Sanju Samson Statement: इथंच राजस्थान रॉयल्सकडून चूक झाली; संजू सॅमसनने सांगितलं पराभवाचं कारण

DC vs RR, Sanju Samson Statement: राजस्थान रॉयल्स या सामन्यात मजबूत स्थितीत होता. मात्र अखेर दिल्लीविरुद्धच्या सामन्यात राजस्थानला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
Sanju samson statement after defeat against delhi capitals in rr vs dc match amd2000
Sanju samson statement after defeat against delhi capitals in rr vs dc match amd2000twitter

दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सचा संघ राजस्थान रॉयल्ससोबत २ हात करण्यासाठी मैदानात उतरला होता. या सामन्यात दिल्लीच्या फलंदाजांनी आणि नंतर गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. प्लेऑफमध्ये जाण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या राजस्थान रॉयल्स संघाला पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान या पराभवानंतर संजू सॅमसनचा हार्टब्रेक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. हा सामना झाल्यानंतर तो निराश असल्याचं दिसून आलं आहे.

दिल्ली कॅपिटल्सविरुद्धचा सामना झाल्यानंतर तो म्हणाला की, ' मला असं वाटतं की हा सामना आमच्याच हातात होता. आम्हाला जिंकण्यासाठी प्रत्येक षटकात ११-१२ धावा करायच्या होत्या. हे आव्हान आम्ही गाठणारच होतो. मात्र ही आयपीएल आहे आणि या स्पर्धेत अशा गोष्टी होतंच राहतात. आम्ही दोन्ही क्षेत्रात चांगली कामगिरी केली.आम्ही परिस्थितीनुसार खेळण्याचा प्रयत्न करू. २२० धावांचा पाठलाग करताना आम्ही १० पेक्षा अधिक धावा करत होतो. आम्ही आणखी काही मोठे फटके मारले असते, तर हा सामना आम्ही जिंकू शकलो असतो.'

Sanju samson statement after defeat against delhi capitals in rr vs dc match amd2000
IPL 2024 DC vs RR : एकाच षटकात २ विकेट घेत कुलदीपने पालटली बाजू; घरच्या मैदानावर दिल्लीने राजस्थानचा २० धावांनी केला पराभव

तसेच दिल्ली कॅपिटल्स संघातील फलंदाजांबद्दल बोलताना तो म्हणाला की, ' दिल्लीचा सलामीवीर फलंदाज फ्रेजर आला आणि त्याने तेच केलं जे तो आतापर्यंत करत आला आहे आम्ही आतापर्यंत ३ सामने गमावले आहेत,हे सर्व सामने अटीतटीचे होते. आम्ही खूप चांगला खेळ करतोय. काही गोष्टींमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. आम्ही नक्कीच कमबॅक करू.'

Sanju samson statement after defeat against delhi capitals in rr vs dc match amd2000
IPL 2024 DC vs RR: घरच्या मैदानात दिल्लीची फटकेबाजी; राजस्थानसमोर २२२धावांचे आव्हान

विजयाचं श्रेय कोणाला?

तसेच ट्रीस्टन स्टब्सबद्दल बोलताना तो म्हणाला की, ' दिल्लीच्या विजयाचं श्रेय ट्रीस्टन स्टब्सला द्यावंच लागेल. गेल्या १०-११ सामन्यांमध्ये संदीपने चांगली कामगिरी केली आहे. त्याच्याविरुद्ध फलंदाजी करताना ट्रीस्टन स्टब्सने शानदार कामगिरी केली.'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com