MLA makrand
MLA makrand 
बातम्या

साताऱ्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेस आमने-सामने

संजय महाजन

सातारा जिल्ह्यातील (Satara District) कोरोनाचा (Coronavirus) कहर थांबत नसल्याने अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना साताऱ्यात येऊन सर्व यंत्रणांचे कान उपटावे लागले या वेळी झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी सर्व आमदारांवर सुद्धा प्रश्नांच्या फैरी झाडल्या. साताऱ्यात एक तरी निलेश लंके होईल का ? या प्रश्नावर तर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांची आणि पत्रकार यांच्यात भर पत्रकार परिषदेत खडाजंगी झाली.

याच प्रश्नाला उत्तर देत असताना वाईचे आमदार मकरंद पाटील यांनी स्वतःच्या मतदार संघातील कोरोनाच्या बाबत कामाची तपशीलवार माहितीच दिली. परंतु, आता भर सभेत उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांच्या समोर दिलेली माहिती पूर्णपणे खोटी असल्याचा आरोप महाविकास आघाडीचाच घटक पक्ष असलेल्या काँग्रेसचे युवक अध्यक्ष विराज शिंदे यांनी केला आहे. त्यांनी केवळ आरोप केला नसून थेट या सर्व गोष्टींची पडताळणी जागेवर जाऊन करून सत्य परिस्थिती समोर आणण्याचा प्रयत्न केल्याने साताऱ्यात खळबळ उडाली आहे.

हे देखील पाहा

पत्रकार परिषदेत आ.मकरंद पाटील यांनी दिलेली सर्व माहिती धादांत खोटी असल्याचा आरोप विराज शिंदे यांनी केल्याने आता जनतेने लोकप्रतिनिधी वर विश्वास कसा ठेवायचा या बाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

राज्यात जरी हे सरकार एकत्र काम करत असल्याचे चित्र रंगवले जात असले तरी स्थानीक कार्यकर्त्यांना ही महाविकास आघाडी आजून पचनी पडल्याचे दिसत नाही. राष्ट्रवादी चे अध्यक्ष खा.शरद पवार हे या महाविकास आघाडीचा मजबूत कणा असल्याचे पहिल्या पासूनच समोर आले आहे. सातारा जिल्ह्या हा शरद पवारांचा बालेकिल्ला मानला जातो तर महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे महत्वाचे नेते पृथ्वीराज चव्हाण हे देखील याच जिल्ह्यातील सुपुत्र आहेत. असे असताना देखील सातारा जिल्ह्यातूनच काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात सुरू असलेली धुसफूस ही येणाऱ्या काळात महाविकास आघाडीला सुरुंग लावणार का हे आता पाहावे लागेल.

Edited By : Pravin Dhamale
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Lok Sabha: कल्याण लोकसभा मतदारसंघात राज ठाकरेंची सभा झाली तर आनंदच: श्रीकांत शिंदे

Maharashtra Politics: नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरेना? ठाकरेंच्या उमेदवाराची घौडदौड सुरुच

Maharashtra Politics 2024 : काँग्रेसचा विश्वजीत पैलवानासोबत; चंद्रहार पाटलांच्या प्रचारात सक्रीय

Maharashtra Politics 2024 : माढ्याच्या मैदानात फडणवीसांचा डबल धमाका; मोहिते- पवारांच्या गटात लावला सुरुंग

Health Tips: लसणाचे पाणी पिण्याचे फायदे ऐकून आजपासूनच प्यायला कराल सुरूवात

SCROLL FOR NEXT