Saam Banner Template
Saam Banner Template 
बातम्या

'मराठा समाजावर होणारा अन्याय झोपलेल्या सरकारला कधी कळणार?'

श्रीराम पवार

मराठा आरक्षण (Mratha Reservation) पार्श्वभूमीवर जनजागृतीसाठी शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे (Vinayak Mete) यांचा सध्या राज्यव्यापी दौरा सुरू आहे. सोलापूरवरुन मुंबईकडे जात असताना दौंड तालुक्यातील यवत येथे माध्यमांशी बोलताना आमदार विनायक  मेटे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. यावेळी भाजपाचे जिल्हा सहसंयोजक गणेश आखाडे, वसंतराव साळुंखे, मनोज फडतरे यांच्या वतीने मेटेंचे स्वागत करण्यात आले.  यावेळी दोन्ही राजे एकत्र आले ही चांगली गोष्ट आहे, राज्यामध्ये मराठा समाजासाठी अनेक नेते, कार्यकर्ते  कार्य करत आहे त्यांचे स्वागत केले पाहिजे जे कोणी आरक्षणासाठी काम करत असेल त्याचे आम्ही स्वागतच करतो आघाडी सरकारचा हलगर्जीपणा मराठा आरक्षण रद्द होण्याला कारणीभूत ठरला आहे. (When will the sleeping government know about the injustice done to the Maratha community)

मराठा आरक्षण सुनावणी ते स्थगितीपर्यंत व नंतर आरक्षण रद्द होण्याच्या कालावधीपर्यंत आघाडी सरकारने बऱ्याच चुका केल्या आहेत. मराठा आरक्षणासाठी माओवाद्यांच्या पाठिंब्याचे पत्र ही गंभीर बाब आहे.  याचा सरकारने गंभीरपणे विचार केला पाहिजे. कारण आरक्षणाला समर्थन देण्याच्या नावाखाली जाळे पसरविण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.  दुर्दैवाने या सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा समाजाचे जे आरक्षण गेले त्यामुळे मराठा समाजाच्या गरीब विद्यार्थ्यांवर जो काही आघात झाला आहे, जो अन्याय झाला आहे, त्यामुळे जे असे विद्यार्थी गांजलेले असतील ते दुर्दैवाने त्या जाळ्यात ओढले गेले तर ग्रामीण भागाचे चित्र फार वेगळे होऊ शकते याचा विचार महाविकास आघाडी सरकारने केला पाहिजे.

हे देखील पाहा

  
राजकारणाच्या पलीकडे जाऊन सरकार कोणतेही असो अशा वाईट प्रवृत्ती जर ग्रामीण भागात जाळं पसरत जाऊ लागल्या, चांगल्या युवकांना जर जाळ्यात ओढायला लागल्या तर ही महाराष्ट्राच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे म्हणूनच जी गोष्ट मराठा समाजाच्या अन्यायाची अनेकांना कळती ती माओवादी व नक्षली यांना सुद्धा कळाली ती गोष्ट झोपलेल्या सरकारला कधी कळणार? असा प्रश्न विनायक मेटे यांनी विचारला आहे. समाजाचे वाटोळे झाल्यावर जाग येणार का ? आता तरी डोळे उघडा महाराष्ट्राचे नुकसान होण्याअगोदर निर्णय घ्या अशा वाईट प्रवृत्तीच्या हातामध्ये युवक पिढी जाऊ नये यासाठी पाऊल उचला असे आवाहन मेटे यांनी केले आहे.

एका कॉलवर मिळणार कोरोना लस; आता ऑनलाईन बुकिंगची गरज नाही
 
मराठा समाजाला खोटे बोलून फसविण्यात आले आहे. आरक्षण रद्द झाल्यामुळे तरुणांमध्ये सरकारविषयी प्रचंड चीड निर्माण झालेली आहे. मराठा समाजाचा जणू सरकारने विश्वासघात केल्याचे आमदार मेटे म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सहकारी दिल्लीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मराठा आरक्षणाबाबत नेमका कोणता निर्णय झाला याचा तपशील बाहेर येणे गरजेचे आहे, असे सांगत ठाकरे सरकारच्या हातात जे आहे ते त्यांनी दिले पाहिजे. यासाठी प्रयत्न सुरू असताना मात्र त्याला कोणताही प्रतिसाद दिला जात नाही असेही आमदार मेटे म्हणाले. 

मागासवर्गीय आयोग स्थापन झाला पाहिजे. फेरविचार याचिका दाखल झाली पाहिजे. ओबीसी बांधवांना आरक्षण व सोयी-सवलती तसेच संरक्षण सवलती लागू झाल्या पाहिजेत. अण्णासाहेब पाटील महामंडळ व  सारथी यामागण्या बाबतीत निर्णय झाले पाहिजे.  ५ जूनला बीडमधून संघर्ष मोर्चाची सुरुवात झाली आहे.  यावेळी अनेक अडथळे येऊन देखील मोर्चा यशस्वीपणे पार पडला.  २६ जूनला औरंगाबादेत छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून मेळावा घेण्यात येणार आहे. ३६ जिल्ह्यात मेळावे झाल्यानंतर विभागीय मोर्चा होईल. त्यानंतर मुंबईत महामोर्चा व  मुंबईत जनजागृती रॅली काढण्यात येणार असल्याचे आमदार विनायक मेटे यांनी सांगितले.

महायुतीचे घटकपक्ष शिवसंग्रामचे अध्यक्ष मा.आमदार विनायकजी मेटे साहेब. हे सोलापूरहून मुंबईकडे प्रवास करीत कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी यवत येथे थांबणार असल्याची माहिती मिळताच  गणेश आखाडे यांनी त्यांच्या साठी पत्रकार परीषदेचे आयोजन केले होते. या प्रसंगी संतोषजी गडदरे, भाऊसाहेब सोनवणे, अविनाश अवचट,युवराज बंड,श्री विवेक पवार, नामदेव पवार,  रूपेश मांजरेकर ,संदिप महामुनी व पदाधिकारी उपस्थित होते.

Edited By : Pravin Dhamale

ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website - https://www.saamtv.com/
Twitter - https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब - https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम - https://t.me/SaamNews

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supreme Court: ...तर मानधन सोडा, घशाला आराम द्या; रोहतगींच्या त्या विनंतीवर CJI चंद्रचूड यांचं उत्तर

Pune Crime: कात्रज,स्वारगेट परिसरात दोन जणांचा खून; शिवीगाळ केल्याच्या वादातून एकाने डोक्यात घातला दगड

Maharashtra Drought: राज्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र; नद्या आटल्या, विहिरी कोरड्याठाक, हंडाभर पाण्यासाठी वणवण

Lok Sabha Election: तिसरा टप्पा BJP साठी महत्त्वाचा, 2019 मध्ये याच टप्प्यात मिळालं होतं मोठं यश; यंदा काय आहे राजकीय परिस्थिती?

MI vs SRH,IPL 2024: हैदराबादवर सूर्या कोपला! शतकी खेळीनं मुंबईच्या लल्लाटी विजयी 'तिलक', प्ले ऑफची समीकरणंच विस्कटली

SCROLL FOR NEXT