बातम्या

मेट्रोच्या आमंत्रणपत्रिकेत महापौरांचे नावच नाही

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई : मेट्रो 10, 11, 12 आणि मेट्रो भवनचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भूमीपूजन होत आहे. परंतु, त्यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आमंत्रण पत्रिककेत मुंबईचे प्रथम नागरिक असलेले महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे  नाव नाही. त्यामुळे युतीत वरकरणी अलबेल असल्याचे दाखविण्यात येत असले तरी आगामी विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर भूमीपूजनाचे श्रेय घेण्यासाठी भाजपने केल्याची कुजबूज ऐकू येत आहे. 

निमंत्रण पत्रिकेत फक्त उद्धव ठाकरे वगळता एकही शिवसेना आमदार खासदाराचे नाव नाही. शिवसेनेचे खासदार राहूल शेवाळे यांनी या संदर्भात नाराजी व्यक्त केली. त्यानंतर सदर प्रकार नजर चुकीने झाला असून ही चूक मान्य करत असल्याचे एमएमआरडीएचे आयुक्त आर. ए. राजीव यांनी सांगितले. 

सरकारकडून अद्याप कोणत्याही प्रकारची भूमिका स्पष्ट केली नाही. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. दरम्यान आयुक्तांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर शेवाळे कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत.


Web Title: no name of mumbai mayor in metro inauguration invitation card

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mayank Yadav: मयांक यादवचं नशीब फळफळणार!BCCI मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीत

संभाजीराजे छत्रपती अभ्यासू, त्यांच्याकडून असं अपेक्षित नव्हतं : चंद्रकांत पाटील, Video

Prasadacha Sheera : मऊ लुसलुशीत आणि गोड प्रसादाचा शिरा रेसिपी

PM Narendra Modi Rally: शहजादेला पंतप्रधान बनवण्यासाठी पाकिस्तान उतावळा, पीएम मोदींचा राहुल गांधींवर पुन्हा निशाणा

Dubai Rain Alert : दुबईवर जलप्रलयाचं संकट! मुसळधार पावसाच्या शक्यतेने फ्लाईट्स रद्द, शाळा बंद

SCROLL FOR NEXT