बातम्या

राज्यात आता लॉकडाऊन होणार नाही - राजेश टोपेंचे स्पष्टीकरण

साम टीव्ही

राज्यात पुन्हा एकदा लॉकडाउन होणार नाही तर आता 'अनलॉक'च असेल. असे स्पष्टीकरण आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलंय. राज्यात करोनाच्या चाचण्या हव्या त्या प्रमाणात होत नाहीत आणि मृत्यूदर लपवला जातो, असे आरोप खोडून काढत त्यांनी चाचण्यांच्या आकडेवारीसह स्पष्टीकरण दिले. सध्या करोनाची वाढत चाललेली संख्या हा चिंतेचा विषय नसून, मृत्यूदर कमी करणे, यावर आम्ही अधिक भर देत आहोत. असंही त्यांनी स्पष्ट केलं..

कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातलंय.या विषाणूने आतापर्यंत 4 लाख 96 हजार नागरिकांचा बळी घेतला आहे.तर कोरोनाग्रस्तांची संख्या 98 लाख 98 हजारावर पोहोचली असून आतापर्यंत 53 लाख 50 हजार रुग्ण बरे झालेत. जगातील जवळपास सर्व प्रमुख देश या विषाणूविरोधात लढत आहेत. दरम्यान या विषाणूला रोखण्यासाठी बहुतांश ठिकाणी लॉकडाऊन करण्यात आलंय.

राज्यात शुक्रवारी सर्वाधिक 5  हजार 24 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झालीय...तर  175 करोना बाधिताचा मृत्यू झालाय. यापैकी 91 मृत्यू मागील ४८ तासातील आहेत तर 84 मृत्यू मागील कालावधीतील आहेत. राज्यातील मृत्यू दर 4.65 % आहे. दरम्यान काल 2 हजार 362 रुग्ण बरे होऊन घरी परतले, आतापर्यंत एकूण 79 हजार 815 जण करोनामुक्त झालेत. तर 65 हजार 829  ऍक्टिव्ह रुग्ण आहेत...राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 1 लाख 52 हजार 865 वर पोहचलीय.

एवढच काय तर, जगात महासत्ता म्हणून ओळख असलेल्या अमेरिकेत कोरोनाने हाहाकार केलाय. अमेरिकेत मृतांचा आकडा 1 लाख 27 हजारांवर पोहोचलाय. तर सध्या अमेरिकत 
25 लाख 52 हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यामुळे करोनाचा फटका अमेरिकेला सर्वाधिक बसला आहे.

नवी मुंबईतल्या कंटेन्मेंट झोनमध्ये येत्या 29 तारखेपासून पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू होणार आहे. शहरातील 44 कंटेन्मेंट झोनमध्ये 7 दिवसांसाठी हा लॉकडाऊन असेल. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हा निर्णय घेण्यात आलाय. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आणि पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर शिंदे यांनी ही निर्णय जाहीर केला. शिवाय या लॉकडाऊनच्या काळात घरोघरी जाऊन मास स्क्रिनिंगही केलं जाणार आहे. 

मात्र, राज्यात पुन्हा एकदा लॉकडाउन होणार नाही तर आता 'अनलॉक'च असेल... असे स्पष्टीकरण आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dharashiv News : धाराशिवमध्ये १६ बालकांना इंजेक्शनची रिअॅक्शन; ताप, उलटीमुळे हैराण

Special Report : Pune Lok Sabha | भाजपची हॅट्रीक की कॉंग्रेसचं कमबॅक?

Rohit Pawar News | बारामतीच्या प्रचारातील व्हिडीओ व्हायरल, प्रचाराचे पैसे न दिल्याचा आरोप

Poha Idli : सकाळी नाश्त्यात बनवा पोहा इडली; जाणून घ्या रेसिपी

Today's Marathi News Live : महायुतीचा पालघरमधील तिढा सुटला

SCROLL FOR NEXT