Oxygen audit of 12 Covid Hospital completed
Oxygen audit of 12 Covid Hospital completed 
बातम्या

12 कोविड रुग्णालयाचे ऑक्सिजन ऑडिट पूर्ण 

भक्ती आंबेरकर

हिंगोली -  देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने  Corona second wave हाहाकार माजवला आहे. त्यामुळे अनेक राज्यात ऑक्सीजनचा Oxygen तुटवडा निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी ऑक्सीजनच्या गळतीमुळे Oxygen leakage निष्पापांचे बळी गेले आहेत. (Oxygen audit of 12 Covid Hospital completed)

हे देखिल पहा - 

अशा घटना नाशिक , मुंबई अशा मोठ्या  शहरात घडल्या आहेत. अशा दुर्दैवी घटना पुन्हा घडू नये यासाठी महाराष्ट्र  सरकारने ऑक्सीजन ऑडिट करण्याच्या सूचना जाहीर केल्या आहेत. हिंगोली जिल्ह्यात प्रमुख कोविड रुग्णालयासह १२ रुग्णालयाचे ऑक्सिजन ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

हिंगोलीमध्ये देखिल ऑक्सीजनच्या गळतीच्या अशा दुर्दैवी  घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी महाराष्ट्र शासनाने सर्व रुग्णालयातील ऑक्सिजन ऑडिट Oxygen​ Audit​ करण्याच्या सूचना दिल्या आहेत. हिंगोलीत जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या सुचनेनुसार  शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या पथकामार्फत जिल्ह्यातील प्रमुख कोविड रुग्णालयासह १२ रुग्णालयाचे ऑक्सिजन ऑडिट केले असून संबंधित अहवाल वरिष्ठ कार्यालयाला पाठविला आहे. 

या अहवालानंतर आता या हिंगोलतील रुग्णालयात अनेक दुरुस्त्या करण्यात येत आहे. तसेच सर्व त्रुट्या दूर करण्यात येणार आहे असे  शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या पथकाच्या निरीक्षकांनी माहिती दिली आहे.  

Edited By - Puja Bonkile 
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit Pawar News | अजित पवारच नाटकं करतात, रोहित पवारांचा घणाघात

T-20 World Cup 2024: विराट,रोहितसह हे स्टार खेळाडू खेळणार आपला शेवटचा टी -२० वर्ल्डकप

CM Shinde: काँग्रेसकडून शहिदांचा अपमान; जनता वडेट्टीवारांच्या वक्तव्याचा बदला घेईल: एकनाथ शिंदे

Fungal Infection: वेळीच व्हा सावधान 'या' कारणामुळे होऊ शकतो फंगल इन्फेक्शनचा भयंकर त्रास

Benifits of Chia Seeds: चिया सिड्सचे सेवन महिलांसाठी ठरते अत्यंत फायदेशीर

SCROLL FOR NEXT