बातम्या

'राहुल हेच पंतप्रधानपदाचे उमेदवार'

सकाळ न्यूज नेटवर्क

चेन्नई : "पुढील निवडणुकीत कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हेच पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील,'' असे प्रतिपादन द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांनी आज येथे केले. 

द्रमुकच्या मुख्यालयात बसविण्यात आलेल्या एम. करुणानिधी यांच्या पुतळ्याचे अनावरण कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्या हस्ते झाले. या निमित्ताने विरोधकांची एकजूट दिसून आली. राहुल गांधी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन आदी उपस्थित होते. 

या वेळी स्टॅलिन यांनी राहुल गांधी यांचे कौतुक केले. तसेच, नरेंद्र मोदी यांच्यावर तीव्र टीका केली. ते म्हणाले, ""मोदी राजवटीत देश पंधरा वर्षे मागे गेला. त्यांना पुन्हा संधी दिली, तर देश आणखी 50 वर्षे मागे जाईल. मोदी हे राजासारखे वागत आहेत. त्यामुळे लोकशाही आणि देश वाचवण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलो आहोत.'' ""तमिळनाडूच्या भूमीतून मी आज पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून राहुल गांधी यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवत आहे,'' अशी घोषणाही त्यांनी या वेळी केली. 

राहुल गांधी यांनीही मोदींवर टीका केली. ""देशातील प्रतिष्ठित स्वायत्त संस्था आम्ही उद्‌ध्वस्त होऊ देणार नाही. करुणानिधी यांनी देशातील स्वायत्त संस्थांचे रक्षण केले होते आणि आताचे केंद्रातील सरकार हे तमिळनाडू आणि देशाच्या संस्कृतीवर हल्ला करीत आहे. आगामी निवडणुकांमध्ये आम्ही सर्व एकत्र येऊन भाजपला पराभूत करू,'' असे ते म्हणाले. 

"घटनात्मक मूल्ये आणि देशाची विचारधारा नष्ट करू पाहणाऱ्या राजकीय पक्षांविरोधात लढा देण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत,'' असे सोनिया गांधी या वेळी म्हणाल्या. 

Web Title: Stalin proposes Rahul as PM candidate for 2019 leaves many in Opposition surprised

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CBSE Results 2024: प्रतीक्षा संपली! सीबीएसई १० आणि १२ वीचा निकाल कधी लागणार? महत्वाची अपडेट आली समोर

Loksabha Election: प्रसिद्ध गायक नंदेश उमप लोकसभेच्या रिंगणात; ईशान्य मुंबईमधून भरला अर्ज

Breakfast Recipe: नाश्त्याला बनवा १० मिनीटांत तयार होणारे दडपे पोहे

Benefits of Chana Dal : चण्याची डाळ खा आणि चमत्कारिक फायदे मिळवा; आजच आहारात समावेश करा

Anita Date : ‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम अनिता दातेने खरेदी केली नवी कोरी गाडी; अभिनेत्रीवर होतोय कौतुकाचा वर्षाव

SCROLL FOR NEXT