बातम्या

वाचा |आजचे सोन्या-चांदीचे दर

साम टीव्ही न्यूज

जळगाव : लॉकडाऊननंतर सुवर्णबाजार उघडताच चांदीला चकाकी आली व ती थेट ५० हजारांवर पोहोचली. सोन्याचेही दर अशाच प्रकारे वाढून ते ४७ हजार ३०० रुपयांवर पोहोचले होते. त्यानंतर दुसºया दिवशी ६ जून रोजी ५० हजारांवर पोहोचलेल्या चांदीच्या दरात दीड हजारांनी घसरण झाली व चांदी ४८ हजार ५०० रुपये प्रतिकिलोवर आली होती. ५ जून रोजी ४७ हजार ३०० रुपयांवर असलेल्या सोन्याच्या दरात ८०० रुपयांनी घसरण होऊन ते ४६ हजार ५०० रुपयांवर आले होते.
सोमवारी चांदीच्या दरात ५०० रुपये प्रतिकिलोने वाढ होऊन ती ४९ हजार रु पयांवर पोहोचली. मंगळवारी चांदी स्थिर राहिली. अशाच प्रकारे सोन्याच्या दरातही सोमवारी २०० व मंगळवारी आणखी १०० रु पयांनी वाढ होऊन ते ४६ हजार ८०० रुपयांवर पोहोचले. गेल्या अडीच महिन्यांपासून बंद असलेला सुवर्णबाजार सुरू झाल्यानंतर ग्राहकांकडून खरेदीला प्रतिसाद मिळत असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांनी सांगितले. लॉकडाऊनदरम्यान गुढीपाडवा, अक्षय तृतीया, गुरु पुष्यामृत अशा मुहूर्तावरील खरेदी होऊ शकली नव्हती. आता बाजार सुरू झाल्याने उत्साह दिसून येत 

दोन दिवसात सोन्यात ३०० रुपये प्रतितोळा वाढ झालीलॉकडाऊन - ४ नंतर अनलॉक-१ मधील दुसऱ्या टप्प्यात सुवर्णबाजार सुरू झाल्यानंतर दुसºयाच दिवशी दीड हजार रुपये प्रतिकिलोने घसरण झालेल्या चांदीच्या दरात ५०० रुपये प्रतिकिलोने वाढ झाली आहे. त्यामुळे चांदी ४९ हजार रुपये प्रतिकिलोवर पोहोचली आहे. तसेच ८०० रु पये प्रतितोळ्याने घसरण झालेल्या सोन्याच्या दरातही ३०० रु पयांनी वाढ होऊन ते ४६ हजार ८०० रुपयांवर पोहोचले. लॉकडाऊनमुळे बंद असलेला सुवर्णबाजार ५ जून रोजी सुरू झाला. लॉकडाऊन ते अनलॉक या अडीच महिन्यांत चांदीचे दर ११ हजार रु पये प्रतिकिलोने वाढून ते ५० हजार रुपयांवर पोहराचले होते. विदेशातून आवक नसल्याने व सुवर्णबाजारही बंद असल्याने बाजारपेठेत मोड येत नव्हती. त्यामुळे सोने-चांदीची चणचण निर्माण होऊन दर वाढले होते.

WebTittle :: Read | Today's gold-silver prices

.
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivani Narayanan: बॉलीवूडच्या नटीही भरतील पाणी, फक्त सुंदर नाही भारी दिसते साऊथची 'शिवानी'

Grapes Juice : द्राक्षाचा ज्युस प्या, मिळतील आश्चर्यकारक फायदे

Badam Oil : स्कीन केअरसाठी बदाम तेलाचे ६ आश्चर्यकारक फायदे

Mumbai News: मुंबईत चिकन शोर्मा खाऊन 12 जणांना विषबाधा, रुग्णालयात उपचार सुरू

Maharashtra Politics: मतांसाठी अजित पवारांची मतदारांनाच धमकी? संजय राऊतांचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT