akola news
akola news 
बातम्या

विठ्ठल महाराज साबळे यांना वारकऱ्यांकडून श्रद्धांजली अर्पण

जयेश गावंडे

अकोला - महाराष्ट्रातील Maharashtra ख्यातनाम मृदंग वादक व प्रसिद्ध कीर्तनकार ह भ प श्री विठ्ठल महाराज साबळे Vitthal Maharaj Sable व त्यांच्या सौभाग्यवती गोकुळाबाई साबळे यांचे नुकतेच निधन Death झाल्याने वारकरी Warkari संप्रदायामध्ये फार मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. महाराजांचा फार मोठा भक्त परिवार आहे. Tribute to Vitthal Maharaj Sable from Warakaris

महाराजांच्या मित्रमंडळीच्या माध्यमातून योग योगेश्वर संस्थान वरुर जऊळका येथे श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. याप्रसंगी श्रीधर महाराज अवारे Shridhar Maharaj Aware हे अध्यक्षस्थानी होते. महाराजांनी आपल्या जीवनातील साबळे महाराजांच्या संगतीत आलेले अनुभव सांगितले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमदार अमोल  मिटकरी Amol Mitkari हे उपस्थित होते. 

हे देखल पहा -

मिटकरी यांनी आपल्या श्रद्धांजलीपर भाषणात बोलताना सांगितले की, विठ्ठल महाराज साबळे हे आम्हाला वडील स्थानी होते आज आमचा खूप मोठा आधार गेलेला आहे पण महाराजांचा मुलगा ऋषी साबळे यांच्याकडे आम्ही दुर्लक्ष करणार नाही व आता ऋषी साबळे सरकारी दवाखान्यातून प्रायव्हेट दवाखान्यामध्ये भरती केलेला आहे व त्याच्या प्रायव्हेट दवाखान्यातील सर्व खर्च मी करणार एवढेच नाही तर साबळे महाराज प्रत्येकांच्या स्मरणात राहायला पाहिजे याकरिता मी माझ्या निधीमधून स्वर्गीय विठ्ठल महाराज साबळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ किमान पंधरा लाखापर्यंत वारकरी रुग्णवाहिका देण्याचे आमदार अमोल मिटकरी यांनी जाहीर केले. आमदार अमोल मिटकरी श्रद्धांजलीपर भाषण देत असताना गहिवरून आले व त्यांना अश्रू अनावर झाले.  Tribute to Vitthal Maharaj Sable from Warakaris

त्याप्रमाणे राष्ट्रवादीचे अकोला जिल्हाध्यक्ष संग्राम भैय्या गावंडे यांनी साबळे महाराज यांच्या कुटुंबाला 21 हजार रुपयांची मदत जाहीर केली त्यानंतर सुभाष महाराज काळे यांनी महाराजांच्या संगतीत आलेले अनुभव श्रद्धांजलीपर भाषणामध्ये सांगितले याप्रसंगी अरुण महाराज बुरघाटे, श्रीधर महाराज पातोंड आदींचे श्रद्धांजलीपर भाषण झाले तेव्हा सर्वांचे अश्रू अनावर झाले याप्रसंगी काशिनाथ महाराज आंधळे आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाचे आयोजन रतन महाराज वसु व योगेश्वर संस्थान चे अध्यक्ष गणेश महाराज शेटे यांनी शासनाच्या नियम व अटींचे पालन करून केले.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics 2024 : मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढली?; निवडणूक आयोगाच्या सुधारित टक्केवारीवरून वाद

Maharashtra Politics 2024 : आमदार म्हणताहेत, ''खासदार' झाल्यासारखं वाटतंय'; महाराष्ट्रात 13 आमदार लोकसभेच्या रिंगणात

Health Tips: उन्हाळ्यात माठातील पाणी का प्यावे?

SRH vs RR : राजस्थानच्या तोंडचा घास हैदराबादने हिसकावला; रोमहर्षक सामन्यात 1 रन्सने हैदराबादचा राजस्थानवर विजय

Mangoes: दीर्घकाळापर्यंत आंबे कसे ठेवाल ताजेतवाने

SCROLL FOR NEXT