बातम्या

चीनमुळे होणार तिसरं महायुद्ध? वाचा नेमकं काय घडलंय?

साम टीव्ही

चीनच्या कावेबाजपणामुळे आग्नेय आशियावर महायुद्धाचे ढग जमा झालेत. चीननं अमेरिकेला पुन्हा एकदा धमकी दिलीय. पाहुयात आता काय केलंय चिनी ड्रॅगननं.

दक्षिण चिनी समुद्राच्या मालकीवरनं अमेरिका-चीनमधील संघर्ष विकोपाला गेला असतानाच तैवानच्या सुरक्षेसाठी अमेरिकेनं सैन्य पाठवण्याची भाषा केली. तैवानच्या पाठिशी उभं राहण्याची अमेरिकेची भूमिका चीनला चांगलीच झोंबलीय. अमेरिकेनं तैवानमध्ये सैन्य पाठवलं तर चीन युद्ध छेडेल असा इशारा चीननं दिलाय. ग्लोबल टाईम्स या सरकारी मुखपत्रातून चीननं ही धमकी दिलीय. 

तिसऱ्या महायुद्धाचे ढग ?

  • दक्षिण चिनी समुद्राच्या मालकीवरनं चीन-अमेरिका आमनेसामने आलेत.
  • दक्षिण चिनी समुद्रावर चीनचा कोणताही मालकी हक्क नाही, असा अमेरिकेचा दावा आहे
  • दक्षिण चीनी समुद्रात चीन आरमारी ताकद वाढवतोय, यावर अमेरिकेनं तीव्र आक्षेप घेतलेत.
  • तैवानच्या सीमेत घुसण्याचा चीन वारंवार प्रयत्न करतोय, त्यावरुनही अमेरिकेनं इशारा दिलाय
  • तैवानच्या रक्षणासाठी अमेरिकी सैन्य येईल, असा इशाराही अमेरिकेनं दिलाय.

दक्षिण चीनी समुद्रात चीननं युद्धसरावासह आरमारी ताकद वाढवलीय. हाँगकाँगच्या स्वायत्तेवर चीन वारंवार हल्ला चढवतोय. तैवानवर कब्जा करायची चीननं तयारी केलीय. भारताशी चीनचा कपटीपणा सुरुच आहे. चीनच्या तुकड्यांवर जगणारा पाकिस्तान सोडला तर असा एकही शेजारी नाही ज्याच्याशी चीनचा वाद नाही. पण चीनच्या याच चिथावणीखोर कृतींमुळे आग्नेय आशियावर युद्धाचे ढग जमू लागलेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : कांदिवलीत निवडणूक भरारी पथकाची मोठी कारवाई; कारमधील १२ लाखांची रोकड जप्त

Pet Care in Summer: उन्हाळ्यात तुमच्या पाळीव प्राण्यांना 'या' पद्धतीनं ठेवा हायड्रेटेड

Sanju Samson Statement: इथंच राजस्थान रॉयल्सकडून चूक झाली; संजू सॅमसनने सांगितलं पराभवाचं कारण

कोल्हापूर : गाेव्याला निघालेल्या खासगी बसनं महिलेस चिरडलं, घटनास्थळी उसळली मोठी गर्दी

Vladimir Putin : पुतीन बनले पाचव्यांदा राष्ट्राध्यक्ष; शपथ घेताच पाश्चिमात्य देश आणि युद्धावर केलं मोठं भाष्य

SCROLL FOR NEXT