुपेश साळवी ,प्रफुल कांबळे, असे हे पाच उमेदवार आहेत. त्यामुळे बदलापुरात ठाकरे गटाबाबत संभ्रम निर्माण झालाय. मात्र मशालचिन्ह घेणारे हे उमेदवार ठाकरे गटाचे नसून ते तिसऱ्या आघाडीचे आहेत आणि त्यांनी आमचा विश्वासघात केल्याचा आरोप ठाकरे गटाचे शहर प्रमुख किशोर पाटील यांनी या उमेदवारांना शिवसेना स्टाईल उत्तर देण्याचा इशारा दिलाय.

मुंबई आग्रा महामार्गावर नाशिकच्या बळी मंदिराजवळ बर्निंग कारचा थरार

- हिराववाडीतील रहिवासी असलेले तेजस व्यास आपल्या कारमध्ये ओझरहून आडगाव नाक्याकडे येत असताना कारला लागली अचानक आग

- प्रसंगावधान राखत कारचालक वेळीच बाहेर पडल्याने जिवितहानी टळली

- घटनेनंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून विझवली आग

- बर्निंग कारच्या थरारमुळे काही काळ निर्माण झाली होती वाहतूक कोंडी

- कारला लागलेल्या आधीच कारण अस्पष्ट, मात्र आहोत संपूर्ण कार जळून खाक

नांदगाव खंडेश्वर मध्ये भाजप उमेदवारासाठी भाजप नेत्यांचा ठाण मांडून सूक्ष्म प्लॅनिंग.

नांदगाव खंडेश्वर नगरपंचायत मध्ये नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पक्षाच्या स्वाती राजेश पाठक,शिवसेना ठाकरे गटाच्या प्राप्ती मारोटकर, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कल्पना मारोटकर व काँग्रेसच्या विना जाधव यांच्यात चौरंगी लढत आहे.मात्र भारतीय जनता पक्षाने नांदगाव खंडेश्वर ची निवडणूक ही प्रतिष्ठेची बनवली असून या ठिकाणी जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे सर्वच मोठे नेते ठाण मांडून बसलेले आहेत.भाजप आमदार प्रताप अडसड,तुषार भारतीय,प्रशांत शेगोकार, माजी मंत्री प्रवीण पोटे हे नेते स्वाती पाठक या निवडून यावा यासाठी सूक्ष्म प्लॅनिंग करत असून नांदगाव खंडेश्वर मध्ये ठाण मांडून बसलेले आहेत..

जालन्यातील अंबड,परतुर आणि भोकरदन नगरपालिका निवडणुकीचा आज प्रचार थांबणार

जालन्यातील अंबड ,परतुर आणि भोकरदन येथील नगरपालिका निवडणुकीचा प्रचार आज रात्री दहा वाजता संपणार आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांना आणि उमेदवारांना प्रचारासाठी केवळ काही तासांचा अवधी शिल्लक राहिला आहे. तिन्ही शहरांमध्ये प्रचाराच्या जोरदार फेरी सुरू असून रात्री प्रचाराचा तोफा थंडावणार आहे.निवडणूक जाहीर झाली तेव्हा 30 नोव्हेंबर रोजी प्रचार थांबणार होता मात्र निवडणूक आयोगाने एक दिवसाची मुदत दिल्याने एक दिवसाचा अधिक प्रचार उमेदवारांना करता येतोय. तिन्ही नगरपालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षाकडून जोरदार प्रचार सुरू आहे.घरोघरी जाऊन उमेदवारांसह स्थानिक आमदार नागरिकांच्या भेटी गाठी घेत आहे.

फुलंब्री न.पं. निवडणूक पुढे ढकलली; पैठण, वैजापूर व गंगापूरचे ८ वॉर्ड शांत ४ डिसेंबरला नवीन वेळापत्रक जाहीर करणार

