बातम्या

 आता शाळेत वाजणार ‘वॉटर बेल’

साम टीव्ही न्यूज


मुंबई : केरळमधील एका शाळेत सगळ्यात आधी वॉटर बेल उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. याच धर्तीवर आता असोसिएशन आॅफ प्रायमरी एज्युकेशन अँड रिसर्च संस्थेने सुद्धा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत पुणे, दिल्ली, बंगळुरू येथील शाळांमध्ये हा उपक्रम राबविला. शालेय विद्यार्थी पुरेसे पाणी पीत नसल्यामुळे त्यांना विविध आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना पाणी पिण्याची आठवण करून देण्यासाठी शाळेत आता तीन वेळा वॉटर बेल वाजविण्यात येणार आहे. तसे परिपत्रक शालेय शिक्षण विभागाने मंगळवारी काढले.

अनेक लहान मुले सकाळी घरातून नेलेले पाणी पुन्हा घरी घेऊन येतात. आपली मुले शाळेत पाणी पीत नसल्याच्या अनेक तक्रारी पालक नेहमी करत असल्याचे अनेक सर्वेक्षणातूनही समोर आले आहे.दिवसभरात ठरावीक वेळेच्या अंतराने आवश्यक प्रमाणात पाणी पिणे हे आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक आहे. मुलांच्या वजन, उंची, वयानुसार त्यांनी रोज दीड ते दोन लीटर पाणी पिणे आवश्यक आहे. मुलांचा दिवसातील पाच ते सात तासांचा कालावधी शाळेत जातो. या कालावधीत शरीराला पाण्याची अनेकदा गरज असूनही अभ्यास, खेळ यामुळे अनेक विद्यार्थी पाणीच पीत नाहीत. 

विद्यार्थ्यांनी शाळेच्या वेळेत शरीराला आवश्यक तेवढे पाणी प्यावे आणि त्यासाठी त्याची आठवण व्हावी यासाठी तीन वेळा पाणी पिण्याची आठवण करून देण्यासाठी वॉटर बेल वाजविण्यात येणार आहे. 

Web Title: 'Water Bell' to be played at school
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MP Pritam Munde: भाजप संविधान बदलणार? भरसभेत खासदार प्रीतम मुंडेंनी घेतला विरोधकांचा समाचार

Today's Marathi News Live : नवी मुंबईत आज उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार

Sangli Loksabha News: वंचितचा पक्ष वंचितांसाठी आहे की धनदांडग्यांसाठी? प्रकाश शेंडगेंचा सवाल; विशाल पाटलांच्या पाठिंब्यावरुन टीकास्त्र

Neck Pain: मान अवघडू नये त्यासाठी 'हे' उपाय ठरतील रामबाण

Hair Care Tips: 'या' टीप्स फॉलो केल्यास केसांची होईल झपाट्याने वाढ

SCROLL FOR NEXT