Ransom
Ransom 
बातम्या

गृहमंत्र्यांच्या नांवे पोलिस अधिकाऱ्याने खंडणी मागितल्याचा व्यापाऱ्याचा आरोप

विश्वभूषण लिमये

सोलापूर : कोरोनाच्या Corona पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रात Maharashtra कडक निर्बंध लागू आहेत.  सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात फक्त वैद्यकीय Medical सुविधा सोडता अन्य कोणालाही आस्थापने सुरु ठेवण्यास परवानगी नाही. अशातच सराफी दुकान सुरु ठेवणाऱ्या एका व्यापाऱ्याने एका पोलिस Police अधिकाऱ्याने आपल्याकडे गृहमंत्र्यांच्या नांवे खंडणी मागितल्याचा आरोप केला आहे. संबंधित पोलिस अधिकाऱ्याने हा आरोप नाकारला आहे. Barshi Trader Accused Police Officer for Demanding Ransom

बार्शी तालुक्यातील अमृतराव गुगळे या सराफ व्यावसायिकाने कडक निर्बंधांमध्ये सोन्याचे दुकानं सुरु ठेवल्याने काल बार्शी शहर पोलिसांनी दुकानं सील केलं होते. त्यावर बार्शी शहरचे पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी तब्बल ५ लाख रुपयांची मागणी केली आणि ते देण्यास नकार दिल्याने दुकान सील केल्याचा आरोप सराफ व्यापारी गुगळेंनी केला आहे. 

दरम्यान हे सर्व हप्ते गृहमंत्रालयापर्यंत Home Ministry पोहोचवावे लागतात, असेही पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावींनी आपल्याला सांगितल्याचा या व्यापाऱ्याचा आरोप आहे. याबाबतचा व्हिडिओ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी Raju Shetty यांनी ट्वीट करत या प्रकरणाला उजेडात आणले आहे. या संपूर्ण प्रकरणासंदर्भात पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्याशी दूरध्वनीद्वारे विचारणा केली असता, त्यांनी हे संपूर्ण आरोप फेटाळले आहेत आणि संबंधित सराफ व्यापाऱ्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे म्हटले आहे.

संबंधित व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल करणार
याबाबत बार्शी शहर काँग्रेस Indian National Congress अध्यक्ष जीवन दत्त अरगडे यांनी शनिवार-रविवार बार्शी शहरात कडक लाॅकडाऊन Lock Down असतानाही दिनांक १७ एप्रिल शनिवार रोजी बार्शी शहरातील चांदमल ज्वेलस हे दुकान उघडे असल्याची माहिती बार्शी शहर पोलीस स्टेशनला कळवली. याची पाहणी करण्यासाठी बार्शी शहर चे पोलीस कर्मचारी गेले असताना सदरील दुकान सुरू असल्याचे आढळून आल्यामुळे बार्शी शहर पोलीस स्टेशन येथे चांदमल ज्वेलर्सचे मालक गुगळे यांच्यावर कायदेशीर गुन्हा नोंद करण्यात आला. Barshi Trader Accused Police Officer for Demanding Ransom

या अगोदरही गेल्या पंधरा दिवसा खाली सावकारी गुन्ह्याखाली व नागरिकांची दमदाटी करून मालमत्ता हडप करण्याचे गुन्हा नोंद झालेला असल्याची माहिती पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संतोष गिरी गोसावी यांनी दिली. तसेच काही यूट्यूब चॅनल ला खोट्या मुलाखत देऊन त्याच बरोबर पूर्वग्रहदूषित होऊन अशा प्रकारचे खोटे व पोलिसांची चरित्र हनन करणारे तथ्यहीन आरोप केलेले आहेत. पोलीस प्रशासनाची बदनामी करत असल्याचे आढळून आल्यामुळे लवकरच गुगळे यांच्यावर पोलिस प्रशासना मार्फत लवकरच कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे बार्शी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष गिरी गोसावी यांनी सांगितले.
Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Accident News | पुण्यात लोखंडी रोल कोसळून अपघात

Maharashtra Election News | महायुतीच्या प्रचाराकडे छगन भुजबळांची पाठ? पडद्यामागं नेमकं चाललंय काय?

Today's Marathi News Live : सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरण, आरोपींना ८ मे पर्यंत पोलिस कोठडी

Sahil Khan arrests in Mahadev betting app case | अभिनेता साहिल खान प्रकरणात मोठी बातमी

Jalna News: थोडक्यात मोठा अनर्थ टळला! जालन्यात हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लॅन्डींग!

SCROLL FOR NEXT