बातम्या

आता कोरोनावर आयुर्वेदिक उपचार 

साम टीव्ही न्यूज

जून महिन्यात देशात करोना रुग्णांच्या संख्येत सर्वाधिक वाढ होण्याची दाट शक्यता असल्याचा इशारा अ. भा. आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) संचालक रणदीप गुलेरिया यांनी दिला. करोनाचा मे महिन्यात वाढणारा संसर्ग जून महिन्यात शिगेला पोहोचू शकतो, असे भाकित त्यांनी वर्तविले आहे. लॉकडाउनमुळे करोना प्रसाराला आळा बसला अन्यथा करोना रुग्णांचा आकडा खूप वाढला असता. 

तरीही रुग्णसंख्या रोज वाढत आहे. करोनाच्या रुग्णांची संख्या जूनमध्ये शिगेला पोहोचेल. हा आजार एकदाच संपणार नाही. आपल्याला त्यासोबत जगावे लागेल. हळूहळू रुग्णसंख्या कमी होईल, असे गुलेरिया यांनी म्हटले आहे. 

देशभरात आजवरच्या करोनाग्रस्तांची संख्या ५२ हजार ९५२ झाली आहे. त्यापैकी १५ हजार २६६ करोना रुग्ण बरे झाले असून २४ तासांत १०८४ रुग्ण बरे झाले आहेत. सक्रिय रुग्णांची संख्या ३५ हजार ९०२ इतकी आहे. गेल्या २४ तासांत करोनाच्या ३५६१ नव्या रुग्णांची भर पडली आहे, तर गेल्या २४ तासांत ८९ जणांचा मृत्यू होऊन एकूण मृतांचा आकडा १७८३ वर पोहोचला आहे. करोना रुग्ण बरे होण्याची टक्केवारी २८.८३ इतकी आहे. सरकारी आणि खासगी प्रयोगशाळांमध्ये आतापर्यंत १३ लाख ५७ हजार ४१३ रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. 

आता दररोज ९५ हजार रुग्णांच्या चाचण्या करण्यात येत आहेत. अन्य देशांच्या तुलनेत भारतात करोना रुग्णांचा मृत्यूदर कमी आहे. भारतात ३.३ टक्के रुग्ण मरण पावत असून रुग्ण बरे होण्याची टक्केवारी २८.८३ इतकी आहे. सध्याच्या सक्रिय रुग्णांपैकी ४.८ टक्के रुग्ण आयसीयूमध्ये, १.१ टक्के रुग्ण व्हेंटिलेटरवर तर ३.३ टक्के रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा देण्यात आला असल्याची माहिती डॉ. हर्षवर्धन यांनी दिली.

करोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी अश्वगंधा, यष्टीमधु, गुडुची, पिपळी, आयुष-६४ यासारख्या आयुर्वेदिक औषधांची उपयुक्तता तपासून पाहण्यात येत आहेत. करोना संसर्गाला रोखण्यासाठी किंवा प्रभावी उपचारासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि आयुष मंत्रालयाने आयसीएमआर आणि सीएसआयआर यांच्या तांत्रिक सहकार्याने वैद्यकीय प्रयोगाला गुरुवारपासून सुरुवात केली आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन आणि आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी ही माहिती दिली. आरोग्य कर्मचारी, करोना रुग्णांच्या संपर्कात आलेले किंवा करोना संसर्गाचा सर्वाधिक धोका असलेल्या लोकांवर या औषधांचे प्रयोग सुरू झाले आहेत. यानिमित्ताने आयुर्वेदिक औषधांचे श्रेष्ठत्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. करोनाशी लढण्यासाठी अश्वगंधाचा प्रयोग करण्यावर भर देण्यात येत आहे.
 
गेल्या २४ तासांत १३ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये करोनाच्या एकाही नव्या रुग्णाची नोंद झाली नसल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिली. देशातील १८० जिल्ह्यांमध्ये सात दिवसांपासून करोनाचा एकही नवा रुग्ण आढळलेला नाही. आणखी १८० जिल्ह्यांमध्ये ७ ते १३ दिवसांमध्ये करोनाचे नवे रुग्ण आढळलेले नाहीत.

 १६४ जिल्ह्यांमध्ये १४ ते २० दिवसांत नव्या रुग्णाची नोंद झालेली नाही, तर १३६ जिल्ह्यांमध्ये २१ ते २८ दिवसात नवा रुग्ण सापडलेला नाही. येत्या काही दिवसांत स्थलांतरित मजूर आणि कामगार आपापल्या गावी परतणार आहेत. त्यामुळे राज्यांनी या श्रमिकांच्या चाचण्या, त्यांचे विलगीकरण आणि पॉजिटिव्ह रुग्णांवर उपचार करण्यासाठी अतिशय प्रभावी रणनीती आखून प्रशासकीय यंत्रणा कामाला लावावी, असे आवाहन डॉ. हर्षवर्धन यांनी केले आहे.

कोविड १९च्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी गंगाजलाचा विचार करावा आणि त्यासाठी वैद्यकीय अभ्यास व्हावा, या जलशक्ती मंत्रालयाच्या प्रस्तावाचा विचार करणार नसल्याचे आयसीएमआरने म्हटले आहे. अशा प्रयोगांसाठी आणखी वैज्ञानिक माहितीची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे.

WebTittle :: Now Ayurvedic treatment on Corona



 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray: मोदींचं PM पदासाठी नाव सुचवलं हे माझं पाप, उद्धव ठाकरे यांनी भरसभेत व्यक्त केली खंत

Mumbai Local : तीन प्रवाशांच्या मृत्यूनंतर मध्य रेल्वेला आली जाग; लोकलच्या गर्दी नियंत्रणासाठी घेतला मोठा निर्णय

Today's Marathi News Live : १७ लाख कुटुंबांनी भारतीय नागरिकत्व सोडलं; प्रकाश आंबेडकरांचा भाजपवर हल्लाबोल

IPL 2024 LSG vs KKR: सुनिल नारायणच्या फटकेबाजीने LSG च्या गोलंदाजांना दाखवलं 'आस्मान'; लखनऊसमोर २३६ धावांचे आव्हान

Sharad Pawar News: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द; प्रकृतीमुळे घेतला निर्णय

SCROLL FOR NEXT