rajesh tope
rajesh tope 
बातम्या

तिसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी तयारी सुरू- आरोग्यमंत्री राजेश टोपे

MRUNALINI NANIWADEKAR

राज्यातील ज्या जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे (Coronavirus) प्रमाण अधिक आहे त्या ठिकाणी सध्या आहे ते निर्बध कायम ठेवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर,  गरज पडल्यास आणखी निर्बध कडक करण्यात येणार आहेत. ज्या ठिकाणी कोरोना संसर्गाचं प्रमाण कमी आहे तिथे निर्बध शिथिल करण्यात येतील तशा प्रकारचे अधिकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी जालन्यामध्ये बोलत असताना दिली आहे. जालना जिल्ह्यासाठी राजेश टोपे यांच्या हस्ते प्राप्त झालेल्या रुग्णवाहिकांचं ग्रामीण रुग्णालयांना वाटप करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते.(Preparations underway to stem third wave: Health Minister Rajesh Tope)

कोरोनाचया तिसऱ्या लाटेचा (Corona Third Wave) परिणाम लहान मुलांवर अधिक परिणाम असल्याची माहीती टाोपे यांनी दिली आहे. कोरोनाच्या  तिसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी ठाकरे सरकार तयारीला लागले आहे. या अनुषंगाने एक टास्क फोर्स तयार करण्यात आला असून प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना पेडीयोट्रिक आयसीयू तयार करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

हे देखील पाहा

लहान मुलांसाठी संसाधनांची जमवाजमव करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. सध्या राज्यात रेमडेसिवीर मुबलक प्रमाणात असून राज्यात रेमडेसिवीरची कोणतीही कमतरता नसल्याचे राजेश टोपे म्हणाले.

केंद्र आणि राज्य सरकारला एकाच दरात कोरोना लसींचा पुरवठा व्हावा यासाठी न्यायालयात याचिका दाखल झाली असून एकाच दरात सर्व राज्यांसह केंद्राला  कोरोनाची लस पुरवठा होणं अपेक्षित असल्याचं सांगत कंपन्यांकडून किती लस पुरवठा राज्याला होईल याची माहिती मिळणं आवश्यक असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यावेळी म्हणाले. सध्या विदेशातून लस मिळवणं शक्य नाही. त्यामुळे सध्या राज्याची मदार कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसींवर असल्याचं टोपे यांनी स्पष्ट केलं.

Edited By : Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Khalistani Terrorist: हरदीपसिंह निज्जर हत्या प्रकरणात 3 संशयितांना अटक; कॅनडा पोलिसांची कारवाई, भारतावर गंभीर आरोप

Horoscope Today: आजचे राशिभविष्य, मेषसह ४ राशींसाठी ‘शनिवार’ भाग्याचा; फक्त 'या' गोष्टीची घ्या काळजी

Cibil Score: कमी झालेला सिबिल स्कोअर ७०० पार कसा कराल? 'या' टिप्स सुधारतील तुमचा स्कोअर

Ankita Lokhande: हृदयस्पर्शी कॅप्शनसह अंकिता लोखंडेने पतीसोबतचा रुग्णालयातील फोटो केला शेअर

Maharashatra Elction: कोकणात ठाकरे विरुद्ध ठाकरे लढाई; उद्धव आणि राज ठाकरेंच्या सभांचा झंजावात

SCROLL FOR NEXT