Maharashtra Election News | महायुतीच्या प्रचाराकडे छगन भुजबळांची पाठ? पडद्यामागं नेमकं चाललंय काय?

नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही. छगन भुजबळ यांनी निवडणूक लढणार नाही, असं जाहीर केलं असलं तरी, ते नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दुसरीकडे भुजबळ यांनी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारसभांकडे पाठ फिरवल्याची चर्चा आहे. पुणे, सोलापूर, माळशिरस, बीडसह विविध भागांमध्ये छगन भुजबळ यांच्या प्रचारसभा व्हाव्यात, असे महायुतीच्या उमेदवारांसह अनेक नेत्यांना वाटतंय. पण भुजबळ यांनी प्रचारसभांकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात येत आहे. नाशिक लोकसभेच्या तिकीटावरून भुजबळ अजूनही नाराज असल्याचंही बोललं जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com