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री नगर पंचायतीची निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली. त्याप्रमाणेच पैठण, गंगापूर आणि वैजापूर या नगर परिषदेमध्ये काही वार्डातील निवडणूक देखील पुढे ढकलण्यात आली. निवडणूक निर्णय तथा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले की, राज्य निवडणूक आयोगाची राज्यातील सर्व जिल्हा प्रशासनासोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. सायंकाळपर्यंत आयोगाकडून काहीही सूचना आलेल्या नव्हत्या. त्यामुळे वरिष्ठांकडून काही अभिप्रायासह विचारणा केल्यानंतर कोर्टाने जो निकाल दिला आहे, त्यानुसार काही निवडणुका स्थगित होणार आहेत. त्यानुसारच फुलंब्रीची निवडणूक प्रक्रिया स्थगित केली. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार ४ तारखेला नव्याने फुलंब्रीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाईल. वैजापूर नगर परिषदेत नगर परिषदेच्या २ जागांसाठीची निवडणूक आयोगाने पुढे ढकलली. प्रभाग क्र. १, १ अ आणि २ ब या जागांची निवडणूक स्थगित झाली. गंगापूर नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक ६ मधील जागा क्रमांक 'ब' व प्रभाग क्रमांक ४ मधील जागा क्रमांक 'ब' येथील निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे २ डिसेंबरला या दोन्ही प्रभागांत फक्त अध्यक्ष पदासाठी आणि जागा क्रमांक 'अ' साठीच मतदान होणार आहे. पैठण नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ६ मधील २ नगरसेवकांच्या जागा, प्रभाग क्रमांक ३ मधील १ जागा, तर प्रभाग क्र. ११ मधील १ अशा चार नगरसेवकांच्या निवडणूक प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली.

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत रायगडात महायुतीची शक्यता नाही; राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे स्पष्ट संकेत

नगर पालिकेप्रमाणेच आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक देखील रायगड जिल्ह्यात महायुती म्हणून लढली जाण्याची शक्यता नाही, असे स्पष्ट संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी दिले आहेत. रायगड जिल्ह्यातील शिवसेना आमदारांनी यापूर्वी वारंवार राष्ट्रवादीशी युती करणार नाही अशी वक्तव्य केली होती याची तटकरे यांनी आठवण करून दिली. त्याचवेळी भाजप बरोबर युती करून आगामी निवडणुका लढवण्याची राष्ट्रवादीची मानसिकता असल्याचे संकेत देखील त्यांनी दिले.

सर्वच नगरपालिकांचे निकाल एकत्र जाहीर करा: माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांची निवेदनाद्वारे मागणी

सातारा जिल्ह्यातील एकूण 9 नगरपालिकांपैकी फलटण आणि महाबळेश्वर या दोन नगरपरिषदांचा काही तांत्रिक कारणांमुळे निवडणूक कार्यक्रम रद्द करून नव्याने जाहीर करण्यात आला आहे.उर्वरित 7 नगरपालिकांचे मतदान प्रक्रिया 2 डिसेंबरला पार पडत आहे आणि 3 डिसेंबरला याचा निकाल जाहीर होणार आहे.मात्र उर्वरित महाबळेश्वर आणि फलटण नगरपालिका निवडणुकीचे मतदान हे 20 डिसेंबर मध्ये पार पडत असून याचा निकाल 23 डिसेंबरला लागणार आहे... याबाबत माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी लोकसभा, विधानसभा निवडणुक निकालाप्रमाणे 3 डिसेंबर रोजी जाहीर होणारा निकाल आणि पुढे ढकललेल्या 2 नगरपालिकांचा एकत्र जाहीर करावा अशी मागणी माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केली आहे.

Maharashtra Live News Update: नगरपंचायत आणि नगरपरिषदा निवडणुक प्रचाराचा आज शेवटचा दिवस

पुणे जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सभा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भोरमध्ये सभा तर एकनाथ शिंदे यांची चाकण आणि जुन्नर येथे सभा घेणार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर,चाकण,आळंदी येथे सभा घेणार

पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी होणार चुरशीच्या लढती होत आहेत

उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यातच आता पुण्यात फडणवीस,शिंदे यांच्या सभा होत आहे.

निवडणूक आयोगाचे डोके ठिकाण्यावर आहे का...? रवींद्र धंगेकर  

मतदानाच्या एक दिवस अगोदर राज्यातील अनेक नगरपरिषद नगरपालिकांच्या निवडणुका पुढे ढकलल्याबाबत नोटीस निवडणूक आयोग जाहीर करत आहे.मुळात 50 टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली जाणे एवढी मोठी चूक निवडणूक आयोग कशी करू शकते..?

