धुळे : ओबीसींच्या राजकीय आरक्षण (OBC Reservation) संपुष्टात आल्यानंतर त्याचा विरोध करण्यासाठी महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभेच्यावतीने राज्यभरात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येत आहे. त्यानुसार आज धुळे जिल्हाधिकारी (Dhule collector office) कार्यालयाच्या परिसरात असलेल्या क्यूमाईन क्लब परिसरात महाराष्ट्र प्रांतिक दैनिक महासभेच्यावतीने उपोषण करण्यात येत आहे. (dhule-news-obc-reservation-issue-collector office-one-day-strike)
ओबीसी आरक्षणाचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. आरक्षणासाठी राजकिय तसेच सामाजिक संघटनांकडून आंदोलन केली जात आहेत. यातच महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्यावतीने राज्यभरात आंदोलन छेडले आहे. एक दिवसीय आंदोलन करत लढा सुरू केला आहे. यात धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत संघटनेच्यावतीने ‘ना कोणत्या पक्षासाठी आमचा लढा ओबीसींसाठी’ अशा घोषणा देत संघटनेचा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत रद्द झालेल्या ओबीसी आरक्षणाचा निषेध व्यक्त केला.
आरक्षणासाठी लढा कायम
जोपर्यंत ओबीसींचे राजकीय आरक्षण पुन्हा पूर्ववत केले जात नाही; तोपर्यंत अशाच पद्धतीने वेळोवेळी लढा देणार असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. यावेळी एक दिवसीय लाक्षणिक उपोषणात संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.