बातम्या

रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

सिध्दी सोनटक्के

मुंबई : रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आलयं. रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील मुलुंड ते माटुंगा अप जलद मार्ग, हार्बरच्या पनवेल ते वाशी दोन्ही मार्गावर आणि पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दोन्ही धिम्या मार्गावर ब्लॉक असेल. यामुळे उपनगरी रेल्वे उशिराने धावतील.  मध्य रेल्वेवर मुलुंड ते माटुंगा अप जलद मार्गावर मेगाब्लॉक आहे. हा ब्ल़ॅाक   स.११.१५ ते दु.३.४५ वाजेपर्यत घेण्यात येणार आहे. 

कल्याणपासून सुटणाऱ्या जलद उपनगरी रेल्वे दिवा ते परळ दरम्यान धिम्या मार्गावर धावतील. तर कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या जलद व अर्ध जलद लोकल घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड, दिवा स्थानकात थांबणार आहेत. ब्लॉकमुळे रेल्वे वीस मिनिटे उशिराने धावतील. रत्नागिरी ते दादर पॅसेंजर दिवा स्थानकातपर्यंतच धावेल आणि ही गाडी दिवा स्थानकातूनच रत्नागिरीसाठी सोडण्यात येणार आहे. दादर स्थानकातून दुपारी ३.४० वाजता विशेष उपनगरी रेल्वेही सोडली जाणार आहे. तर दुसरीकडे  पनवेल ते वाशी दोन्ही मार्गावर ब्लॉक घेण्यात आलाय.. कधी – स. ११.३० ते दु. ४.०० वा. हा ब्लॉक घेण्यात आलाय..  
सीएसएमटी ते पनवेल, बेलापूर दरम्यान अप व डाऊन मार्गावरील उपनगरी रेल्वे फेऱ्या रद्द राहतील. तसेच ठाणे ते पनवेल, बेलापूर ट्रान्स हार्बर आणि नेरुळ ते खारकोपर दरम्यान दोन्ही मार्गावरील आणि पनवेल ते अंधेरी लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्याचे मध्य रेल्वेने सांगितले. ठाणे ते वाशी, नेरुळ आणि बेलापूर ते खारकोपर फेऱ्या पूर्ववत असतील.
तर पश्चिम रेल्वेवर   चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दोन्ही धिम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात आलाय...  स. १०.३५ ते दु. ३.३५ वा. घेण्यात येणार आहे..  डाऊन धिम्या मार्गावरील उपनगरी रेल्वे फेऱ्या चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान डाऊन जलद मार्गावरून चालवण्यात येणार आहेत.


Web Title: Mumbai Local Mega Block Updates

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune PDCC Bank: मोठी बातमी! PDCC बँकेवर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Live Breaking News: धाराशिवमध्ये ५५.४६ टक्के मतदान : कांही केंद्रांवर सांयकाळी सात नंतरही मतदान सुरू

Haryana Politics: हरियाणात भाजपला मोठा धक्का, 3 अपक्ष आमदारांनी सोडली साथ; सरकार अल्पमतात येणार?

Vastu Tips On Mobile: मोबाईलवर ठेवा हे वॉलपेपर, नशीब बदलेल

Harshaali Malhotra : बजरंगी भाईजानच्या 'मुन्नी'ला आता पाहिलं का?, ओळखणं ही झालंय कठीण

SCROLL FOR NEXT