बातम्या

स्टेट बँकेकडून व्याजदरात होणार कपात 

सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली - बँकेने कर्जावरील व्याजदर 0.10 टक्क्यांनी कमी केला आहे. यामुळे स्टेट बँक ऑफ इंडियाचा एक वर्ष मुदतीचा एमसीएलआर 8.25 टक्क्यांवरून 8.15 टक्के झाला आहे. 10 सप्टेंबरपासून हे नवे दर लागू होणार आहेत. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने पुन्हा एकदा व्याजदरात कपात केली आहे. एसबीआयने एमसीएलआर (मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेण्डिंग रेट्स) आधारित व्याजदर कमी केल्याची माहिती मिळत आहे.

बँकेने रिटेल डिपॉजिटवरील दरांमध्ये 0.20 वरून 0.25 टक्क्यांची कपात केली आहे. तसेच बल्क टर्म डिपॉजिट दरामध्ये 0.10 वरून 0.20 टक्क्यांपर्यंत कपात करण्यात आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.एसबीआयने 2019-20 या आर्थिक वर्षात पाचव्यांदा व्याजदरात कपात केली आहे. कमी व्याज दर आणि बँकेकडे असलेली रोख रक्कम यामुळे स्टेट बँक ऑफ इंडियाने फिक्स्ड डिपॉजिटवरील व्याजदरात कपात केली आहे.


वाहन कर्ज घेणार असल्यास वाहन कर्जा(Auto Loan)वर प्रोसेसिंग फीच्या नावे कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. तसेच बँकेचं पर्सनल लोन (Personal Loan) आणि एज्युकेशन लोन (Education Loan)चा परतफेड कालावधी(Repayment Tenure) वाढवला आहे. आता 6 वर्षांसाठीही पर्सनल लोन घेऊ शकता.


पर्सनल लोनसाठीही दोन पर्याय उपलब्ध असतात. एका प्रकारात आपल्याला प्रोसेसिंग फीस द्यावी लागते. त्याशिवाय आपल्याला इतर सर्व महत्त्वाची कागदपत्रांची पूर्तता करावी लागेत. पर्सनल लोनवर प्रोसेसिंग फीसच्या माध्यमातून 2-3 टक्के चार्ज वसूल केला जातो.  आपण कोणतंही कर्ज घेण्यासाठी अर्ज केल्यास बँक आपल्याकडून प्रक्रिया शुल्क म्हणजे प्रोसेसिंग फीस वसूल करते.


50 लाख रुपयांचं शैक्षणिक कर्जावर एसबीआय 8.25 टक्के व्याजदर वसूल करते. बँकेनं परतफेड कालावधी(Repayment Tenure) वाढवून 15 वर्षांचा केला आहे. जर आपल्याला परदेशात शिकण्यास जाण्याची इच्छा असल्यास आता एसबीआयचं एज्युकेशन लोन फायदेशीर ठरणार आहे.

Web Title: SBI cuts MCLR and fixed deposit rates across all tenors

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol Diesel Price Today: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर; जाणून घ्या महाराष्ट्रातील भाव

Madha Lok Sabha Votting Live: माढ्यातील जनता मला या निवडणुकीमध्ये निवडून देईल : धैर्यशील मोहिते पाटील

Water Crisis News: छत्रपती संभाजीनगरमध्ये दुष्काळाच्या झळा! पाण्याला मिळतोय सोन्याचा भाव; टँकर वाल्यांची चांदी

Mental Health: मानसिक आरोग्य बिघडलंय? अशी घ्या काळजी

Solapur Breaking: मतदानाला सुरुवात होताच सोलापूरमध्ये EVM मशीनमध्ये बिघाड; मतदारांचा खोळंबा, अधिकाऱ्यांची धावपळ

SCROLL FOR NEXT