बातम्या

पाककडून कराची हद्दीतील तीन हवाई मार्ग बंद

सकाळ न्यूज नेटवर्क

पाकिस्तानने कराची हवाई हद्दीतील मार्ग २८ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट तीन दिवस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. नागर विमानन प्राधिकरण बुधवारी यासंदर्भातील घोषणा केली. यापूर्वी पाकिस्तान सरकारकडून भारतासाठी हवाई हद्द बंद करण्याचा विचार सुरु असल्याचे वृत्त समोर आले होते. 

भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न करेल त्यांना आयुष्यभराची अद्दल घडवू' यापूर्वी भारताकडून बालाकोटमध्ये करण्यात आलेल्या सर्जिकल स्टाईकनंतर पाकने विमान हद्द बंद करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी नवी दिल्ली, बँकाक आणि क्वालालंपूर व्यतिरिक्त सर्व उड्डाणावर याचा परिणाम झाला. १६ जूलै रोजी पाककडून विमान हद्दीचे निर्बंध उठवण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा पाककडून हवाई बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. 


या निर्णयामुळे पाकिस्तानमधील कराची हद्दीतील तीन हवाई मार्गावर परिणाम होणार आहे. प्राधिकरणाच्या प्रसिद्धी पत्रानुसार १ सप्टेंबरपासून सेवा पूर्ववत सुरु होईल.  पाकचे मंत्री फवाद चौधरी यांनी मंगळवारी एका ट्विटच्या माध्यमातून पंतप्रधान इम्रान खान भारतासाठी हवाई हद्द बंद करण्याबाबत विचार करत आहेत, असे सांगितले होते. पाकिस्तान मंत्रिमंडळाने भारतासाठी हवाई हद्द बंद करण्याबाबहत चर्चा झाली होती. भारत-अफगाणिस्तान व्यापार मार्गात अडथळा निर्माण करण्यासंदर्भात पाकने नवा डाव रचला होता. 


Web Title: Pakistan closed three aviation routes over Karachi

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: २० वर्षांनी 'राज'योग! ठाकरे-नारायण राणे २ दशकांनंतर एकाच व्यासपीठावर

Nashik Lok Sabha : नाशिकमध्ये पुन्हा ट्विस्ट, शांतिगिरी महाराजांसह ६ जणांचे उमेदवारी अर्ज अवैध, पण...

Today's Marathi News Live : कुणाला मालक होऊ देऊ नका मी तुमचा सेवक आहे: संजय पाटील

Maharashtra Politics 2024 : डब्बे नसलेल्या इंजिनमध्ये फक्त ड्रायव्हर बसतो; देवेंद्र फडणवीस यांची इंडिया आघाडीवर बोचरी टीका

Rashi Parivartan Effect: गुरुचे बळ वाढलं; २०२५ पर्यंत ‘या’ राशींना मालामाल होण्याची संधी

SCROLL FOR NEXT