shrikant shinde
shrikant shinde 
बातम्या

रींग रोडच्या पाहणीसाठी खासदार शिंदेनी केला बसने प्रवास 

साम न्युज ब्युरो

कल्याण डोंबिवली (Kalyan Dombivli) मार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महत्वाचा समजला जाणारा रिंग रोड प्रकल्प म्हणजे दुर्गाडी ते टिटवाळा. या रस्त्याचे ६० टक्के काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पाचे काम येत्या डिसेंबर अखेर पूर्ण होण्याची शक्यता असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Dr. Shrikant Shinde) यांनी सांगितले. आज खासदार शिंदे यांनी अधिकाऱ्यांसोबत या मार्गाचा बसने पाहणी दौरा केला. 

या रींग रोडच्या तिसऱ्या टप्प्यासाठी ठाकुर्ली ते दुर्गाडी या कामासाठी भूसंपादनाची ८० टक्के प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या कामाबद्दलची निविदा लवकरच प्रसिद्ध केली आहे. रींग रोडचा एन्ड पॉईंट याच ठिकाणी असणार आहे. या ठिकाणाहून टिटवाळा ते गोवेलीहा हा रस्ता आणखीन जोडण्यासाठी आठवा टप्पाही घेतला जावा अशा सूचना अधिकाऱ्यांना करण्यात आल्या आहेत. (MP Shinde traveled by bus to inspect the ring road)

हे देखील पाहा

रींग रोडचे काम हे टप्प्या- टप्प्याने पूर्ण केले जाईल. या रिंग रोडचे काम पूर्ण झाल्यानंतर दुर्गाडी ते टिटवाळा हे अंतर कमी होणार आहे. फक्त २० मिनिटात हे अंतर कापले जाणार आहे. या प्रकल्प पूर्ण झाल्यावर १०० टक्के अंतर कमी होणार आहे. आज खासदार शिंदे यांनी एमएमआरडीएचे आणि मनपाच्या अधिकाऱ्यांसोबत या प्रकल्पाची पाहणी केली आहे.

Edited By : Pravin Dhamale

ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website - https://www.saamtv.com/
Twitter - https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब - https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम - https://t.me/SaamNews

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: शरद पवार हे देशाचे शक्तीशाली नेते : संजय राऊत

Thane Loksabha: ठाण्याची जागा शिवसेनेकडेच! CM शिंदेंचा विश्वासू शिलेदार उतरणार मैदानात; लवकरच घोषणा?

GT vs RCB,IPL 2024: बेंगळुरुसमोर गुजरातचं आव्हान! पाहा हेड टू हेड रेकॉर्ड अन् पिच रिपोर्ट

Sonu Sood Whats Up Get Blocked : अभिनेता सोनू सूदचं व्हॉट्सॲप ब्लॉक; नेमकं कारण काय ?

Ishan Kishan Fined: पराभवानंतर मुंबई इंडियन्स संघाला मोठा धक्का! इशान किशनवर BCCI कडून मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT