vaccine
vaccine 
बातम्या

आधी तुम्ही लस टोचा, मग आम्हाला द्या

संजय डाफ, सामटीव्ही, नागपूर

चंद्रपूर  - गडचिरोली Gadchiroli जिल्ह्याच्या दुर्गम भागात लसीकरण आरोग्य यंत्रणेसाठी मोठं आव्हान ठरलंय. लोकांचा अविश्वास आणि अंधश्रद्धा, यामुळं लसीकरण Vaccination करणं कठीण झालं आहे. त्यामुळे आता आरोग्य विभागाची Health Department पथकं घरोघरी जाऊन लसीकरणाचे महत्व पटवून देत आहेत. एकीकडे शहरात लसी vaccine उपलब्ध नाहीत, तर दुसरीकडे या जिल्ह्यात लसी घ्यायला कुणी तयार नाहीत, अशी विसंगती बघायला मिळत आहे. You vaccinate first then give us

दुसऱ्या लाटेतील कोरोना ग्रामीण भागात वेगाने पसरला आहे. पहिल्या लाटेत ग्रामीण भागात विलगीकरण कक्ष स्थापीत होते. आता कोविड उपचार केंद्रे उभारली जात आहेत. आदिवासी भागात कोरोनाचा घातक शिरकाव झालाय; मात्र याचा मुकाबला लसीकारणाने करण्याऐवजी ग्रामदैवतांना 7 दिवस पाणी घालून केला जात आहे.

हे देखील पहा -

तर दुसरीकडे गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम आदिवासी गावांमध्ये लसीकरण मोठे आव्हान बनले आहे. सतत नॉट रीचेबल असणाऱ्या भामरागड तालुक्यात आदिवासींमध्ये लसीकरणाबाबत धक्कादायक गैरसमज दिसून येत आहेत. लसीकरण करताना 'अधिकाऱ्यांना देतात उत्तम लसी आणि आदिवासींना निकृष्ट', अशी अफवा आदिवासी गावात पसरली आहे. याचा मुकाबला करण्यासाठी जिल्ह्यातील आदिवासी गावात लसीकरण प्रोत्साहनासाठी पथके तयार केली गेली आहेत. You vaccinate first then give us

प्रत्येक गावात जाऊन घरोघरी लसीबाबत जनजागृती केली जात आहे, तर प्रत्यक्ष  केंद्रावर पथकातील सरकारी कर्मचारी सर्वांसमोर आधी लस घेत आहेत आणि मग तीच लस ग्रामस्थांना दिली जाते. शहरातील केंद्रांवर रोज लशीसाठी वादविवाद आहेत तर आदिवासी भागात केंद्रांवर शुकशुकाट पसरला आहे. ही परिस्थिती पाहून आरोग्य यंत्रणाही बुचकळ्यात पडली आहे. पण तरीही आरोग्य पथकं आपलं काम नेटानं पुढं नेण्याचा प्रयत्न करीत आहेत.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Lok Sabha: कल्याण लोकसभा मतदारसंघात राज ठाकरेंची सभा झाली तर आनंदच: श्रीकांत शिंदे

Maharashtra Politics: नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरेना? ठाकरेंच्या उमेदवाराची घौडदौड सुरुच

Maharashtra Politics 2024 : काँग्रेसचा विश्वजीत पैलवानासोबत; चंद्रहार पाटलांच्या प्रचारात सक्रीय

Maharashtra Politics 2024 : माढ्याच्या मैदानात फडणवीसांचा डबल धमाका; मोहिते- पवारांच्या गटात लावला सुरुंग

Health Tips: लसणाचे पाणी पिण्याचे फायदे ऐकून आजपासूनच प्यायला कराल सुरूवात

SCROLL FOR NEXT