mucormycosis 
बातम्या

अमरावतीत ‘म्युकरमायकोसिस’ रुग्णांच्या सर्वेक्षणाला सुरुवात

अमोल कविटकर, साम टीव्ही, पुणे

अमरावती - कोरोना Corona काळातील उपचारादरम्यान स्टेरॉईडसारख्या औषधांच्या Medicine अतिवापरामुळे कोरोनानंतर ‘म्युकरमायकोसिस’ Mucormycosis अर्थात काळी बुरशी या आजाराची लागण होण्याची शक्यता अनेक रुग्णांमध्ये आहे. या संदर्भातील लक्षणे दिसताच त्वरित डॉक्टरांचा Doctor सल्ला घ्या. वेळेत उपचार करा आणि ‘म्युकरमायकोसिस’ला दूर करा असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले असेल तरी अमरावती Amravati जिल्ह्यात कोरोनानंतर ‘म्युकरमायकोसिस’ च्या रुग्णांचे सर्वेक्षण Survey आता अमरवतीत आरोग्य यंत्रणे मार्फत सुरु केले आहे.  Survey of Mucormycosis patients begins in Amravati

या सर्वेक्षणात सुरुवातीला २१ हजार रुग्णाचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यापैकी सध्या स्थितीत ३ हजार रुग्णांचे सर्व्हेक्षण झाले असून यात ८ रुग्णांना ‘म्युकरमायकोसिस’ अर्थात काळी बुरशी या आजाराची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यापैकी ४ रुग्णनांवर उपचार सुरु करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज प्रसार माध्यमांसोबत बोलतांना दिली.

हे देखील पहा -

तर जिल्ह्यात आता पर्यंत तब्बल १६७ म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळून आले. त्यापैकी सध्या स्थितीत ५१ रुग्णनांवर शहरातील आठ हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु आहेत. उर्वरित रुग्ण हे बरे झाले आहेत. हे सर्वेक्षण शहरासह ग्रामीण भागातही सुरु असल्याची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली आहे.‘म्युकरमायकोसिस’ हा आजार धोकादायक असला तरी तो योग्य उपचाराने बरा होऊ शकतो. Survey of Mucormycosis patients begins in Amravati

या आजाराचे औषध उपलब्ध आहे ही एक दिलासादायक बाब आहे. त्यामुळे उगाच मनात भीती बाळगून घाबरून जाऊ नये. आज प्रत्येकाने सतर्क राहण्याची गरज आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारात झालेला औषधांचा जास्त वापर, अँटिबायोटीकचे हाय डोज अशा इतर कारणांमुळेही  ‘म्युकरमायकोसिस’चा धोका वाढला आहे. या परिस्थितीमध्ये प्रत्येकाने सजग राहण्याची गरज आहे.

Edited By - Shivani Tichkule
 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ola Electric Scooter: ई-सायकलीच्या किंमतीत मिळणार ओलाची नवीकोरी इलेक्ट्रिक स्कूटर, जाणून घ्या फीचर्स अन् किंमत

Thank आणि Thank You यामधील नेमका फरक माहितीये का?

Maharashtra News Live Updates: अंधेरी पश्चिमेतील एका इमारतीला भीषण आग; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

Viral Video: हद्दच झाली! बाजारात अश्लील डान्स नंतर नागरिकांनी धु धु धुतले; तरुणाच्या कारनाम्याचा VIDEO व्हायरल

Mumbai Crime : दुसऱ्या पत्नीला आई म्हणण्यास मुलाने दिला नकार, बापाने मुलाचा काटा काढला

SCROLL FOR NEXT