पंकजा मुंडे : ना धड दबाव ना धड प्रभाव  Saam tv
ब्लॉग

पंकजा मुंडे : ना धड दबाव ना धड प्रभाव

भागवत कराड यांना मंत्रीपद दिल्याने प्रीतम मुंडे यांना देण्यात येणाऱ्या मंत्रिपदाची चर्चा संपली. परिणामी मुंडे भगिनी नाराज झाल्या असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भाजपच्या (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) या काही दिवसांपासून नाराज होत्या. त्यांची बहीण प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांना कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्यामुळे मुंडे भगिनी नाराज असल्याचं म्हटलं गेलं. मात्र आज कार्यकर्त्यांच्या बैठकीत पंकजा मुंडे यांनी अनेक गोष्टी स्पष्ट केल्या आणि या नाराजी नाट्यावर पडदा पडला. (BJP leader Pankaja Munde clears the air about cabinet reshuffle disappointment)

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये (Union cabinet Expansion) कोणा कोणाची वर्णी लागणार या संदर्भात अनेक तर्कवितर्क काढण्यात आले होते. यात डॉक्टर प्रीतम मुंडे यांना देखील मंत्रीपद देणार असल्याची बातमी पसरली. याच्यामध्ये प्रीतम मुंडे यांना कोणते मंत्री पद देऊ शकतील? इथं पर्यंत चर्चा रंगली. पण मंत्रिमंडळ विस्ताराचा दिवस उगवला आणि प्रीतम मुंडे यांच्या मंत्रिपदाचा संदर्भातल्या चर्चा थांबल्या. कारण भागवत कराड यांना मंत्रीपद दिल्याने प्रीतम मुंडे यांना देण्यात येणाऱ्या मंत्रिपदाची चर्चा संपली. परिणामी मुंडे भगिनी नाराज झाल्या असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली.

हा कॅबिनेट मंत्रीपद विस्तार झाल्यानंतर दररोज पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांच्या समर्थकांची नाराजीही उघडपणे ऐकवली. इतकंच काय तर मंगळवारची तारीख ठरली आणि थेट वरळीलाच हे समर्थक पोहोचणार असल्याचं कळलं. समर्थक येणार म्हणून गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान कार्यालयाच्या समोर मंडप सजला. समर्थक आले आणि घोषणाबाजी झाली. शिवाय कार्यकर्त्यांची तीव्र नाराजी ही त्यांच्या त्यांच्या शब्दात त्यांनी बोलून दाखवली.

कार्यकर्त्यांच्या भावना, संताप, राग अगदी पक्ष बदल करण्यासंदर्भात त्यांची इच्छा या सगळ्या गोष्टी बोलून झाल्यानंतर पंकजा मुंडे आल्या. पंकजा मुंडेकडे बघून आता पंकजाताई काहीतरी महत्त्वाचा निर्णय घेतील अशा अविर्भावात कार्यकर्ते देखील कान टवकारून ऐकू लागले पंकजाताई आल्या आणि कुठलीच नाराजी नाही सगळ्या बातम्या खोट्या आहेत असे म्हणत भाजप बाबत सारवासारव केली. पण दुसरीकडे धर्मयुद्ध आहे, पुढचा प्रवास खडतर आहे अशा शब्दांमध्ये भाजपमधील असलेली एकूणच नाराजी ही स्वतःच्या शब्दांमध्ये बोलून दाखवली. मग त्यात कौरव-पांडव यांचाही उल्लेख आला धर्मयुद्ध सुरू आहे, पुढचा प्रवासही खडतर असेल आणि मला संपवण्याचा प्रयत्न अनेकांनी केला आहे, असं म्हणत पंकजा यांनी भाजपला घरचा आहेर देण्याचा प्रयत्न केला.

कार्यकर्त्यांच्या समोर असलेल्या सभेमधून इतका बोलून दाखवल्यावर पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेत भाजप सोबत कायम राहणार असल्याचं म्हणत त्यांनी पुन्हा सारवासारव केली. एकूणच राष्ट्रीय सचिव जरी असलं तरी कॅबिनेट मंत्री पदाची अपेक्षा मुंडे भगिनींना होती पण साध्य न झाल्यामुळे काहीसा दबावतंत्र वापरण्याचा प्रयत्न पंकजा मुंडे यांनी केला हे तर निश्चित पण लगेचच करण्यात आलेल्या सारवासारव मुळे दबाव प्रभाव अशी परिस्थिती पंकजा मुंडे यांची झाली असल्याचं दिसून आलं.

Edited by- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : लाडक्या बहिणीचं पोर्टल बंद, आता नव्याने नोंदणी होणार नाही - ठाकरे

Shoking News : जेवणात मीठ कमी पडल्याने, गर्भवती महिलेला गमवावे लागले प्राण

Spiritual Shells: पैशाचा पाऊस पाडणारी कौरीची शेल कशी तयार होते? याचे महत्त्व काय आहे?

Dhule Tourism : वीकेंडसाठी धुळे परफेक्ट लोकेशन, 'ही' ३ ठिकाणं पाहताच आठवड्याचा थकवा जाईल पळून

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

SCROLL FOR NEXT