बातम्या

वाचा | आजचा सोन्या-चांदीचा भाव

साम टीव्ही न्यूज

मुंबई : सोन्यातील गुंतवणूक सुरक्षित असल्याच्या भावनेने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे. त्यातच २०१९ आणि २०२० या वर्षात मे महिन्यापर्यंत सोन्याने चांगली कामगिरी केल्याने गुंतवणूकदारांचा उत्साह वाढला आहे. सोन्याला २०११ नंतर प्रथमच अच्छे दिन प्राप्त झाल्याचे दिसून आले आहे. गोल्ड ईटीएफला मिळणाऱ्या पसंतीच्या पार्श्वभूमीवर एप्रिल२०२० अखेरीस या फंडांतील एकूण निधी ९,१९८ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. मार्च २०२०च्या अखेरीस या फंडांमध्ये एकूण ७,९४९ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. करोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सध्याची वाढती अस्थिरता पाहता आगामी काळात सोन्याच्या भावात आणखी वाढ होण्याची शक्यता श्रीवास्तव यांनी व्यक्त केली. मंदी आणि अस्थिरता असूनही एप्रिल महिन्यात म्युच्युअल फंडांमध्ये ४६,००० कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. मार्च २०२०मध्ये सर्व प्रकारच्या म्युच्युअल फंडांमधून २.१३ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक माघारी घेण्यात आली होती.कमॉडीटी बाजारात झालेल्या नफेखोरीने सोन्याचं दरातील घसरण शनिवारी कायम राहिली. आज सोने १०० रुपयांनी स्वस्त होऊन ४७२५० रुपये झाले. चांदीच्या दरात ५० रुपयांची घट झाली. चांदीचा भाव किलोला ४८५०० रुपये झाला आहे.सध्या जागतिक बाजारात सोन्याचा भाव प्रती औंस १७२७.२४ डॉलर झाला आहे. त्यात ०.४ टक्क्याची घसरण झाली. चांदीचा भाव १७.६४ डॉलर असून त्यात ०.४ टक्क्याची घसरण नोंदवण्यात आली.


www.goodreturns.in च्या आकडेवारीनुसार मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४५४१० रुपये आहे. दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६०६० रुपये झाला आहे. तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४७२६० रुपये झाला आहे. कोलकात्यात २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६२६० रुपये झाला असून २४ कॅरेटसाठी ४७७६० रुपये आहे. चेन्नईतील सोन्याचा दर २२ कॅरेटसाठी ४५२८० रुपये असून २४ कॅरेटसाठी प्रती १० ग्रॅम सोने दर ४९५१० रुपये झाला आहे.गेल्या आठवड्यात सोने जवळपास २००० रुपयांनी महागले होते.. यामुळे शुक्रवारी त्यात नफेखोरी दिसून आली. नफेखोरांनी नफा वसुली केल्याने सोन्याचा भाव घसरल्याचे कमॉडिटी विश्लेषकांनी सांगितले. काही विश्लेषकांच्या मते जागतिक बाजारात सोन्याच्या किमती १५ यते २० डॉलरने कमी होतील. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये  सोन्याचा भाव शुक्रवारी टक्क्यांनी घसरला. सोन्याचा दर १० ग्रॅमला ३४२ रुपयांनी कमी होऊन ४७०७२ रुपये झाला होता. चांदीच्या दरात ७५२ रुपयांची घट झाली आणि भाव ४७८८७ रुपये झाला.

WebTittle : Read | Today's gold-silver price

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray: मोदींचं PM पदासाठी नाव सुचवलं हे माझं पाप, उद्धव ठाकरे यांनी भरसभेत व्यक्त केली खंत

Mumbai Local : तीन प्रवाशांच्या मृत्यूनंतर मध्य रेल्वेला आली जाग; लोकलच्या गर्दी नियंत्रणासाठी घेतला मोठा निर्णय

Today's Marathi News Live : १७ लाख कुटुंबांनी भारतीय नागरिकत्व सोडलं; प्रकाश आंबेडकरांचा भाजपवर हल्लाबोल

IPL 2024 LSG vs KKR: सुनिल नारायणच्या फटकेबाजीने LSG च्या गोलंदाजांना दाखवलं 'आस्मान'; लखनऊसमोर २३६ धावांचे आव्हान

Sharad Pawar News: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द; प्रकृतीमुळे घेतला निर्णय

SCROLL FOR NEXT