बरं ही चूक लक्षात आल्यानंतर तातडीने निवडणुक प्रक्रिया थांबवण्याची गरज होती पण सगळी प्रक्रिया झाल्यानंतर आणि ऐन निवडणुकीच्या एक दिवस अगोदर निवडणुका स्थगित करणे हे व्यवहार्य आहे का.. ?

एखादा कार्यकर्ता आपल्या आयुष्याची जमा पुंजी लावून निवडणुक लढत असतो, समाजाचं चांगलं व्हावं या भावनेने निवडणूक लढत असताना त्याने आपले सर्वस्व पणाला लावलेलं असतं आणि अचानकपणे अशा पद्धतीने निवडणूक रद्द करणे सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर अन्यायकारक आहे.

राज्य निवडणूक आयोगाचा देखील मोठ्या प्रमाणात खर्च निवडणूक नोटिफिकेशन निघाल्यानंतर निवडणूक होईपर्यंत होत असतो हा खर्च राज्याच्या निवडणूक आयोगाच्या प्रमुखांच्या पगारातून वसूल करण्यात का येऊ नये...? कारण ही सर्वस्वी आयोगाची चूक आहे याचा भुर्दंड करदात्यांच्या पैशावर का...?

दर वेळेला कोर्टाने तुम्हाला झापणे आवश्यक आहे का...? तुमच्या मतदार याद्यांमध्ये घोळ, तुमच्या आरक्षणात घोळ, निवडणूक प्रक्रियेत घोळ.तुम्ही स्वतःहून चांगले काम नाही करू शकत का...?

पुणे महानगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेत देखील अशाच प्रकारच्या चुका, प्रभाग रचनेत आणि प्रभाग आरक्षण यामध्ये देखील चुका झालेल्या आहेत.वरवर 50% ची मर्यादा पाळल्याच दिसत असलं तरी जेव्हा प्रभागानुरूप आपण बघतो त्यावेळेस अशा प्रकारची मर्यादा पाळण्यात आलेली नाही.

राज्य निवडणूक आयोगाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी तातडीने या गोष्टीची जबाबदारी स्वीकारत राजीनामा द्यावा आणि शासनाच्या निवडणूक प्रक्रियेचा झालेला सर्व खर्च त्यांच्या पगारातून वसूल करण्यात यावा.

पुण्यात चुलत भावाच्या खुनासाठी चार लाखांची सुपारी,चौघांना अटक

खून प्रकरणातील साक्षीदार हा या प्रकरणात सामील पोलिसांनी तिघांना अटक केली. नात्यातील महिलेशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून चुलत भावाचा खून करण्यासाठी आरोपीने साथीदारांना चार लाख रुपयांची सुपारी दिल्याची धक्कादायक माहिती तपासात मिळाली आहे.

कात्रजमधील गुजरवाडी परिसरात अजयकुमार गणेश पंडीत (वय २२, सध्या रा. साईनगर, खोपडेनगर, कात्रज, मूळ रा. हजारीबाग, झारखंड) याचा तीक्ष्ण शस्त्राने खून केला होता. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी तपास करून अजयकुमारचा चुलत भाऊ अशोक कैलास पंडीत (वय ३५, सध्या रा. मोशी, पिंपरी-चिंचवड) याला अटक केली होती. १७ नोव्हेंबरला ही घटना उघडकीस आली होती

Maharashtra Live News Update: पुण्यात चौथ्या दिवशी 40 पेक्षा जास्त उड्डाणांना उशीर

पुण्यात चौथ्या दिवशी 40 पेक्षा जास्त उड्डाणांना उशीर उत्तरेतील दाट धुके आणि एअरलाइन कडून विमानाची देखभाल दुरुस्तीचा विमानसेवेवर परिणाम

पुण्यातून कोलकत्ता दिल्ली नागपूर जयपूर अमृतसर बेंगलुरु या शहरातून येणाऱ्या जाणाऱ्या चाळीसहून अधिक विमानांना दीड ते दोन तास उशीर

विमानाला उशीर होत असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे

शनिवारपासून विमाना उड्डाणांना उशीर होत आहे मध्यरात्री 12 ते सकाळी सहा या दरम्यान येणाऱ्या विमानांना उशीर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com