बातम्या

कोरोनाच्या नावाखाली रुग्णांची खासगी हॉस्पिटल्सकडून लूट

साम टीव्ही

दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढतोय. दुसरीकडे  किरकोळ आजारी असलेल्या रूग्णांची खासगी हॉस्पिटल्स आणि खासगी लॅबकडून अक्षरश: लूट सुरू आहे. ठाण्यात असे प्रकार सर्रास वाढले आहेत.

देशात कोरोनाचा कहर वाढत चाललाय. ठाण्यासारख्या शहरात कोरोना रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढतीय. मात्र इथं कोरोनाची भीती दाखवून लोकांची अक्षरश: लूट सुरूयं. ठाण्यातील एका खासगी प्रयोगशाळेत 15  मे रोजी 44 कोरोना संशयितांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी 12 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याचा निष्कर्ष या प्रयोगशाळेनं काढला. यापैकी काही रुग्णांना कोणतीही लक्षण नव्हती. प्रशासनानं या रुग्णांची महापालिका प्रयोगशाळेत फेरतपासणी केली. यापैकी पाच जणांचा अहवाल निगेटीव्ह आल्यामुळे आयुक्त विजय सिंघल यांनी संबंधित प्रयोगशाळेला कारणे दाखवा नोटीस बजावलीय..

खासगी प्रयोगशाळांच्या चाचणी अहवालातून काही सवाल उपस्थित होतायेत. 
साम टीव्हीचे सवाल 

  • लागण नसताना कोरोना भासवून महागडय़ा
  • रूग्णालयांमध्ये पाठवण्याचा घाट घातला जातोय का?
  • यात रूग्णालयं आणि प्रयोगशाळांचं साटंलोटं आहे का? 
  • खासगी प्रयोगशाळा ‘आयसीएमआर’नं आखून दिलेल्या नियमांचंही पालन करत नाहीत का?

लॉकडाऊनमुळे सध्या अतिशय बिकट स्थिती आहे. उत्पन्नाचे मार्ग नसल्यामुळे अनेकांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिलाय. अशात लोकांना धीर देण्याचं सोडून खासगी रूग्णालयं आणि प्रयोगशाळा लुटमार करत असतील तर यापेक्षा मोठं दुर्दैवं ते काय? 
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: महायुतीचं टेन्शन वाढलं; शांतिगिरी महाराजांच्या भूमिकेने नाशिकचं राजकारण तापलं

Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगर लोकसभेत महिला, दिव्यांग आणि युवा अधिकारी कर्मचारी सांभाळणार ३७ मतदान केंद्र

Kalyan Lok Sabha: कल्याण लोकसभा मतदारसंघात ट्विस्ट, ठाकरे गटाच्या आणखी एका उमेदवाराने भरला अर्ज; दरेकरांचं काय?

Today's Marathi News Live : प्रेमाच्या जाळ्यात अडकवून फसवणूक, खंडणी मागणाऱ्या महिलेला अटक

Nashik-Mumbai Highway : नाशिक मुंबई महामार्गावर दुचाकीला धडक दिल्यानंतर बलगरने घेतला पेट; केबीनमध्ये अडकून चालकाचा होरपळून मृत्यू

SCROLL FOR NEXT