संजय राठोड
यवतमाळ - जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी वणी तालुक्यातील बोर्डा आणि झरी तालुक्यातील शिबला परिसरात जमीवरील पाहिल्या सजीवांचे जीवष्म आढळल्या नंतर शिबला येथे संशोधना दरम्यान ऐतिहासिक खुलासे समोर आला आहे. यामुळे ब्लॅक डायमंड सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वणी तालुका प्रकाशझोत आला आहे.
ज्वालामुखीचा उद्रेक झाल्याने लाव्हारसातून तयार झालेले कॉलमनार बेसाल्ट नावाचे दुर्मिळ नैसर्गिक खडक आढळतात. लावारस अचानक पाण्याच्या संपर्कात येऊन थंड झाल्यास आकुंचन पावून षटकोनी आकाराचे खांब तयार होत असल्याचा दावा संशोधक प्रा.सुरेश चोपणे यांनी केला आहे.
प्रा.सुरेश चोपणे हे चंद्रपूर येथे संशोधनांचे काम करतात. भारतीय विज्ञान काँग्रेस कोलकताचे सदस्य, मराठी विदर्भ संशोधन संस्थेचे सदस्य, तसेच पर्यावरण व खगोल शास्त्र संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. भूशास्त्र व पुरातत्व या विषयावर ते गेल्या काही वर्षांपासून संशोधन करीत आहे. बोर्डा परिसरात भूकंपाचा अभ्यास करीत असतांना त्यांनी जमिनीवरील पहिल्या सजीवांची जीवष्मे नुकतीच शोधून काढली. त्यावेळी त्यांनी दीडशे ते दोनशे कोटी वर्षांपूर्वी विदर्भात समुद्र असल्याचा दावा केल्याने खळबळ उडाली होती.
हे देखील पहा -
यवतमाळ जिल्ह्यातील वणी परिसर हा ऐतिहासिक दृष्ट्या प्राचीन आहे. त्याहीपेक्षा हा परिसर भौगोलिक दृष्ट्या अतिप्राचीन आहे.याच परिसरात २०० कोटी वर्षाची स्ट्रोमेटोलाईटची, ६ कोटी वर्ष पूर्वीची शंख-शिंपल्यांची जीवाश्मे यापूर्वी पांढरकवडा, मारेगाव तालुक्यात प्रा.चोपणे यांनी शोधून काढली.
झरी तालुक्यात आता प्रकाश झोतात आलेल्या ह्या अश्म खांबाची माहिती त्यांना होती.७ कोटी वर्षापूर्वी पर्यंत विदर्भात समुद्र होता परंतु ६ कोटी वर्षादरम्यान उत्तर क्रीटाशिअस काळात पृथ्वीवर भौगोलिक घडामोडी घडल्या आणि आजच्या पश्चिम घाटातून भेगी उद्रेकाद्वारे तप्त लावारस यवतमाळ जिल्हा आणि मध्य विदर्भा पर्यत वाहात आला.
लावरसाच्या उद्रेकातून तयार झालेल्या दगडी थरांना दक्खनचे पठार नावाने ओळखले जाते. हा ज्वालामुखी परिसर मध्य भारतात पाच लाख स्क्वेअर किलोमीटर परिसरात आणि पश्चीमेकडे ६ हजार ६०० फुट जाडीचा आहे.महाराष्ट्रात ८० टक्के हा बेसाल्ट अग्निज खडक आहे .तर भारतात कर्नाटकात सेंट मेरी बेट हे अश्याच कॉलमनार बेसाल्ट साठी पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रांत मुंबई,कोल्हापूर,नांदेड येथे हे खडक आढळले असून आता त्यात यवतमाळ जिल्ह्याचे नाव जगाच्या नकाशावर कोरले जाणार आहे.
विदर्भ प्रदेशात ह्या खडकाची जाडी कमी आहे त्यामुळे गेल्या हजारो वर्षापासून भूस्खलन होऊन प्राचीन खडक उघडे पडत आहे.वणी परिसरात तप्त लाव्हारस वाहात आला तेव्हा येथील नद्यात तो पडून अचानक थंड झाला त्यामुळे त्याचे आकुंचन पावून षटकोनी आकार घेतला आणि असे दगडी खांब तयार झाले,त्यांना कॉलमनार बेसाल्ट असे म्हणतात.इतर ठिकाणी तशी स्थिती नसल्याने तेथे ते होऊ शकले नाही.अनेक ठिकाणी षटकोनी खांबां ऐवजी पंच किंवा सप्तकोणी खांब सुद्धा आढळतात .हे खांब अगदी मानवाने ऐतिहासिक काळात मंदिरांच्या बांधकामासाठी वापरले होते असा दावा संशोधक प्रा.सुरेश चोपणे यांनी केला आहे.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.