बातम्या

स्पर्धेचे व्हा तुम्ही परिक्षक, सकाळ' ढोल-ताशा ऑनलाईन स्पर्धा

सकाळ न्यूज नेटवर्क


राज्यभरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी जोरात सुरु आहे. ढोल-ताशा हा या उत्सवाचा अविभाज्य भाग. केवळ तरुणाईच नव्हे तर आबाल-वृद्धांची पावलं थिरकायला लावणारी ही कला.


eSakal.com, दैनिक सकाळ व ढोल-ताशा महासंघाच्या 
माध्यमातून सकाळ ऑनलाईन ढोल-ताशा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. याचे परिक्षक तुम्ही ऑनलाईन युजरच आहात. तुमच्या लाईक्स, शेअर आणि कॉमेंटस् ठरवणार आहेत या स्पर्धेचे विजेते !

स्पर्धा पुण्यातील ढोल-ताशा पथकांसाठी मर्यादित आहे. आपल्याला आवडलेला व्हिडिओ लाईक करा सकाळच्या फेसबूक पेजवर fb.com/SakalNews आणि आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. कॉमेंटही करा. आपले आवडते पथक नंबर वन ठरण्यासाठी आपल्या लाईक्स, कॉमेंट आणि शेअरचा उपयोग होणार आहे. 

या स्पर्धेसाठी अनुक्रमे ५० हजार, २५ हजार आणि १५ हजार रुपयांची पहिल्या तीन क्रमांकांची पारितोषिके दिली जाणार आहेत. आता तुम्ही ठरवणार आहात कोण पहिल्या तीन क्रमांकाचे विजेते आहेत ते.


Web Title: Sakal Dhol Tasha Competition you will be the Examiner

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये दोन ठिकाणी दहशतवादी हल्ले; पर्यटक आणि भाजपच्या नेत्यावर गोळीबार

Relationship Tips: लग्नाआधी भावी जीवन साथीदाराला विचारा 'हे' ३ प्रश्न; नाहीतर आयुष्यात येतील दुःख

Chandu Champion Trailer: कार्तिक आर्यनच्या चित्रपटाचा 'चॅम्पियन' ट्रेलर रिलीज

ED कडून थेट अटक करण्यावर आता बंधनं, PMLA वर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

RCB vs CSK IPL 2024 : बेंगळुरूची प्लेऑफमध्ये एन्ट्री पक्की; चेन्नई आयपीएलमधून बाहेर

SCROLL FOR NEXT