बातम्या

मनसेकडून किमान १५० जागा लढवणार 

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई  -विधानसभा निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढविणार असल्याची घोषणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केली. निवडणुकीच्या प्रचारासाठी पाच ऑक्‍टोबरला पहिली सभा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

राज ठाकरे यांनी जागांची संख्या सांगितली नसली तरी, मनसेकडून किमान १५० जागा लढविण्यात येणार असल्याचे नेत्यांनी खासगीत सांगितले.

मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी जागांबाबत आपण योग्यवेळी घोषणा करणार असल्याचे सांगितले. या वेळी त्यांच्या उपस्थितीत धुळ्यातील आत्महत्या केलेल्या धर्मा पाटील यांचे पुत्र नरेंद्र यांनी मनसेत प्रवेश केला. यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे यांनी नरेंद्र पाटील पक्षातर्फे निवडणूक लढतील, अशी घोषणा केली. शेतकरी धर्मा पाटील यांनी मंत्रालयात विष प्राशन करत आत्महत्या केली होती. नरेंद्र पाटील यांच्यासोबत शिवसेनेचे नाशिकचे नगरसेवक दिलीप दातीर यांनीही मनसेत प्रवेश केला.

कोहिनूर मिलप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) चौकशी केल्यानंतर राज ठाकरे यांनी आज पक्षाचा निर्णय जाहीर केला. काही दिवसांपासून त्यांनी मौन बाळगल्याने विधानसभा निवडणुकीत पक्षाची नेमकी भूमिका काय आहे, याबाबत तर्क लढवले जात होते. मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही राज ठाकरे ‘ईडी’च्या चौकशीनंतर शांत झाल्याचे म्हटले होते. 

आज अखेर राज ठाकरेंनी आज मौन सोडले. या वेळी बोलताना त्यांनी लढविण्यात येणाऱ्या जागांबाबत आपण योग्यवेळी घोषणा करणार असल्याचे सांगितले. पाच तारखेला आपली पहिली प्रचारसभा पार पडणार असून, इतके दिवस जे बोललो नाही ते आता बोलणार आहोत, असेही त्यांनी या वेळी सांगितले. उमेदवारांची रोज चार-पाच नावे जाहीर करेन, असे मिस्कील भाष्यही या वेळी त्यांनी केले.

Web Title: MNS on its own in the Assembly constituency

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rupali Chakankar On Rohit Pawar | रोहित पवारांच्या आरोपावर चाकणकरांची मोठी प्रतिक्रिया

Akola Crime News: सासू सतत घ्यायची चारित्र्यावर संशय; संतापलेल्या जावयानं कायमचं संपवलं, नेमकं काय घडलं ?

Solapur Lok Sabha Election | सोलापूरमध्ये EVM मशीन बिघडली, मतदारांचा खोळंबा

Kharif Crop Loan : खरीप हंगामासाठी पीक कर्ज; शेतकऱ्यांच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी टोल फ्री क्रमांकाची सुविधा

Live Breaking News : रत्नागिरी-सिंधुदुर्गात सकाळी ९ वाजेपर्यंत 8.17 टक्के मतदान

SCROLL FOR NEXT