beed
beed 
बातम्या

वाढदिवसाचे औचित्य साधत ''तो'' बनला 30 बाळांत झालेल्या महिलांचा भाऊ

- सिद्धेश सावंत

कोरोनाचा महामारीनं (Coronavirus) सर्वसामान्य कुटुंबापुढे, एक ना अनेक संकट उभे ठाकले आहेत. त्यामुळे आज घडीला या कुटुंबाकडे जगण्यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. आज जगाव कसं ? असा प्रश्न अनेक कुटुंबापुढे उभा ठाकला आहे. हे असताना आपल्या होणाऱ्या मुलासाठी पाहिलेली स्वप्न, धुळीस मिळत आहेत. अनेकांना लहान मूल झाल्यानंतर त्याच्यासाठी लागणाऱ्या विविध वस्तू घेणे जिकरीचा विषय ठरत आहे. मात्र अशाच सर्वसामान्य कुटुंबातील आई वडिलांच्या चेहऱ्यावर, सामाजिक तथा धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते, सचिन जाधव या तरुणाने हास्य फुलविला आहे. आज जाधव यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त, बीड जिल्हा रुग्णालयात बाळंत झालेल्या 30 महिलांना, साडी चोळीचा आहेर देत, लहान चिमुकल्यांना पाळणा दिलाय. एवढेच नाही तर कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी सॅनिटायझर आणि मास्क देखील भेट दिली आहेत. (Sachin became the brother of 30 pregnant women)

याविषयी सचिन जाधव म्हणाले, की आज संपूर्ण राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे बीड जिल्हा लॉकडाऊन आहे. आज अनेकांना आपल्या मुलांना पाळणा खरेदी करायचा आहे. मात्र त्यांना मिळू शकत नाही. यामुळे यावेळचा वाढदिवस हा व्यर्थ पैसा खर्च न करता, पार्टी न करता चांगला दिवस म्हणून साजरा करण्याचं ठरवलं. याचं कारण म्हणजे नेते धनंजय मुंडे यांनी सेवाधर्म सुरू करत 75 कुटुंबांना लग्नासाठी आर्थिक मदत केली आहे. यामुळं नेत्यानी सुरू केलेल्या सेवाधर्माचा अवलंब करत, सर्व मित्र परिवारांनी मिळून, आज जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या सर्वसामान्य बाळंत महिलांना, साडीचोळी, पाळणा, सॅनिटायझर व मास्क भेट दिलं आहे. 

हे देखील पाहा

बीड जिल्ह्यात कोरोनाचा समूह संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढलेलं दिसतंय. अशा परिस्थितीत वेगवेगळ्या सामाजिक संघटना या कोविड सेंटरकडे लक्ष देत आहेत. मात्र कोविड व्यतिरिक्त जे रुग्ण आहेत, त्यांना देखील आज या संकटात खऱ्या आधाराची गरज आहे. आज सर्वसामान्य कष्टकरी, गरीब, ऊसतोड कामगार महिला जिल्हा रुग्णालयात डिलिव्हरीसाठी येत आहेत. त्यांना आज आधार देणे गरजेचे आहे. हाचं आधार तरुण सामाजिक कार्यकर्ता असणाऱ्या सचिन जाधव यांनी, 30 पाळणे साडीचोळी भेट देऊन दिला आहे. त्यामुळे इतर सामाजिक कार्यकर्ते तथा पक्षाच्या कार्यकर्त्यांनी देखील, पुढं येऊन वाढदिवसावर व्यर्थ पैसा खर्च न करता, सर्वसामान्य कुटुंबांना मदत करण्यासाठी पुढे आले पाहिजे. ज्याने करून त्यांना काहीसा आधार मिळेल. 

दरम्यान, कोरोनाच्या महामारीनं सर्वसामान्यांचं जगणं मुश्किल केलं आहे. त्यामुळं आज अनेकांची स्वप्न विस्कटली आहेत. याचं विस्कटलेल्या स्वप्नांना आकार देण्याचा प्रयत्न सचिन जाधव यांनी केला असून वाढदिवसाचे औचित्य साधत 30 बाळांत झालेल्या महिलासोबत, एकप्रकारे भावाचं नातं बजावलंय. त्यामुळं हा अनोखा वाढदिवस करणाऱ्या 'सामाजिक कार्यकर्ता सचिन जाधव यांनी' इतरांपुढं एक आदर्श निर्माण केलाय.

Edited By : Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: भाजप-मनसेच्या युतीत शिवसेनेचा खोडा; बाळा नांदगावकरांचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics 2024 : मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढली?; निवडणूक आयोगाच्या सुधारित टक्केवारीवरून वाद

Maharashtra Politics 2024 : आमदार म्हणताहेत, ''खासदार' झाल्यासारखं वाटतंय'; महाराष्ट्रात 13 आमदार लोकसभेच्या रिंगणात

Health Tips: उन्हाळ्यात माठातील पाणी का प्यावे?

SRH vs RR : राजस्थानच्या तोंडचा घास हैदराबादने हिसकावला; रोमहर्षक सामन्यात 1 रन्सने हैदराबादचा राजस्थानवर विजय

SCROLL FOR NEXT