Saam Banner Template
Saam Banner Template 
बातम्या

एका कॉलवर मिळणार कोरोना लस; आता ऑनलाईन बुकिंगची गरज नाही

vikram shewale

नवी दिल्ली:  कोरोना संक्रमणाची दुसरी लाट (Coronavirus Second Wave) थांबली आहे. आणि अनलॉकची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत कोरोनाची लस (Corona Vaccine) घेणे फार महत्वाचे आहे. लोकांच्या सोयीसाठी केंद्र सरकारने कोवीन पोर्टलवर (CO-Win) हेल्पलाइन नंबर जरी केला आहे. ज्यावर लोक लसीसाठी कॉल करून स्लॉट बुक करू शकतात. याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात. कोविन पोर्टलचा (CO-Win Portal) हेल्पलाइन क्रमांक 1075 आहे. या नंबरवर कॉल करून लोक लसीसाठी स्लॉट बुक करू शकतात. सरकारच्या म्हणण्यानुसार हा नंबर गावातील लोक आणि फीचर फोन असलेल्या वापरकर्त्यांना लक्षात ठेवून देण्यात आला आहे. (You will get corona vaccine on one call Online booking is no longer required)

कोविड -19 लसीकरण सेवेचा लाभ घेण्यासाठी आता पूर्व-नोंदणीची किंवा पूर्व बुकिंगची गरज नसल्याचे केंद्र सरकारने मंगळवारी जाहीर केले. ग्रामीण भागातील बर्‍याच लोकांना लस घेण्यास अडचणी येत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार 18 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची कोणतीही व्यक्ती थेट जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन तिथेच नाव नोंदवून लस घेऊ शकते.

हे देखील पाहा 

असा करा स्लॉट बुक 
* कोरोनाच्या लसीसाठी स्लॉट बुक करण्यासाठी आपल्या मोबाईल वरून 1075 नंबर वर फोन करा.  
* आता फोनवरील निर्देशानुसार स्लॉट बुक करण्यासाठी २ दाबा  
* तुमचा फोने डायरेक्ट सरकारी अधिकाऱ्याला ट्रान्स्फर केला जाईल. 
* अधिकारी तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा पासपोर्ट यांचा नंबर     मागतील.
* नंबर सांगितल्यानांतर स्लॉट बुक आपला स्लॉट बुक होईल.   

टीपः आपण कोरोना लसीसाठी आरोग्य सेतू आणि को-विन अॅप वरून सुद्धा स्लॉट बुक करू शकता. 

मे महिन्यात भारत सरकारने कोविन पोर्टलवर एक नवीन वैशिष्ट्य जोडले होते. या नवीन वैशिष्ट्या अंतर्गत लोकांना लस स्लॉट बुकिंग करताना 4 अंकांचा क्रमांक (OTP) मिळेल. याचा उपयोग लसीकरणा दरम्यान केला जाईल. वापरकर्त्यांना हा कोड आरोग्य कर्मचाऱ्यांना द्यावा लागेल. यामुळे लसीकरण केलेल्या व्यक्तीची संपूर्ण माहिती नोंदवली जाईल.

Edited By : Pravin Dhamale

ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website - https://www.saamtv.com/
Twitter - https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब - https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम - https://t.me/SaamNews

 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live:कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याने घेतला चौदा जणांचा चावा; जखमीमध्ये 8 लहान मुलांचा समावेश

CSK Vs SRH : ऋतुराज गायकवाडची तुफानी फटकेबाजी, शतक अवघ्या २ धावांनी हुकलं; हैदराबादसमोर २१३ धावांचं लक्ष्य

Maharashtra Politics: मोदी आणि शाह यांना हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही, रत्नागिरीत उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली

Gujrat Fire News | गुजरातच्या बाजारात भीषण आग, नाडियाद परिसरात वाहनं जळाली

Rahul Gandhi: भाजप हा 'आरक्षण रद्द करा' टोळीचा अड्डा आणि मोदी त्यांचे नेते, राहुल गांधी यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT