बातम्या

अयोध्या प्रकरणाचा आज निकाल

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे ४0 दिवस सुनावणी झाल्यानंतर १५ ऑक्टोबर रोजी न्यायालयाने निकाल राखून ठेवला खास या निकालासाठी न्यायालयाने उद्याचा दिवस निश्चित केला आहे. न्या. रंजन गोगोई यांनी आज उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव व पोलीस महासंचालकांशी अयोध्येतील कायदा व सुव्यवस्था स्थितीवर सविस्तर चर्चा केली.

 अयोध्येतील मशीद-मंदिर जमिनीच्या मालकीच्या वादावरील निकाल सर्वोच्च न्यायालय  आज देणार आहे. राजकीय व सामाजिकदृष्ट्या संवेदनशील विषयावरील निकालाचे वाचन उद्या सकाळी १0.३0 वाजता सुरू होईल. 
दोन्ही समाजांच्या प्रमुख नेत्यांच्या तसेच धार्मिक नेत्यांच्या बैठकांमध्ये न्यायालयाच्या निकालानंतर कोणी गुलाल उधळू नये, मिठाई वाटू नये, फटाके उडवू नये वा निषेधही करू नये, असे स्पष्टपणे सांगितले आहे. केवळ त्या सूचनांवर अवलंबून न राहता, सर्व शहरांच्या नाक्यानाक्यांवर रेल्वे स्थानके, बस स्थानके, विमानतळे येथे वा कोणत्याही गर्दीच्या ठिकाणी आणि धार्मिक स्थळी टोकाच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जाऊ नयेत, यासाठी पोलीस बंदोबस्त शुक्रवारी रात्रीपासूनच वाढवण्यात आला आहे.


या निकालामुळे सर्व राज्यांमध्ये सतर्क राहण्याच्या सूचना आहेत. पोलिसांचा तसेच सशस्त्र दलांचा कडक बंदोबस्त वाढवला आहे. सोशल मीडियावरून विविध अफवा वा प्रक्षोभक संदेश एकमेकांना पाठवले जाण्याची शक्यता लक्षात घेऊ न सोशल मीडियावर पोलीस लक्ष ठेवून आहेत. दोन्ही समाजांच्या बैठका घेऊ न निकाल शांततेने मान्य करण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या. मुंबई-दिल्लीतही पोलिसांनी न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त करू नका, असे सांगितले आहे.

Web Title: The outcome of the Ayodhya case today, should not be condemned, neither should be protested
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: भाजप-मनसेच्या युतीत शिवसेनेचा खोडा; बाळा नांदगावकरांचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics 2024 : मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढली?; निवडणूक आयोगाच्या सुधारित टक्केवारीवरून वाद

Maharashtra Politics 2024 : आमदार म्हणताहेत, ''खासदार' झाल्यासारखं वाटतंय'; महाराष्ट्रात 13 आमदार लोकसभेच्या रिंगणात

Health Tips: उन्हाळ्यात माठातील पाणी का प्यावे?

SRH vs RR : राजस्थानच्या तोंडचा घास हैदराबादने हिसकावला; रोमहर्षक सामन्यात 1 रन्सने हैदराबादचा राजस्थानवर विजय

SCROLL FOR NEXT