ulhasnagar
ulhasnagar  
बातम्या

उल्हासनगरात पुन्हा एकदा इमारतीचा स्लॅब कोसळला, 7 जणांचा मृत्यू 

सिद्धेशसावंत

उल्हासनगर :- उल्हासनगरात Ulhasnagar पुन्हा एकदा इमारतीचा Building स्लॅब Slab कोसळल्यानं Collapsed मोठी दुर्घटना घडली आहे. एका महिन्यात दोन वेळा त्याच प्रकारची घटना घडली आहे. काल रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास कॅम्प क्रमांक दोन मधील साई शक्ती या चार मजली इमारतीचा स्लॅब अचानक कोसळला. In Ulhasnagar,Once Again A Slab Of A Building Collapsed, Killing 7 People

चौथ्या मजल्याचा स्लॅब कोसळत थेट तळमजल्यावर आला,या इमारतीत एकूण 29 फ्लॅट्स होते,त्यातील 15 फ्लॅट्स रिकामे होते, या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला असून एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे.

या दुर्घटनेत कृष्णा बजाज, दिनेश चांदवानी, मोहिनी चांदवानी, दीपक चांदवानी, पुनीत चांदवानी, नम्रता बजाज आणि लवली बजाज या सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर इमारती मधील राहिवाश्यांनी दिलेल्या माहिती नुसार सात जण ढिगाऱ्याखाली सापडल्यानंतर रात्री एक वाजता बचावकार्य बंद करण्यात आले.In Ulhasnagar,Once Again A Slab Of A Building Collapsed, Killing 7 People

पालकमंत्री एकनाथ शिंदे Eknath shinde यांनी दुर्घटनाग्रस्त इमारतीची पाहणी केली आहे. सदरच्या इमारतीचे स्लॅब अनधिकृत असल्याने तोडण्यात आले होते. नंतर पुन्हा स्लॅब मधील सळ्या वेल्डिंग करून हे स्लॅब भरण्यात आले असल्याने ही दुर्घटना घडली आहे.

या इमारतीच्या विकासकावर गुन्हे करण्यात येतील तसेच उल्हासनगर मध्ये क्लस्टर राबविण्याचा प्रयत्न केला जाणार असून, मृत्यू पावलेल्यानं 5 लाखाची मदत जाहीर केली जाणार असल्याची प्रतिक्रिया नगरविकासमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री  एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. In Ulhasnagar,Once Again A Slab Of A Building Collapsed, Killing 7 People

गेल्या आठवडाभरापूर्वीच उल्हासनगर मधील मोहिनी पॅलेस इमारतीमध्ये देखील अशाच प्रकारची दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत देखील चार जणांचा मृत्यू झाला होता.

या दुर्घटनेनंतर उल्हासनगर महानगरपालिका Muncipal Corporation आयुक्त Commissioner डॉ.राजा दयानिधी यांनी शहरातील सर्व इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिले होते. सतत घडणाऱ्या या घटनांमुळे उल्हासनगरमधील धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. 

Edited By : Krushnarav  Sathe 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: भाजप-मनसेच्या युतीत शिवसेनेचा खोडा; बाळा नांदगावकरांचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics 2024 : मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढली?; निवडणूक आयोगाच्या सुधारित टक्केवारीवरून वाद

Maharashtra Politics 2024 : आमदार म्हणताहेत, ''खासदार' झाल्यासारखं वाटतंय'; महाराष्ट्रात 13 आमदार लोकसभेच्या रिंगणात

Health Tips: उन्हाळ्यात माठातील पाणी का प्यावे?

SRH vs RR : राजस्थानच्या तोंडचा घास हैदराबादने हिसकावला; रोमहर्षक सामन्यात 1 रन्सने हैदराबादचा राजस्थानवर विजय

SCROLL FOR NEXT