बातम्या

पावसाची खबरबात |  मुंबई, ठाण्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी

साम टीव्ही न्यूज

मुंबई :शुक्रवारी पुन्हा एकदा मुंबई, ठाणे, नवी मुंबई या भागांमध्ये पूर्व मोसमी पावसाने हजेरी लावली. ठाणे जिल्ह्यात जून महिन्यातील पहिल्या १२ दिवसांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत पाचपट जास्त पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे मुंबईसह परिसराला तीव्र उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. राज्यातील बहुतांश भाग मान्सूनने याअगोदरच व्यापला आहे. सोलापूरपर्यंत मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याचा काही भाग आणि कोकणमध्ये मान्सून दाखल झाला आहे.
 नैऋत्य मोसमी वारे आता संपूर्ण महाराष्ट्र हळूहळू व्यापताना दिसत आहे. पुढच्या ४८ तासात मान्सून पूर्ण महाराष्ट्राला व्यापणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान संस्था म्हणजेच आयएमडीने व्यक्त केला आहे. आयएमडीने ठाण्यासाठी शनिवारी यलो अलर्ट जारी केला आहे. तर मुंबई, पालघर आणि ठाण्यासाठी रविवारी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या शहरांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आयएमडीने व्यक्त केला आहे.


१ जूनपासून ११ जूनपर्यंत अकोल्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस नोंदला गेला आहे. तर यवतमाळ आणि गडचिरोलीमध्ये सरासरीइतका पाऊस पडला आहे. इतर जिल्ह्यांमध्ये मात्र पाऊस सरासरीहून अतिरिक्त किंवा तीव्र अतिरिक्त नोंदला गेला आहे.पुढील चार आठवड्यांच्या पूर्वानुमानानुसार १२ ते १८ जूनच्या आठवड्यात राज्याच्या अंतर्भागातही चांगला पाऊस असेल. तर २ जुलैपर्यंत किनारपट्टीवर याचे प्रमाण सरासरीहून किंचित अधिक असण्याची शक्यता आहे.रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात ही परिस्थिती रविवारपर्यंत स्थानिकांना अनुभवायला लागू शकते. हिंगोली, परभणी, जालना, औरंगाबाद, सातारा, कोल्हापूर येथे तुरळक ठिकाणी गडगडाटासह, जोरदार वारे आणि मुसळधार ते तीव्र मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. याचा प्रवास वायव्येकडे होत असून, यामुळे पश्चिम किनारपट्टीवर येत्या ४८ तासांमध्ये मध्य महाराष्ट्रात, तसेच मराठवाड्यात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार सरींचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. त्या दृष्टीने हवामान विभागाने इशारा जारी केला आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, धुळे, नंदुरबार, पुणे, नाशिक, अहमदनगर, जळगाव, सांगली, सोलापूर, बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद येथे शुक्रवारी तुरळक ठिकाणी पावसासह जोरदार वारे आणि गडगडाटाची शक्यता आहे.

News of rain | Orange alert issued for Mumbai, Thane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये दोन ठिकाणी दहशतवादी हल्ले; पर्यटक आणि भाजपच्या नेत्यावर गोळीबार

Relationship Tips: लग्नाआधी भावी जीवन साथीदाराला विचारा 'हे' ३ प्रश्न; नाहीतर आयुष्यात येतील दुःख

Chandu Champion Trailer: कार्तिक आर्यनच्या चित्रपटाचा 'चॅम्पियन' ट्रेलर रिलीज

ED कडून थेट अटक करण्यावर आता बंधनं, PMLA वर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

RCB vs CSK IPL 2024 : बेंगळुरूची प्लेऑफमध्ये एन्ट्री पक्की; चेन्नई आयपीएलमधून बाहेर

SCROLL FOR NEXT