PPE Kit
PPE Kit 
बातम्या

पीपीई कीटसाठी मयतांच्या नातेवाईकांकडून उकळले हजारो रुपये!

चेतन इंगळे

वसई विरार: वसई विरार Vasai Virar शहरात करोना Corona दुसऱ्या लाटेने कहर माजवला असताना शहरात मोठ्या प्रमाणात मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. यात करोना मयतांच्या नातेवाईकांची खाजगी रुग्णालयांनी Private Hospitals लुट चालवली आहे. Thousands of rupees are being taken from the relatives of the deceased for PPE kits

मृत्यू नंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पीपीई कीटसाठी मयतांच्या नातेवाईकांकडून ७ कीट साठी तब्बल ४५०० रुपये उकळले जात आहेत. असा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 
 
मागील काही दिवसांपासून करोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे.  ८०० हून अधिक रुग्ण फक्त एका दिवसाला सापडत आहेत. त्याच प्रमाणात दिवसाला २० ते ३० रुग्णांचे  पालिकेतर्फे अंत्यसंस्कार केले जात आहे. ते कोरोना बाधित आणि संशयित रुग्ण असल्याचे मयतांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला जात नाही.

रुग्णालयातर्फे  पूर्णतः गुंडाळून पालिकेच्या Municipality ताब्यात मृत व्यक्ती दिले जातात. यावेळी या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी पालिकेतर्फे स्मशानभूमीत आणि रुग्णवाहीकेवर कर्मचारी नेमलेले आहेत. हे कर्मचारी पिपिई कीटची मागणी करून मयतांच्या नातेवाईकांकडून हजारो रुपये घेत आहेत. मुळात पालिकेने हे कीट मोफत देत असल्याची माहिती दिली आहे. असे असतानाही रुग्णाच्या नातेवाईकांकडून पैसे उकळले जात आहेत. Thousands of rupees are being taken from the relatives of the deceased for PPE kits

पश्चिम रेल्वेचे कर्मचारी अजय परब यांच्या वडिलांचा १६ एप्रिल रोजी कोरोना झाल्याच्या कारणाने मृत्यू झाला  होता. यावेळी पालिकेच्या रुग्णवाहिकेकडून पीपीई कीटसाठी तब्बल ४५०० रुपये त्यांना मागण्यात आले. विशेष बाब म्हणजे याचे कोणतेही देयक त्यांनी मागितले असूनही त्यांना ते देण्यात आले नाही. यावर परब यांनी माहिती दिली कि, त्यांना रुग्णवाहिकेतील एक कर्मचाऱ्याने हे पैसे पीपीई कीटसाठी असे सांगून मागितले. त्या क्षणी परब हे दु:खात असल्याने त्यांनी कोणताही वाद न करता हे पैसे दिले.

पण नंतर त्यांना माहिती मिळाली की पालिका पीपीई कीट मोफत देत असते. त्यांनी सांगितले की, दिवसाला किमान  २० ते ३० मृत्यू  कोरोनामुळे होत आहेत. त्यात सर्व रुग्णांच्या नातेवाईकांना पीपीई कीटचे पैसे  कर्मचाऱ्यांकडून मागितले जात आहेत. यामुळे रुग्णालयांनी आणि रुग्णवाहिका चालकांनी नागरिकांची सर्रास लुट चालविल्याचा आरोप त्यांनी केला आहे. Thousands of rupees are being taken from the relatives of the deceased for PPE kits

या संदर्भात पालिकेने अशा प्रकारे पैसे स्वीकारल्याचे आरोप सर्व फेटाळून लावले असून सर्व मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना पीपीई कीट महापालिका मोफत देत आहेत असे सांगितले. जर यासाठी पैसे घेण्याचा प्रकार आढळून आला तर त्याची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल. असे आश्वासन   वसई विरार महानगर पालिकाच्या आयुक्त गंगाथरन डी. दिली आहे. 

Edited By- Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Exercise Tips: व्यायाम करण्याचा कंटाळा येतोय? या पद्धतीने करा व्यायाम,दिवसभर राहाल फ्रेश

Hemant Dhome News : "साहेब आपली क्षमता आणि चिकाटी आम्हा तरूणांना..."; हेमंत ढोमेची शरद पवारांसाठीची पोस्ट चर्चेत

T20 World Cup 2024 | टी-२० वर्ल्डकप सुरू होण्याआधीच धडकी भरवणारी बातमी! दहशतवादी हल्ल्याची धमकी

Nana Patole On Narendra Modi | अग्निवीर योजनेबद्दल नाना पटोले काय बोलले?

Hapus Mango : देवगडचा की दक्षिण भारतातला? खरा हापूस आंबां कसा ओळखायचा?

SCROLL FOR NEXT