बातम्या

काँग्रेस पक्षाची डोकेदुखी वाढणार

सकाळ न्यूज नेटवर्क

पुणे : काँग्रेस पक्षाने सदानंद शेट्टी यांना डावलून पक्षातील शहराध्यक्ष रमेश बागवे यांना उमेदवारी जाहीर केल्याने पुणे शहर काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष सदानंद शेट्टी यांनी नाराजी व्यक्त करत पक्षाचा राजीनामा देण्याचा निर्णय हाती घेतला आहे. यावेळी  'तिकीट नाही तर नाही,' मी लढणार  असे सदानंद शेट्टी यांनी जाहीर केल्याने काँग्रेस पक्षाची डोकेदुखी वाढणार आहे.

तीन वेळा पर्वती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणारे व एकदा निवडून येणारे, त्यानंतर पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात उडी घेऊन दोन वेळा निवडणूक लढवून मंत्री असताना 2014 ला पराभूत झालेले उमेदवार रमेश बागवे यांना पुन्हा उमेदवारी दिल्याने पक्षाने माझ्यावर अन्याय केल्याचे शेट्टी यांचे  म्हणणे आहे. मी पक्षाचे प्रामाणिक पणे काम केले आहे, उमेदवारीच्या स्पर्धेत माझं नाव असताना ही बागवे शहराध्यक्ष असल्याने त्यांना प्राधान्याने संधी देऊन मला पुन्हा डावलले गेले. 

'नाही तिकीट तर नाही' ज्या लोकांची आजवर सेवा केली ती तशीच यापुढे देखील करत राहील, माझ्या रक्तामध्येच कार्य आहे. यामधुन पक्षश्रेष्ठींची नियत कळली असून झोपडपट्टी संघटनामार्फत मी सामाजिक कार्य करत राहील. 'माझ्याबरोबर मीच' असून  कुठल्याही माझ्या प्रिय कार्यकर्त्याला पक्ष सोडण्यासाठी व पक्षाचे काम न करण्यासाठी दबाव टाकणार नाही.  माझी पत्नी सुजाता शेट्टी या सध्या कार्यक्षम नगरसेविका असून त्यांनाही मी पक्षकार्यापासून वंचित ठेवणार नाही, हे प्रचारादरम्यान दिसून येईल. असे त्यांनी सोशल मीडियावर पत्रकामार्फत प्रसिद्ध केले आहे.


Web Title: sadanand shetty from pune cantonment wants to elect vidhansabha 2019

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Riteish Deshmukh: मराठमोळ्या रितेश देशमुखची 'लय भारी...' फॅशन

Ruby Roman Grapes : ही द्राक्षे तयार करण्यासाठी लागली १४ वर्षे, एका घडाची किंमत आहे १० लाख

Raj Thackarey: उद्धव ठाकरे गेल्या १०वर्षात साडेसात वर्षे सत्तेत, मग उद्योग गुजरातला कसे गेले? राज ठाकरेंचा सवाल

Home Decor Idea : कमी खर्चात बर्ड थे पार्टीसाठी घर कसं सजवाल? जाणून घ्या सोप्या ट्रिक्स

Raj Thackeray: '5 वर्ष राणे मुख्यमंत्री असते तर...', तो किस्सा सांगत राज ठाकरेंनी केलं नारायण राणे यांचं कौतुक

SCROLL FOR NEXT